Home » सुरेश प्रभू: एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटेंट ते दमदार राजकिय नेत्याचा प्रवास

सुरेश प्रभू: एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटेंट ते दमदार राजकिय नेत्याचा प्रवास

by Team Gajawaja
0 comment
Suresh Prabhu
Share

सुरेश प्रभू (Suresh Prabhu) हे भारतातील राजकरणातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात महाराष्ट्रापासून केली होती. त्यानंतरच्या काळात त्यांना जनतेचे समर्थन ही मोठ्या प्रमाणात लाभले आणि महाराष्ट्रातील एक बडा नेता म्हणून ते प्रसिद्ध झाले. सध्या सुरेश प्रभू हे नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री पदावर आपली भुमिका पार पाडत आहेत. दरम्यान, भाजपात प्रवेश करण्यापूर्वी सुरेश प्रभू शिवसेनेत होते. त्यांच्या तिकिटावरुन काही वेळेश लोकसभा खासदार म्हणून सुद्धा निवडून आले होते. २०१४ मध्ये लोकसभेच्या निकालानंतर सुरेश प्रभूंनी एका मोठ्या नाट्यमय रुपात भाजप पक्षात एन्ट्री केली. आज भाजपमधील एक बड्या केंद्रींय मंत्र्यांपैकी एक आहेत. तर जाणून घेऊयात सुरेश प्रभूंचा यशस्वी चार्टर्ड अकाउंट ते राजकीय प्रवासाबद्दल सविस्तर..

करियरची सुरुवात चार्टर्ड अकाउंटेटपासून केली पण…

सुरेश प्रभू यांचा जन्म ११ जुलै १९५३ रोजी मुंबईतील झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव सुरेश प्रभाकर प्रभू आहे. त्यांनी मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदिर येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढील अभ्यासासाठी त्यांनी एम. एल डहाणू महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी कॉमर्स शाखेतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंततर सुद्धा सुरेश प्रभूंनी शिक्षण थांबवले नाही तर त्यांनी लॉ ची डिग्री मिळवण्यासाठी मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथून एल.एल. बी पूर्ण केल्यानंतर आपल्या करियरची सुरुवात त्यांनी चार्टर्ड अकाउंटेंट पासून केली. सुरेश प्रभू हे अभ्यासात खुप हुशार होते. त्याचसोबत प्रभू हे सीएच्या परिक्षेत भारतातून ११ व्या स्थानी पास होऊन आले होते.

पण एक यशस्वी चार्टर्ड अकाउंट झाल्यानंतर त्यांनी स्वत: ची चार्टर्ड अकाउंटटी फर्म काढली आणि त्याचे ते मालक झाले. पुढे सुरेश प्रभूंना चार्टर्ड अकाउंटेट्स संस्थेचे सदस्य ही करण्यात आले. अशाप्रकारे सुरेश प्रभूंनी आपल्या करियरमध्ये यश मिळवले होते. तसेच काही शासकीय आणि नॉन-गव्हर्मेंन्ट पदावर ही काम केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकासाचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे सुद्धा अध्यक्षता सुद्धा भुषवली.

सुरेश प्रभूंच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी पत्रकार उमा प्रभू यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. त्यांच्या यशाची पायरी येथे थांबली नाही तर त्याच्या ही पुढे काही तरी त्यांच्या आयुष्यात मांडून ठेवले होते. काही संस्थांसोबत जोडले गेल्यानंतर सुरेश प्रभूंचा कल आणि आवड हा राजकरणाकडे वळू लागला होता.

हे देखील वाचा- G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी दिल्या खास भेटी… वाचा कोणाला काय दिले? 

सातत्याने चार वेळा लोकसभा खासदार आणि….
सुरेश प्रभूंनी (Suresh Prabhu) चार्टर्ड अकाउंटमध्ये यश तर मिळवले होतेच पण त्यानंतर ही राजकरणात आपले नशीब आजमावून पाहिले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात एन्ट्री केली होती. तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सुरेश प्रभूंची पक्षात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आणि लोकसभेत सुद्धा त्यांनी बाजी मारली. १९९६ मध्ये त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रातील राजापुर लोकसभा जागेवर त्यांना तिकिट दिल. येथून विजय मिळाला आणि ते पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडले गेले. या दरम्यान सुरेश प्रभूंनी लोकांची दु:ख समजून घेत आणि आपले कार्य राजापूरच्या जनतेपर्यंत पोहचवताना लोकांची मनं जिंकली. त्यानंतर सातत्याने चार वेळा याच लोकसभेतून सातत्याने चार वेळा खासदार रुपात आपले त्यांनी कार्य केले. दरम्यान, २००९ मध्ये त्यांची राजकीय समीकरण बिघडली आणि त्यांचा पराभव झाला.

पण या दरम्यान त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये १९९८-२००४ पर्यंत काही केंद्रीय मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या गेल्या.ज्यामध्ये उद्योग, पर्यावरण आणि वन यासारख्या विविध मंत्रालयांचा समावेश आहे. परंतु उर्जा मंत्री असताना त्यांनी दिलेल्या सेवेचे वेळोवेळी कौतुक केले जाते. प्रभू यांनी विज विभागात फार मोठे बदल केले. सुरेश प्रभू यांनी आपल्या कार्यातूनच एक मोठे राजकीय नेते रुपात नावारुपाला आले होते. त्यांचे राजकीय यश पाहता बहुचर्चित पत्रिका ‘एशिया साप्ताहिक’ ने २००० रोजी त्यांना भारताच्या तीन भविष्य नेत्यांपैकी एक असा मान दिला.

हे देखील वाचा- Madrid summit 2022: रशिया -युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘नाटो’ची मॅड्रिड परिषद अत्यंत महत्त्वाची

शिवसेना सोडल्यानंतर भाजपात सुरेश प्रभूंची एन्ट्री
सुरेश प्रभूंनी (Suresh Prabhu) आपल्या राजकीय प्रवास हा कधीच थांबू दिला नाही तर राजकरणात ते सातत्याने सक्रिय होते. पुढे २०१३ मध्ये व्हार्टन इंडिया इकोनॉमिक्स फोरमकडून नरेंद्र मोदी यांचे भाषण रद्द करण्यात आले होते त्यावर सुरेश प्रभूंनी (Suresh Prabhu) जोरदार विरोध केला होता. जुलै २०१४ मध्ये एनडीए सरकारने विद्युत सुधारणेसाठी त्यांना विज, कोळसा आणि नवीकरणीयचा एकीकृत विकासाचे सल्लागार मध्ये उच्च स्तकीय पॅनलचे प्रमुख म्हणून निवडले. याच दरम्यान एनडीएचे सराकार कोसळले आणि भाजपने आपला मोठा विजय मिळवला होता. तर ९ नोव्हेंबरला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घ्यायची होती. पण तो पर्यंत सुरेश प्रभू हे शिवसेना पक्षातच होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांनी सुरेश प्रभू यांनी नाट्यमय रुपात भाजपात एन्ट्री केली होती.

सुरेश प्रभूंच्या भाजपातील प्रवेशानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला होता. कारण प्रभू हे शिवसेना पक्षातील एक दमदार राजकीय नैत्यांपैकी एक होते. याचे एक कारण असे सुद्धा होते की, त्या दरम्यान भाजप आणि शिवसेना गठबंधन संदर्भात खुप तर्कवितर्क ही लावले जात होते. दरम्यान, भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना रेल्वे मंत्री पद दिले गेले. रेल्वे मंत्रालयात नोव्हेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत त्यांनी रेल्वे मंत्री पद सांभाळले. यादरम्यान रेल्वेच्या काही दुर्घटना झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी आपल्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी पियूष गोयल यांना रेल्वे मंत्री पद दिले गेले.

त्यानंतर सुरेश प्रभूंना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात जबाबदारी दिली गेली. पुढे प्रभू आंध्रप्रदेशाचे राज्य सभा सदस्य म्हणून निवडून आले. त्याचसोबत २०१८ मध्ये एक अतिरिक्त नागर विमानन मंत्रालयाची सुद्धा त्यांना जबाबदारी दिली गेली होती. आज सुरेश प्रभू हे नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक प्रमुख मंत्री आहेत. भारतीय राजकरणातील एक शक्तिशाली राजकरणी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या द्वारे काही सेक्टर मध्ये उच्च योगदान दिले गेले त्यासाठी त्यांना वेळोवेळी काही पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आले आहे. तसेच सुरेश प्रभू हे काही एनजीओ सोबत मिळून सामाजिक कार्यात सुद्धा आपले योगदान देत राहतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.