Home » संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे…

संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे…

by Team Gajawaja
0 comment
Health Tips
Share

भारतीय आहारात अंडी हा प्रमुख पदार्थ मानला जातो. अनेकजण आपल्या सकाळच्या नाष्टाची सुरुवात अंड्यापासून करतात.  उकडलेली अंडी किंवा अंडा आम्लेट हा अनेकांचा हक्काचा नाष्टा आहे. अंडी हा प्रकार असा आहे की, सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यामध्ये कधीही खाल्ला जाऊ शकतो. (Health Tips) याशिवाय जी मंडळी जिमध्ये जाऊन आपले शरीर पिळदार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आहारात या अंड्याला प्रमुख स्थान आहे. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी फायदेशीर ठरतात. पण यासोबत रोज आहारात अंड्यांच्या समावेश केला तर आपला मेंदूही तल्लख होऊ शकतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे.  

न्यूट्रिशनल न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार अंड्याच्या  सेवनाचे फायदे सांगण्यात आले आहेत. (Health Tips) अंडी सेवन करणा-या नागरिकांवर हे संशोधन करण्यात आले.  यामध्ये 18 ते 75 वयोगटातील 79 व्यक्तींचा समावेश होता. नियमीत अंडी खाणा-या या मंडळींच्या तपासणीनंतर आढळून आले की, अंडी फक्त शरीराला फायदेशीर ठरतात असे नाही  तर मानवी मेंदूलाही तीक्ष्ण करण्यासही मदत करतात.  दररोज अंडी खाल्ल्याने विचार करणे, तर्क करणे, लक्षात ठेवणे, समस्या सोडवणे, निर्णय घेणे यासह अनेक मानसिक क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, अंडी तुमच्या शरीराला अनेक प्रकारे फिट ठेवण्यास मदत करू शकतात. शरीराचे स्नायू मजबूत करण्यासोबतच अंडीही तीक्ष्ण करतात.  त्यामळे एकग्रताही वाढण्यास मदत होते. यासाठी या अहवालात  कारणेही देण्यात आली आहेत. (Health Tips) अंडी नियमीत खाल्ली की, मानसिक क्षमता वाढते त्याचे मुख्य कारण म्हणजे अंड्यांमध्ये असलेले NWT-03 हायड्रोलायझेट प्रोटीन. 

या संशोधकांच्या म्हणण्यानुसार अंड्यातील पिवळ्या बलकांमध्ये कोलीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे मौल्यवान आणि आरोग्य-प्रोत्साहन करणारे फायटोन्यूट्रिएंट्स देखील असतात (Health Tips).  हे पोषक तत्व चांगल्या मानसिक क्षमतेशी जोडलेले असतात. मात्र हे सांगताना या अहवालात फार प्रमाणात पिवळ्या बलकाचे सेवन करणे अपायकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे. शिवाय फक्त अंडी खाण्यापेक्षा अंड्यासोबत हिरव्या पालेभाज्या खाल्या तर त्याचा फायदा अधिक मिळतो, असे नमूद करण्यात आले आहे. अंडी खाल्ल्याने ते एक प्रकारचे इंधन म्हणून काम करते ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो. धावपळीच्या जीवनात अंड्याचे सेवन केल्याने मेंदूला पौष्टिकता मिळते परिणामी अनेक आजारांपासून दूर राहता येते.  

अर्थात हे संशोधन महत्त्वाचे असले तरी जगभरात अंडी (Health Tips) हा अनेकांच्या आहारातला प्रमुख पदार्थ आहे. अंड्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि अनेक पोषक घटक असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीरातील लोहाच्या प्रमाणाचे संतुलन राखण्यासाठी अंड्यांचे सेनव करण्यात येते. साधारण एक अंडे खाल्ल्याने 6 ग्रॅम प्रोटीन मिळते.  बर्‍याच लोकांच्या शरीरात असलेल्या लाहाच्या कमतरतेमुळे डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अशांसाठी रोजच्या आहारातील अंडे हा रामबाण उपाय होऊ शकतो.  अर्थात अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते. पण त्याचे अतिरिक्त सेवन केल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होण्याची शक्यता असते.  त्यामुळे आहारात अंडी किती असावीत याचा सल्ला आहारतज्ञांकडून घ्यावा असे सांगण्यात येते. विशेषतः गर्भवती स्त्रियांना हा सल्ला देण्यात येतो.  

========

हे देखील वाचा : रात्रीच्या वेळी झोपेत घाम येणे आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक, ‘या’ आजाराचे तर लक्षणं नाही ना?

========

अंडी (Health Tips) म्हणजे प्रोटीनचा खजिना आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे, दात आणि नखे कमकुवत होतात. अशावेळीही आहारात अंड्यांचा समावेश केला तर ही कॅल्शियमची कमतरता भरुन निघते.  अंड्यांचा (Health Tips) वापर केसांच्या वाढीसाठीही करण्यात येतो. अनेकवेळा कच्चे अंडे केसांना  कंडीशनर सारखे वापरण्यात येते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत तर होतातच पण केसांना तकाकीही येते. ज्यांना खूप अशक्तपणा जाणवतो त्यांना दुधामध्ये कच्चे अंडे देण्यात येते.  त्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.अर्थात कुठलीही गोष्ट जेवढी चांगली असते, तेवढीच त्याचे अतिरिक्त सेवन शरीराला नुकसान करु शकते. अंडी शरीराला चांगले पोषण देतात, मात्र त्यांचा समावेश आहारात जास्त केला तर ते नुकसानकारकही होऊ शकते.  विशेषतः ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांना अंडी खाण्यापासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात येतो.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.