आपल्या पार्टनरला स्पेशल फिल करुन देण्यासाठी एखादे सरप्राइज दिले जाते. सरप्राइज देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तिला हे सांगू इच्छिता की, तो तुमच्यासाठी किती खास आणि महत्वाचा आहे. खरंतर नात्यातील दूरावा कमी होण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे. अशातच तुम्हाला सुद्धा तुमच्या पार्टनरला एखादे सरप्राइज द्यायचे आहे पण कळतं नाही नक्की काय करावे तर थांबा. कारण तुम्ही सरप्राइज द्याल ही पण पार्टनरला ते आवडेल का हे पुढील काही गोष्टींवरुन ठरवता येईल, अशातच तुमच्या काही चुका सुद्धा तुम्ही सरप्राइज देताना टाळा.(Surprise for partner)
-स्वत:च्या पसंदीला प्राथमिकता देणे
जर तुम्ही पार्टनरला एखादे गिफ्ट देऊ इच्छिता तर तुमची पसंदी हिच त्यांना आवडेल असे नाही. पण त्यांना काय आवडते ते सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर ठरवा पार्टनरला काय द्यायचे आहे. खासकरुन अशा गोष्टी पार्टनरला द्या ज्या त्याच्या उपयोगासाठी तर आहेच पण त्या पाहून ते खुश ही होतील.
-अधिक महागड्या वस्तू देणे
पार्टनरला खुश करायचे आहे म्हणून एखादे सरप्राइज देणे ठिक आहे. पण सरप्राइज देण्यासाठी अधिक महागडी वस्तू देऊ नका जी तुमच्या पार्टनरला खुप पैसे खर्च करुन सुद्धा आवडणार नाही. त्यामुळे आपल्या शिखाला परवडणारे आणि समोरच्या व्यक्तीचे मन कसे राखता येईल या दृष्टीने विचार करुन एखादे गिफ्ट द्या.

-तुमच्याबद्दल भावना न व्यक्त होणे
तुम्ही पार्टनरला एखादे सुंदर गिफ्ट दिले आहे. पण त्यात तुमच्या भावनाच नसतील तर अशा सरप्राइजचा काय फायदा. प्रत्येक नात्यात जिव्हाळा आणि भावना या खुप महत्वाच्या असतात. त्यामुळे सरप्राइज देताना सुद्धा त्यामागील तुमच्या भावना पार्टनरला कळल्या पाहिजेत. त्या नसतील तर तुम्ही सरप्राइज देण्यासाठी जी मेहनत केली आहे ती व्यर्थच होईल.
हे देखील वाचा- रिलेशनशिपमध्ये तुम्ही ‘या’ चुका करत असाल तर व्हा सावध, अन्यथा…
-प्रत्येकवेळी एकसमान गिफ्ट
पार्टनरला गिफ्ट देताना लक्षात ठेवा एकच गिफ्ट वारंवार देऊ नका. जर तुम्ही पार्टनरला एखादे घड्याळ दिले आहे पण दुसऱ्या वेळेस ही तेच पण त्याचा लूक वेगळा असला तरीही ते देणे टाळा. त्या ऐवजी दुसरी कोणतीही त्यांच्या उपयोगाची वस्तू द्या. एकच गिफ्ट वारंवार तुम्ही पार्टनरला दिल्यास तो सुद्धा नाराज होऊ शकतो.(Surprise for partner)
-स्पेशल फिल करुन न देणे
सरप्राइज देताना पार्टनरला स्पेशल फिल करु द्या. जसे की, तो तुमच्यासाठी फार महत्वाचा व्यक्ती आहे. सरप्राइजसाठी केलेली मेहनत तेव्हाच फळाला येईल जेव्हा तुम्ही पार्टनरला स्पेशल फिल करुन द्या. नाहीतर फक्त सरप्राइज द्यायचे आहे म्हणून दिखावा करणे टाळा.