Summer Tips : उन्हाळ्यात सूर्याच्या किरणांमुळे अधिक प्रमाणात त्वचेचे नुकसान होत असल्याने बहुतांशजण सनस्क्रिन लावतात. याशिवाय उन्हाळ्यात त्वचेची चमक कमी झाल्याने चेहरा काळवंडलेला दिसतो. अशातच उन्हाळ्यात त्वचा स्वच्छ करण्यासाठी घरच्याघरी हळद आणि टोमॅटो फेसपॅक तयार करू शकता. उन्हाळ्यात तुम्ही चेहऱ्याचा रंग बदलल्याने काहीजण त्रस्त होतात. अशातच त्वचा डीप क्लिन करणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरुन त्वचा उजळ होते.
टोमॅटो आणि हळदीच्या फेसपॅकचे फायदे
औषधीय गुणांनी भरपूर असलेल्या हळदीचा आरोग्यासाठी फायदा होतो. पण त्वचेसाठीही हळद फार उपयुक्त असते. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही हळदीचा वापर करून टॅनिंग दूर करू शकता. टोमेटो आणि हळदीचा फेसपॅक तुमच्या त्वचेला चमक आणते.
उघडलेले पोर्स बंद करण्यासाठी टोमॅटो आणि हळदीचा पॅक त्वचेवर लावू शकता. खरंतर, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. याशिवाय सनबर्नची समस्या अधिक असल्यास टोमॅटोचा वापर त्वचेवर करू शकता. (Summer Tips)
असा तयार करा टोमॅटो आणि हळदीचा पॅक
टोमॅटो आणि हळदीचा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा रस आणि हळद मिक्स करा. यामध्ये नारळाचे तेलही मिक्स करा. जेणेकरुन तिमचा फेसपॅक तयार होईल. तयार केलेला फेसपॅक त्वचेवर 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.