Home » आमचा देश आमचे नियम

आमचा देश आमचे नियम

by Team Gajawaja
0 comment
Sweden VS Muslims
Share

युरोपमधील अनेक देशांमध्ये मुस्लिम स्थलांतरित नागरिकांसाठी कडक नियम लागू करण्यात येत आहेत. ब्रिटनमधील मशिदींवर कारवाई सुरु आहे, तर जर्मनीमध्येही काही मशिदींना टाळे लावण्यात आले आहे. इटलीमध्येही अशाच स्वरुपाचे कडक नियम लागू करण्याची मागणी करण्यात येत असतांना आता स्विडनच्या उपपंतप्रधानांनी आमचा देश आमचे नियम, असे सूत्रच जाहीर केले आहे. ज्यांना आमच्या देशातील नियम मान्य नाहीत, त्यांनी त्वरित देश सोडावा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. शिवाय स्वीडनमध्ये कुठल्याही प्रकारचे मुस्लिम कायदे, व शरिया कायदे लागू नाही. मुस्लिमांनी स्वतःला बदलावे किंवा आमचा देश सोडावा असे थेट आवाहनच स्विडनच्या उपपंतप्रधानांनी केल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी स्विडनच्या एका तरुणानं जाहीरपणे कुराण जाळून आपला निषेध व्यक्त केला होता. (Sweden VS Muslims)

तेव्हापासून स्विडनमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता थेट उपपंतप्रधानांनी जाहीरपणे याबाबत इशारा दिल्यामुळे युरोपातील आणखी एका देशात मुस्लीम धर्मियांना बंदी होणार का याची चर्चा सुरु झाली आहे. स्विडनच्या उपपंतप्रधान एब्बा बुश यांनी मुस्लिम आणि शरिया कायद्यांबाबत केलेल्या विधानामुळे जगभरातील मुस्लिम संतप्त झाले आहेत. बुश यांनी स्पष्टपणे सांगितले की, शरिया कायद्यावर आधारित इस्लामला स्विडनमध्ये जागा नाही. ज्या मुस्लिमांना शरिया कायदा हवा आहे, त्यांनी आमचा देश सोडवा. ज्या मुस्लीम नागरिकांना स्विडनमध्ये रहायचे आहे, त्यांनी स्विडिश मूल्यांशी जुळवून घ्यायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यांच्या या थेट वक्तव्यामुळे स्विडनमधील मुस्लीम जनतेमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यापासून स्विडनमध्ये वाढलेल्या हिंसक घटनांचा निषेध करण्यात येत होता. (Sweden VS Muslims)

यावर कडक कारवाई करत स्विडीश सरकारनं अन्य कुठलाही कायदा आमच्या देशात लागू होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. उपपंतप्रधान एबा बुश यांनी देशात राहणाऱ्या मुस्लिमांसाठी काही नियम लागू केले आहेत. एब्बा यांनी स्पष्ट केले आहे की, मुस्लिमांनी आपल्या जीवनात स्वीडिश मूल्यांचा अंगीकार करावा, ते शक्य नसेल तर आमचा देश सोडावा. इस्लामिक शरिया कायद्यांना आणि त्यांच्या मूल्यांना स्विडनमध्ये स्थान नाही. एका राजकीय सभेत स्वीडिश उपपंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे स्विडनमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा वाद निर्माण झाला आहे. स्विडनमध्ये ऑनर किलिंग, शिरच्छेद, महिलांवर दगडफेक आणि शरिया कायद्याला स्थान नाही. एबा यावरच थांबल्या नाहीत तर या कार्यक्रमाचा व्हिडिओ त्यांनी X वर शेअर केला आहे. (Sweden VS Muslims)

त्यावर त्यांनी आपल्याला एकमेकांसोबत सहिष्णुता, शांतता आणि स्वातंत्र्याने जगण्यास सक्षम व्हायचे आहे, अशी कॅप्शनही टाकली आहे. बुश यांच्या या वक्तव्यामुळे टीकाकारांनी त्यांच्यावर इस्लामोफोबिया वाढवण्याचा आणि मुस्लिम समुदायाला कलंकित केल्याचा आरोप केला आहे. एबा बुश यांच्या टिप्पण्यांमुळे स्विडनमध्ये राहणारे मुस्लिम दुरावू शकतात आणि सामाजिक तणाव वाढेल अशी शंकाही व्यक्त झाली आहे. सध्या मुस्लिम स्थलांतरितांचा मुद्दा स्विडनमध्ये चर्चेत आहे. अलिकडच्या वर्षांत निर्वासित आणि स्थलांतरितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे स्विडीश नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. स्विडनच्या नागरिकांच्या कराचा पैसा फक्त देशावरच आणि आपल्या नागरिकांच्या सोयी सुविधांवरच खर्च व्हावा अशी मागणी होत आहे. निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे देशात गुन्हेगारी वाढल्याचीही टिका करण्यात आली. त्यामुळेच स्विडनमध्ये निर्वासितांबद्दल कडक धोरण राबवण्यास सुरुवात झाली आहे. (Sweden VS Muslims)

====================

हे देखील वाचा : ब्रिटनमधील मशिदी चौकशीच्या फे-यात

====================

स्विडनमध्ये 1960 दशकाच्या उत्तरार्धापासून मध्य पूर्व, बाल्कन आणि आफ्रिकेच्या काही भागांतून मुस्लिम स्थलांतरीतांची संख्या वाढली आहे. अलिकडच्या काळात या स्थलांतरितांच्या पिढीची लोकसंख्या झपाट्यानं वाढल्यावर अनेक स्थानिकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. त्यातून स्विडनमध्ये तणावाचे वातावरण निर्णाण झाले. – स्वीडिश एजन्सी फॉर सपोर्ट टू फेथ कम्युनिटीजच्या अहवालानुसार, स्वीडनमधील मुस्लिमांची मोठी जनसंख्या ही इस्लाम धर्माचे पालन करते. यात इराक, सोमालिया, कोसोवो आणि अफगाणिस्तानमधील स्थलांतरितांचा समावेश आहे. त्यातूनच आता स्थानिक आणि स्थलांतरित असा वाद येथे वाढू लागला आहे. बुरख्याचा वाद स्विडनमध्येही झाला. हा वाद वाढल्यावर स्विडिश मुस्लीम समुदायातील पाच ज्येष्ठ सदस्यांना स्विडिश स्थलांतर संस्थेने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. कुठल्याही शैक्षणिक संस्थेत बुरख्याला बंदी घालण्यात आली. अशाच वादांचे स्वरुप वाढल्यावर आता उपपंतप्रधान एबा बुश यांनी स्विडनमध्ये फक्त स्विडीश कायदा पाळण्यात येईल, हे स्पष्ट केले आहे. (Sweden VS Muslims)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.