Home » वजन कमी करण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत सूर्यनमस्कार करण्याचे आहेत अनेक आश्चर्यचकित करणारे फायदे

वजन कमी करण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत सूर्यनमस्कार करण्याचे आहेत अनेक आश्चर्यचकित करणारे फायदे

0 comment
Surya Namaskar Benefits
Share

हल्ली आपल्या सगळ्यांच्या बिझी शेड्युल आणि चुकीच्या लाईफस्टाईल मुळे आपल्या अॅक्टिव्हिटीज खूप मर्यादित झाल्या आहेत. ज्यामुळे तिशीच्या वयातच आपल्याला पन्नास वर्षात होतील अशा व्याधी होऊ लागल्या आहेत. जसे आपण हल्ली पाहतोय तरुण मंडळींना ही गुडघे दुखणे, पाठ दुखणे, जास्त चालले की थकवा येणे, पायाचे तळवे दुखणे असे त्रास होऊ लागले आहेत. अनेकांना वाटत आपण रोज चालायला जाव किंवा जिम ला जाव पण ते वेळेमुले प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. पण दिवसाचा किमान अर्धा तास जरी तुम्ही तुमच्यासाठी राखून ठेवलात तर तुम्ही या सर्व त्रासातून मुक्त होऊ शकाल. हो, हे शक्य आहे. आणि त्याच विषयावर आज आपण अधिक माहिती मिळवणार आहोत.(Surya Namaskar Benefits) 

सूर्यनमस्कार याबाबत आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण तरीही आपण सूर्यनमस्कार करण्यापेक्षा इतर एक्साइजना जास्त महत्व देतो. तुम्हाला माहित आहे का दिवसाला ठराविक काही सूर्य नमस्कार तुमच्या शरीरावर जादू करू शकतात.विश्वास नसेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

प्राचीन काळापासून सूर्य देवाची पूजा केली जातो. आपल्या जीवनाची आणि दिवसाची सुद्धा सुरुवात सूर्यदेवा पासून होते म्हणुन सूर्याला अनन्य साधारण  महत्व देण्यात आलेले आहे. त्याबरोबरच सूर्योदयाला केलेले सूर्यनमस्कार आपल्या शरीरात महत्वाच्या व्हिटामिन ची कमतरता दूर करतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात ही छान होते. 

Surya Namaskar Benefits
Surya Namaskar Benefits


आज आपण सूर्य नमस्कार केल्याने होणारे महत्वाचे फायदे जाणून घेणार आहोत. 

– दररोज सूर्य नमस्कार केल्याने शरीरातील स्नायु मजबूत आणि लवचिक होण्यास मदत होते. शरीरात ऊर्जा निर्माण होऊन रक्ताभीसरण ही सुधारते.(Surya Namaskar Benefits)

– हल्लीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. सूर्यनमस्कार केल्याने मनशांति मिळण्यास मदत होते आणि चिंतेतून डोक शांत राहते.

–  हल्ली केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांना ही केस गळतीची समस्या सतावत असते. तुमची ही समस्या ही सूर्यनमस्कार केल्यामुळे कमी होण्यास मदत होईल.  कारण सूर्यनमस्कारामुळे मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे केस गळती थांबते, रक्ताभिसरण वाढल्याने डोक्याला पोषण मिळते आणि केस निरोगी वाढ होण्यास मदत होते. एवढेच नाही तर सूर्यनमस्कार केल्यामुळे पांढरे केस होण्यापासून रोखता येतात. 

– आजच्या जीवनशैलीमुळे केवळ तरुणच नाही तर लहान मुले सुद्धा चिंता आणि तणावाने त्रस्त असलेले पहायला मिळतात. ज्याचा परिणाम नकळत त्यांच्या अभ्यासावरही होतो. सूर्यनमस्कार लहान मुलांचे डोक शांत ठेवण्यास मदत करतात, स्मरणशक्ति वाढवतात आणि एकाग्रता वाढवण्यासही मदत करतात.

Surya Namaskar Benefits
Surya Namaskar Benefits

– पोटाशी संबंधित कोणत्याही आजारावर सूर्य नमस्कार करने हा रामबाण उपाय आहे. यामुळे तुमच्या पोटातील आतील भाग मजबूत होण्यास मदत होते. त्याबरोबर पाचन संस्था सुधरण्यास ही मदत होते.     

– हल्ली वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. वजन कमी होण्यासाठी अनेक जण औषधांचे सुद्धा सेवन करतात. पण याचे फायदे कमी आणि शरीरावर दुष्परिणाम अधिक प्रमाणात होतात. त्यापेक्षा केवल काही सूर्यनमस्कार दररोज केल्याने तुमचे वजन कमी होण्यास खास करू पोटाचा घेरा कमी होण्यास १००% मदत होईल.

– ज्या महिलांना मासिक पाळी नियमित न येणे किंवा मासिक पाळीशी निगडित इतर कोणतीही समस्या असेल त्यांनी तात्काळ सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात करायला हवी. सूर्यनमस्कारामुळे पोटाचा खालचा भाग, नितंब, गर्भाशय आणि अंडाशय निरोगी होतात आणि मासिक पाळीच्या अनियमिततेची समस्या मुळापासून दूर होते. 


==========


हे ही वाचा: महिलांमध्ये लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच काळजी घ्या


==========


सूर्य नमस्कार उपाशी पोटी ही केले जाऊ शकतात.सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही करू शकतात त्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.  


(डिस्क्लेमर : वर दिलेली माहिती खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही. हा लेख माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे.)   


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.