शरिरातून घाम निघणे ही सर्वसामान्य बाब आहे. पण जेव्हा आपण उन्हात असतो, किंवा अधिक व्यायाम केला तर घाम निघतो. मात्र थंडीच्या दिवसांमध्ये किंवा एसी लावलेल्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला घाम येत असेल तर वेळीच आरोग्याची काळजी घ्या. कारण काही लोकांना रात्रीच्या वेळी खुप घाम येत असल्याने त्यांची झोप ही पूर्ण होत नाही. याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. तर जाणून घेऊयात अशी स्थिती कोणत्या आजाराचे कारण ठरु शकते त्याबद्दलच अधिक.(Sweating at Night)
रात्रीच्या वेळी का घाम येतो?
-तणाव वाढणे
तणावाची काही कारणं असू शकतात. जसे की, कामात समस्या, मैत्रीत वाद, पैशांची कमतरता, परिक्षेत नापास होणे किंवा एखादा गंभीर आजार असोत. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी अशा गोष्टींबद्दल विचार करता तेव्हा घाम येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी तुम्ही चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा.
-दारुची सवय
जी लोक प्रमाणापेक्षा अधिक दारु पितात त्यांचे शरिर एका वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. काही लोकांना रात्री उशिरापर्यंतच्या पार्टीत खुप दारु पिण्याची सवय असते. त्यामुळे झोपताना खुप घाम येतो. खरंतर या वाईट सवयीमुळे हृदयाचे ठोके ही वाढले जातात आणि भीती वाटत राहते. अशातच खुप घाम येतो.
-कमी रक्तदाव
जर तुमच्या रक्तातील स्तर कमी झाल्यास तर कधीही तुम्हाला घाम येऊ शकतो. या वैद्यकीय स्थितीला हाइपोग्लाइसीमिया असे म्हटले जाते. जेव्हा रात्रीच्या वेळी ग्लूकोजचा स्तर कमी होते तेव्हा एड्रेनालाइन हार्मोन रिलीज होतात आणि तेव्हा घाम येणारे ग्लँड सक्रिय होतात.
-औषधाचे सेवन
काही खास पद्धतीची औषधं ही रात्रीच्या वेळी घेतल्यानंतर घाम येण्याची समस्या निर्माण होते. खासकरुन दररोज पेन किलर खाल्ल्याने अशी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्ही एखाद्या तज्ञांकडे जाऊन तुमच्या समस्येवर उपचार घ्या.(Sweating at Night)
हे देखील वाचा- कोरोना नंतर आता Brain Eating Amoeba वाढवली चिंता, दक्षिण कोरियात आढळला पहिला रुग्ण
घाम आल्यानंतर दुर्गंध वास का येतो?
घाम आल्यानंतर येणाऱ्या दुर्गंधीसाठी फिश ओडोर सिंड्रोम जबाबदार आहे. याला मेडिकल भाषेत ट्राईमिथाइलअमिनुरिया असे म्हटले जाते. हे जीनमध्ये काही गडबड झाल्यास होते. टीएमए कोलाइन डाइट घेण्यामुळे होते. जसे सोया, राजमा, अंड्यात उत्तम कोलाइन असते. तर अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये संशोधनकर्ते पॉल वाइसने लिहिले की, तंदुरस्त राहण्याव्यतिरिक्त काही व्यक्तीच्या मेटाबॉलिज्म मध्ये गडबड किंवा ट्राइ मिथाइल अमिनुरियाच्या कारणास्तव शरिरातून दुर्गंधी वास येतो.