आपल्या देशात रविवारला आठवड्यामधील शेवटचा आणि सुट्टीचा दिवस मानला जातो. जगातील बहुतांश देशात सुद्धा असेच आहे. पण इस्लामिक देशांमध्ये शुक्रवारला शेवटचा दिवस मानले जाते. तुम्ही कधी असा विचार केला आहे का रविवार ऐवजी सोमवार, अथवा दुसरे दिवस हा आठवड्याचा शेवटचा दिवस का मानला जात नाही? जगातील तमाम देशांसह भारतात ही रविवार हा सुट्टीचा आणि आठवड्याचा शेवटचा दिवस मानला जातो यामागील नक्की कारण काय याचबद्दल आपण जाणून घेऊयात.(Sunday as Weekly Holiday)
भारतात रविवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणून मानला जाण्याची सुरुवात १८४३ मध्ये इंग्रजांनी केली होती. यामागे असा तर्क होता की, रविवारी ख्रिस्ती धर्मात ईश्वराने सहा दिवसात जगाची रचना केली आणि रविवारी त्यांनी सुट्टी घेतली. त्यामुळे हा एक धार्मिक दृष्टीकोन आहे. पण तांत्रिक दृष्ट्या पाहिल्यास रविवार हा आठवड्याचा पहिलाच दिवस असतो. असे मानणाऱ्यांच्या मते आठवड्याच्या सात दिवसांपैकी एक दिवस आराम करण्यासाठी असतो. ख्रिस्ती धर्म मानणारे रविवारी आणि यहूदी समुदाय शनिवारी सामुहिक प्रार्थनेचा दिवस म्हणून मानतात.
लॅटिनच्या मते, रविवार हा सुर्याचा दिवस असते. पश्चिमात्य पौराणिक कथांमध्ये सुर्याला एका देवीच्या रुपात मानले जाते. तर भारतीय संस्कृतीत ही रवि म्हणून सुर्य म्हणून रविवारला त्याचा दिवस मानला जातो. भारतात ही सुर्याला देवाचे स्थान प्राप्त आहे.
भारतात रविवारला सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून जाही करण्यामागे हिंदू अथवा सनातन धर्माची कोणतीही मान्यता नाही. खरंतर ब्रिटिशांच्या काळात इंग्रजांनी रविवारला सार्वजनिक सु्ट्टीचा दिवस म्हणून सुरुवात केली होती. खरंतर त्यावेळी भारतात मिल कामगारांची स्थिती अत्यंत वाईट होती. त्यांचे शोषण केले जायचे. त्यांना कोणतीच सु्ट्टी दिली जात नव्हती. दुसऱ्या बाजूला इंग्रज अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक रविवारी चर्चमध्ये जायचे. तर भारतीयांमध्ये अशी कोणतीच परंपरा नव्हती. त्यानंतर एकेकाळी भारतीय मिल कामगारांचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी ब्रिटिशांना त्यांना रविवार हा सुट्टीचा दिवस असावा म्हणून प्रस्ताव दिला. त्यांनी त्यावेळी असा तर्क लावला की, सहा दिवस सातत्याने काम केल्यानंतर एक दिवस तरी आपल्या समाज आणि देशाची सेवा करण्यासाठी मिळावा. सुरुवातीला इंग्रजांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. मात्र लोखंडे यांनी हार मानली नाही आणि आपली लढाई सुरु ठेवली. अखेर १० जून १८९० मध्ये भारतात पहिल्यांदा रविवारला आठवड्याच्या सुट्टीचा दिवस म्हणून घोषणा करण्यात आली.(Sunday as Weekly Holiday)
हे देखील वाचा- बदलत्या हवामानाचा कॅलिफोर्नियाला तडाखा
इंटरनॅशनल ऑर्गेनाइजेशन फॉर स्टँडर्डाइजेशन ८६०१ च्या मते रविवार हा आठवड्याच्या शेवटचा दिवस असतो. १८४४ मध्ये ब्रिटिश गवर्नर जनरल यांनी रविवारला शाळेसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. यामागे असा तर्क दिला गेला की, सहा दिवस अभ्यास केल्यानंतर मुलांना त्यांच्या पद्धतीने वागण्यासाठी वेळ दिला पाहिजे.