प्रत्येक महिला आपल्या आयुष्यात मुलगी, सून, पत्नी, आई, कर्मचारी अशा विविध भुमिका निभावते. घर-परिवाराला सांभाळण्यासह ती नोकरी करत असेल तर तिच्यावर जबाबदाऱ्या अधिक असतात. त्याचसोबत प्रत्येक कामात परफेक्ट रहावे म्हणून ती धडपड ही करते. काही वेळेस कामाचे प्रेशर घेऊन आयुष्य जगण्याची सवय असते. पण त्यालाही मर्यादा असते. एका काळानंतर ते सहन न झाल्यास महिलेची चिडचिड अधिक होऊ लागते. अशातच तिला नक्की काय करावे हे कळत नाही आणि याचाच थेट परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर होतो. तिला ती चुकतेय का असा विचार सतत येऊ लागतो. (Superwomen Syndrome)
जबाबदाऱ्या पार पाडणे काही चुकीचे नाही पण आजकालच्या महिला त्या पूर्ण करु शकल्या नाहीत तर त्या सुपर वुमन सिंड्रोमचा शिकार होत आहेत. अशातच सुपर वुमन सिंड्रोन नक्की काय याच बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
सुपर वुमन सिंड्रोम म्हणजे काय?
खरंतर या स्थितीत महिलांना मानसिक आरोग्यासंबंधित समस्या होऊ लागतात. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, सेरोटोनिन हार्मोन्सच्या बदलाव किंवा कमतरतेमुळे असे होते. काम आणि जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने सांभाळल्यानंतर ही बहुतांश महिला स्वत:ला दोष देतात. अशातच त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते आणि चुका अधिक होऊ लागतात. महिलांना हे माहिती नसते की, त्या तेव्हा सुपर वुमन सिंड्रोमच्या शिकार झाल्या आहेत.
लक्षण काय?
-सातत्याने थकवा जाणवणे
-अयशस्वी वाटणे आणि त्यासाठी स्वत: ला दोषी मानणे
-झोप न येणे
-प्रत्येक वेळी डोकेदुखी
-लक्ष केंद्रित करता न येणे
-सेल्फ केअरकडे दुर्लक्ष (Superwomen Syndrome)
हेही वाचा- तणावााखाली असाल तर कधीच सेवन करु नका हे पदार्थ
असा करा बचाव
-सुपर वुमन सिंड्रोमपासूनच बचाव करण्यासाठी सर्वात प्रथम महिलांनी जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामधून काही काळासाठी काढता पाय घ्यावा. त्यांनी हे समजून घ्यावी की, त्यांची स्वत: ची सुद्धा एक पर्सनल लाइफ आहे.
-या समस्येचा सामना करत असलेल्या महिला सर्वच गोष्टी करायच्या असतात. पण एखादी गोष्ट करताना समस्या होते किंवा सक्षम नसल्यास त्याला सरळ नकार द्यावा.
-महिला अशी सुद्धा चुक करतात की, काही कामे एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात. पण कामांनुसार तुम्ही प्राथमिकता दिली पाहिजे.
-जर तुमच्याकडे खुप काम असेल आणि ते तुम्हालाच करावे लागणार असेल तर कामाची वाटाणी करा. आपल्या पार्टनरची यामध्ये मदत घेऊ शकता.