Home » Sunglasses : उन्हाळासाठी सनग्लासेस खरेदी करायचे…? त्याआधी हा लेख नक्की वाचा

Sunglasses : उन्हाळासाठी सनग्लासेस खरेदी करायचे…? त्याआधी हा लेख नक्की वाचा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sunglasses
Share

उन्हाळ्यातील उष्णता आपल्या संपूर्ण शरीरासाठी खूपच त्रासदायक असते. अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवावर या उन्हाचा परिणाम होत असतो. काही वेळेला हे परिणाम आपल्याला जाणवतात तर काही वेळेला आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. या उन्हापासून आपला बचाव प्रत्येकानेच केला पाहिजे. उन्हाचा परिणाम जसा आपल्या शरीरावर होतो तसा तो डोळ्यांवर देखील होतो. उन्हाळ्यात अल्ट्रा व्हायलेंट किरणांचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. (Sunglasses)

उन्हाळ्यात आपल्या शरीरासोबतच आपण आपल्या डोळ्यांचीही काळजी योग्य प्रकारे घेतली पाहिजे. कारण, डोळा हा अत्यंत नाजूक अवयव आहे. तो जितका नाजूक आहे तितकाच तो महत्त्वाचाही आहे. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी उन्हाळ्यात गॉगल घालणे फायदेशीर ठरू शकते. उन्हाळ्यात सनग्लासेस किंवा गॉगल वापरण्यास देखील सांगितले जाते. आपल्या डोळ्यांना UVA आणि UVB किरणांपासूनही संरक्षण मिळावे यासाठी सनग्लासेस वापरणे फायदेशीर ठरते. सनग्लासेस वापरण्याचे अनेक फायदे आपल्याला होतात. (Top Stories)

अतिनील किरणांपासून रक्षण
उन्हाळ्यात गॉगल घालण्याचं मुख्य कारण म्हणजे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण करणं. या किरणांच्या दीर्घकाळापर्यंतच्या एक्स्पोझरमुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये मोतीबिंदू, मॅक्युलर डिजेनेरेशन आणि फोटोकेरायटिस आदी समस्या मुख्यत्वे येतात. जर UV protection असलेला गॉगल घातल्यास या समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. (Marathi News)

Sunglasses

डोळ्यांची जळजळ कमी होते
उन्हाळा हा ऋतू डोळ्यांसाठी किल्ष्ट असतो. उन्हाळ्यात डोळ्यांसाठी अपायकारक असलेल्या गोष्टी जसे की, हवेतील धूळ, परागकण आणि इतर ऍलर्जिनचे प्रमाण जास्त असते. गॉगल घातल्याने हे कण डोळ्यांमध्ये जात नाही. इनफ्लेमेशन, लालसरपणा, डोळ्यांना खाज सुटण्याचा धोका देखील गॉगलमुळे अनेक प्रमाणात कमी होतो. (Marathi Latest News)

==========

हे देखील वाचा : Wood Carving : काशीची काष्टकला !

==========

डोळे कोरडे होत नाही
उन्हाळ्यात उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे डोळे कोरडे होतात आणि त्यातून डोळ्यांना त्रास होतो. गॉगल घातल्याने डोळे ओलसर राहण्यास मदत तर होतेच सोबतच डोळे कोरडे होण्याचा धोका कमी होतो. (Marathi Top News)

डोळ्यांना दुखापत होत नाही
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर स्विमिंग, हायकिंग, सायकलिंग आदी अनेक आउटडोअर ऍक्टीव्हीटी मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. गॉगल घातल्याने या ऍक्टिव्हिटी दरम्यान डोळ्यांना होणारा त्रास कमी होतो आणि डोळ्यांचे रक्षण करण्यास मदत होते. (Trending News)

दृष्टी वाढवते
गॉगल घातल्याने कॉन्ट्रास्ट सुधारून दृष्टी वाढण्यास मदत होते. जिथे सूर्यप्रकाश अधिक प्रखर तीव्र स्वरूपाचा असतो तिथे गॉगल अधिक प्रभावी ठरतो.

सनग्लासेस निवडताना कोणती काळजी घ्यावी?

फ्रेमचा आकार
सनग्लासेस खरेदी करताना सर्वप्रथम फ्रेमचा आकार पाहिला पाहिजे. सैल फ्रेमचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होतो, तर अधिक घट्ट फ्रेम तुम्हाला अस्वस्थ करू शकते. यासाठी योग्य फ्रेम निवडता आली पाहिजे. (Social News)

चेहऱ्याचा आकार
सनग्लासेस खरेदी करताना आपल्या चेहऱ्याचा आकारही लक्षात ठेवा. आपण स्वतःसाठी असे सनग्लासेस निवडले पाहिजेत, जे आपल्या चेहऱ्याच्या आकाराला शोभतील. ज्यामुळे आपला चेहरा अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यास मदत होईल. (Social update)

युव्ही प्रोटेक्शन
जर तुम्ही उन्हात सनग्लास लावत असाल तर सुर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांपासून बचाव होणे अत्यंत गरेजेचे असते. उन्हात घालण्यासाठी खरेदी केला जाणारा चष्मा हा तुम्हाला युव्ही प्रोटेक्शन देतो की नाही हे पहा. अन्यथा तुमच्या डोळ्यांना नुकसान पोहचू शकते. (Marathi Trending News)

Sunglasses

लेन्सचा रंग
सनग्लासेसच्या लेन्सचा रंग तुमच्या गरजेनुसार निवडला पाहिजे. ग्रे किंवा ब्राउन रंगाच्या लेन्स सर्वोत्तम असतात कारण हे रंग डोळ्यांच्या नैसर्गिक रंगात बदल करत नाहीत. जर तुम्ही भरपूर सूर्यप्रकाशात राहत असाल तर तुम्ही गडद रंगाचे लेन्स निवडू शकता. (Marathi Top News)

लेन्सचा आकार
सनग्लासेसच्या लेन्सचा आकार तुमच्या डोळ्यांच्या आकारापेक्षा थोडा मोठा असावा जेणेकरून ते डोळे पूर्णपणे झाकतील.

=========

हे देखील वाचा : Sweating : जास्त घाम येण्यामुळे चिडचिड होते मग करा ‘हे’ सोपे उपाय

=========
डॉक्टरांचा सल्ला घ्या
सनग्लासेस खरेदी करण्यापूर्वी डोळ्याच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर डोळ्यांची तपासणी करून योग्य प्रकारचे सनग्लासेस निवडण्यात मदत करू शकतात.

लेन्स मटेरियल
सनग्लासेस खरेदी करणार असाल तर त्याचे मटेरियल कसे असेल याची सुद्धा माहिती घ्यावी. ते स्क्रॅच फ्री आहे की नाही हे सुद्धा पहा. बहुतांश लोक रस्त्यावरून एक्रेलिक लेन्स खरेदी करतात. जे तुमच्या डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकते.

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.