जर तुम्ही भारतातील सर्वात झपाटलेल्या (Haunted) ठिकाणांबद्दल ऑनलाइन शोधले, तर तुम्हाला गुजरातच्या सुरतपासून २१ किमी अंतरावर असलेल्या डुमास बीचचे नाव नक्कीच सापडेल. होय, या समुद्रकिनाऱ्याची वाळू काळी आहे. कथांद्वारे, यामागचे कारण सामुहिक अंत्यसंस्कार असल्याचे सांगितले जाते. रिपोर्टनुसार, हे बीच दिवसा देवाच्या घरासारखे वाटते. तर त्याच वेळी सूर्यास्तानंतर, ते सैतानाचे स्वर्ग बनते. विकिपीडियानुसार, हे बीच भारतातील टॉप ३५ सर्वात झपाटलेल्या ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. (Haunted beach in Surat)

स्मशानामुळे काळी झाली वाळू!
सुरतचे डुमास बीच २ गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पहिले काळ्या वाळूसाठी आणि दुसरे म्हणजे झपाटलेले असल्याने. जुन्या कथांमधून असे सांगितले जाते की, डुमास बीचच्या ठिकाणी एकेकाळी स्मशानभूमी होती, त्यामुळे तिची वाळू काळी झाली. यासोबतच असा दावा केला जातो की, आजही अनेक आत्मा या समुद्राच्या किनाऱ्यावर राहतात. (Haunted beach in Surat)

सत्य की निव्वळ काल्पनिक?
हे नाकारता येत नाही की, काळ्या वाळूमुळे हा समुद्रकिनारा एक भयानक अनुभव देतो. डुमास बीचचा परिसर सुंदर आहे, परंतु या ठिकाणी असणारी काळी वाळू सूर्यास्तानंतर भयावहपणे उदासीन होते. येथे आलेली लोक असा दावा करतात की, त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर विचित्र आवाज ऐकले आहेत. जसे की कोणीतरी रडत आहे, हसत आहे वगैरे. त्याच वेळी, रात्रीच्या वेळी या बीचवर अनेक रहस्यमयी घडामोडी घडत असल्याचा दावा येथील स्थानिक लोक करतात. मात्र, ना-नफा पर्यावरण संरक्षण समितीचे रोहित प्रजापती म्हणतात की, हा समुद्रकिनारा उद्योगांमुळे होणाऱ्या तोट्याचा सामना करत आहे. (Haunted beach in Surat)

हजिराच्या औद्योगिक क्षेत्राजवळ आहे डुमास बीच
डुमास हा हजिराच्या औद्योगिक क्षेत्राजवळील शहरी समुद्रकिनारा आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, कारखान्यांतून निघणाऱ्या कचऱ्यामुळे हा समुद्रकिनारा खराब होत आहे. त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. परंतु या नुकसानीचा शोध घेण्यासाठी कोणताही व्यापक अभ्यास केला गेला नाही. (Haunted beach in Surat)
हे देखील वाचा: एक ‘असे’ शहर जिथे ७२ वर्षांपासून झाला नाही कोणाचाच मृत्यू, येथे मृत्यूवर लादण्यात आलीय ‘बंदी’

मच्छीमारांच्या जीवनमानाला निर्माण झालाय धोका
स्थानिक आदिवासी समाजाशी संबंधित असणाऱ्या आणि आता मच्छिमारांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या रोशनी पटेल यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितले की, ऑक्टोबर २०२० मध्ये डुमासमध्ये अनेक मेलेले मासे जाळून राख झाले होते. त्या म्हणाल्या की, अनियंत्रित औद्योगिकीकरणामुळे मच्छिमारांचे जीवनमान धोक्यात आले असून पाण्याच्या गुणवत्तेवर देखील विपरित परिणाम होत आहे. (Haunted beach in Surat)