Summer Skin Care Advice : उन्हाळ्याच्या दिवसात टोनरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्वेचचा पीएच बॅलेन्स रिस्टोर होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेवर प्रोटेक्टिव्ह लेअरही तयार होते. होममेड टोनरमध्ये काही सुदिंग इंग्रीटिएंट्सचा वापर केला जातो. यामुळे सेंसेटिव्ह त्वेचेची योग्य पद्धतीने काळजी घेण्यास मदत होते.
सेंसेटिव्ह स्किनला उन्हाळ्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी मार्केटमधील टोनरचा वापर केला जातो. अशातच घरच्याघरी तयार केलेले काही टोनर तुम्ही वापरू शकता.
काकडीपासून तयार करा टोनर
उन्हाळ्याच्या दिवसात सेंसेटिव्ह त्वचेसाठी काकडीच्या माध्यमातून टोनर तयार करू शकता. यासाठी एक काकडी आणि एलोवेरा जेलचा वापर करावा लागेल. टोनर तयार करण्यासाठी काकडीचा रस काढून त्यामध्ये एलोवेरा जेल व्यवस्थितीत मिक्स करा. यानंतर झाकण बंद बॉटलमध्ये टोनर टाकून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
एलोवेरा जेलपासून टोनर तयार करा
तुमची त्वचा सेंसेटिव्ह असल्यास एलोवेरा जेलचा वापर करू शकता. यासाठी अर्धा कप एलोवेरा जेल आणि एक कप गुलाब पाण्याचा वापर करा. सर्वप्रथम एलोवेरा जेल घेऊन त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. एका स्प्रे बॉटलमध्ये टोनर भरून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. (Summer Skin Care Advice)
गुलाब पाणी आणि ग्लिसरिनचे टोनर
उन्हाळ्याच्या दिवसात सेंसेटिव्ह त्वचेसाठी गुलाब पाणी आणि ग्लिसरिनची मदत घेऊ शकता. यासाठी गुलाब पाणी आणि ग्लिसरिन मिक्स करुन टोनर तयार करा. अशा प्रकारचे टोनर सेंसेटिव्ह त्वचेसाठी लावल्यास नक्कीच त्वचेमध्ये फरक दिसेल.