गरमी आणि रखरखत्या उन्हात ड्रेस आणि जाड कपड्यांना राम राम ठोका आणि हलके हवेदार वस्त्र घाला. असे म्हणताच महिलांच्या डोळ्यासमोर हलक्या साड्या आल्याच असतील! हलक्या रंगाच्या साड्या उन्हाळ्यासाठी योग्य असतात. तसेच तुम्ही त्यांना दररोज परिधान करू शकता. साड्या या विविध प्रकारच्या कापडांमध्ये उपलब्ध आहेत. तागापासून ते कापूस आणि मलमलपर्यंतचे हे सर्व कापडप्रकार उन्हाळ्यात वापरायोग्य असतात. (Summer Styles Saree)
चला तर मग जाणून घेऊया, अशा ५ प्रकारच्या साड्यांबद्दल, ज्या तुम्ही उन्हाळ्यात अवश्य परिधान कराव्यात.
अर्दी टोन्स
रखरखीत उन्हात अर्दी टोन्स साड्या चांगल्या दिसतात. या साड्या डोळ्यांना त्रास देत नाहीत आणि यांना स्टाईल करणे देखील सोपे आहे. या प्रकारच्या साड्या तुम्ही स्टायलिश ब्लाउजसोबत मॅच करू शकता. यामुळे तुमचा लूकही छान दिसेल आणि वापरायलाही एकदम छान वाटतील. (Summer Styles Saree)
फ्लोरल प्रिंट
शिफॉन किंवा क्रेप मटेरिअलमधील फुलांच्या साड्याही उन्हाळ्यात खूप चांगल्या असतात. रिफ्रेशिंग फ्लोरल प्रिंट्स नेहमीच फॅशनेबल दिसतात. तुम्ही या साड्या कधीही नेसू शकता. तुम्ही या साड्या स्लीव्हलेस किंवा फुल स्लीव्ह ब्लाउजसोबत परिधान करू शकता. ज्या पाहायला अतिशय सुंदर वाटतात.
पेस्टल प्रिंट्स
उन्हाळ्यात पेस्टल प्रिंटच्या साड्या सर्वात सुंदर दिसतात. या साड्या केवळ डोळ्यांनाच छान दिसत नाहीत, तर त्या परिधान करणार्यालाही आरामदायी वाटतात. त्यामुळे उन्हाळ्यात पेस्टल साड्या नक्की खरेदी करा. तुम्ही या साड्या कॉन्ट्रास्ट ब्लाउजसोबत मॅच करू शकता. (Summer Styles Saree)
पिवळा रंग
पिवळा रंग उन्हाळ्यात कधीही वाईट दिसू शकत नाही आणि ना तो आऊट ऑफ स्टाईल असतो. या फोटोमध्ये मॉडेलने निखळ म्हणजेच सी-थ्रू पिवळी साडी नेसलेली आहे. ही साडी तिने सिक्विन वर्क ब्लाउजसह स्टाइल केली आहे. डिझायनर सब्यसाचीच्या कलेक्शनमध्ये तुम्ही हे कलेक्शन देखील पाहू शकता. (Summer Styles Saree)
खास प्रसंगासाठी साडी
तुम्हाला उन्हाळ्यात लग्न किंवा एखाद्या खास कार्यक्रमाला हजेरी लावायची असेल, तर तुम्ही अशा प्रकारची साडी नेसू शकता. साडीला स्पेशल वर्क ब्लाउजसोबत परिधान करा. गुलाबी, पिवळा, हलका निळा, पीच असे रंग उन्हाळ्यात चांगले दिसतात. विशेष म्हणजे, हे रंग जास्त खुलून दिसतात. तर हे नक्कीच ट्राय करा.