Home » उन्हाळ्यात पोट फुगलेले दिसते आणि भुक ही लागत नाही? ‘या’ गोष्टींचे करा सेवन

उन्हाळ्यात पोट फुगलेले दिसते आणि भुक ही लागत नाही? ‘या’ गोष्टींचे करा सेवन

by Team Gajawaja
0 comment
Summer Tips
Share

उन्हाळ्याचे दिवस आता सुरु झाले आहेत. अशातच त्वचा ते पोटासंबंधित विविध आजार या दरम्यान सतवू लागतात. त्याचसोबत या ऋतूत कमी भूक लागते, पोट नेहमीच भरलेले वाटते, थोडस जरी खाल्लं तरीही पोट फुललेले वाटते, गॅस-अॅसिडिटी अशा समस्या उद्भवतात. तर काही वेळेस शरिराची हालचाल कमी होणे, पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे, जेवणात फायबरची कमतरता यामुळे तुमची चयापचनाची क्रिया प्रभावित होते. यामुळे गॅस आणि सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्ही दररोज खात असलेल्या काही गोष्टींमध्ये उन्हाळ्याच्या दरम्यान बदल केला तर वरील समस्यांपासून दूर राहता येईल. (Summer Tips)

-दही
दह्यात लॅक्टोबॅसिलस, एसिडोफिलस आणि बिफिडस सारखे बॅक्टेरिया असतात. जे चयापचयाच्या क्रियेतमदत करतात आणि गॅस-सूज सारख्या समस्या दूर ठेवतात. जेवणानंतर साखर नसलेले दही खाल्ल्यास पोटाचे विकार होण्यापासून ही तुम्ही दूर राहता.

-कलिंगड
कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते. हेच कारण आहे की, उन्हाळ्यात कलिंगड भरपूर प्रमाणात खाल्ला पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरिरात पाण्याची निर्माण झालेली कमतरता ही भरुन काढली जाईल. यामध्ये असलेले पोटॅशियम ब्लोटिंग आणि गॅस कंट्रोल करण्यास मदत करतात.

-हळद
पचनासंबंधित सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे हळद. यामध्ये असलेले एँन्टी-इंफअलेमेटरी एजेंट्स असतात जे सूज येण्याची समस्या कमी करतात.

-पालक
पालक हा फायबरचा एक मोठा स्रोत असल्याचे मानले जाते. यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. पोट फुगण्याची समस्या ही कमी करतो. लक्षात ठेवा की, पालक हा कधीच कच्चा खाऊ नये. यामुळे पचनासाठी त्रास होऊ शकतो.

-अननस
अननसात ८५ टक्के पाणी असते. यामध्ये ब्रोमेलॅन नावाचे एक पाचक एंजाइम सुद्धा असते जे तुमच्या पाचन तंत्राला स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. अननसामुळे तुमची त्वचा अधिक तरुण आणि चमकदार ही राहण्यास मदत होते. (Summer Tips)

-लिंबू
लिंबू पोटासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. उन्हाळ्यात पोटाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करा. लिंबू पाणी थोडे खारटंच असू द्या, जेणेकरुन तुमचे आतडे यामुळे स्वच्छ होईल आणि सूजेच्या त्रासापासून तुम्ही दूर रहाल.

हे देखील वाचा- उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी ‘या’ गोष्टी जरुर फॉलो करा

-बडीशोप
बडीशोप तुम्ही खालेल्या पदार्थांचे पाचन करण्यास मदत करते. तसेच गॅस-पोट फुगण्याच्या समस्यांपासून दूर ठेवते. हेच कारण आहे की, जेवणानंतर बडीशोप खाण्याचा सल्ला दिला जातो.

-काकडी
काकडीमध्ये विटामिन सी चे प्रमाण भरपूर असते. तसेच शरिरात पाण्याची कमतरता भासत असेल तर त्यावेळी तुम्ही जरुर काकडी खा. काकडीचे सेवन केल्याने सूज येण्याच्या समस्येपासून दूर राहता येते. या व्यतिरिक्त पोटासंबंधित विकार ही दूर राहतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.