दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत आहे. पुढे तर यापेक्षा जास्त तापमान वाढणार असल्याच्या बातम्या देखील आपण वाचत आहोत. ऊन कितीही वाढले तरी आपल्याला आपले काम सोडून तर चालणार नाही. अनेकांना त्यांच्या कामासाठी बाहेर उन्हात फिरावे लागते. किंवा इतरही अनेक कारणांमुळे उन्हात प्रत्येकाचेच कमी जास्त प्रमाणात जाणे येणे होत असते. उन्हात आपण आपले जाणे टाळू शकत नसलो तरी जाताना काळजी नक्कीच घेऊ शकतो. (Summer)
जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे अनेकदा आपल्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन स्ट्रोक येण्याची देखील शक्यता असते. शिवाय जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड, लहान मुलांमधील जंतुसंसर्ग, गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, मुतखडा, लघवी मार्गाचा जंतुसंसर्ग आदी त्रास देखील होऊ शकतात. अशावेळी आपण छोटे छोटे उपाय करून आपली काळजी नक्कीच घेऊ शकतो. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यावी.(Summer Health)
* उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि एनर्जी टिकवण्यासाठी हायड्रेटेड राहणे खूपच गरजेचे आहे. हे आपल्या पचन आणि उर्जेची पातळी टिकवण्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. उन्हाळ्यात आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते ती पाण्याची. कारण उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी होत असते, आणि म्हणून शरीराला पाण्याची कमतरता भासते. ओआरएस, लस्सी, तांदूळ पाणी, लिंबू पाणी, ताक, नारळपाणी आदी पेय सतत पित राहणे गरजेचे आहे. मात्र मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते.(Summer Health Care)
========
हे देखील वाचा : Dr. Mahrang Baloch : बलूच शेरनीचे नाव नोबेल पुरस्कारासाठी !
========
* उन्हाळ्यामध्ये भरपूर पाण्यासोबतच आवश्यक असते ते सकस जेवण. या ऋतूमध्ये तांदूळ, ओट्स, गहू, जुने तांदूळ, मूग या धान्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. नवीन धान्य कफ वाढवतात तसेच पचनशक्ती कमी करतात. जे धान्य पोषक तत्वांनी समृद्ध आणि फायबर युक्त असेल ते या काळात खाल्ले पाहिजे.(Summer Care Tips)
* योग्य आहारासोबतच उन्हाळ्यात फळं खाणे देखील आवश्यक आहे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आदी उन्हाळ्यातील फळांचे सेवन केलेच पाहिजे. खासकरून ज्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात अशा फळांचा समावेश केला पाहिजे.(Social News)
* उन्हाळ्यात जेवढी भूक आहे त्यापेक्षा थोडे कमी खा, जास्त तेल आणि मसाले असलेले अन्न खाणे टाळा. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.(Marathi Top News)
* बाहेर उन्हात काम करणाऱ्यांनी तर टोपी किंवा छत्री वापरा. सनग्लासेस घाला. कांदा सोबत ठेवा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या. थोड्या थोड्या वेळाने डोके, मान, चेहरा, हातपाय सतत ओलसर रुमालाने पुसत राहा. (Marathi Latest News)
* उन्हाळ्यात अनेकांना डोळ्यांचा त्रास होतो. कॉम्पुटरवर काम करताना डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी संरक्षणात्मक चष्मा घाला. कमीत कमी ९९% अल्ट्राव्हायोलेट किरणांना रोखणाऱ्या बाहेरील सनग्लासेस घाला.(Marathi Top Stories)
* उन्हाळ्यात चांगली झोप घेणे देखील आवश्यक असते. म्हणून योग्य वेळेत झोपा आणि झोपताना स्किन केयर नक्की करा. झोपेचे चांगले रुटीन बनवा आणि त्याचे पालन करा.
======
हे देखील वाचा : Five Eyes : फाइव्ह आयज आणि भारत !
======
* उन्हाळ्यात व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. चालणे, सायकलिंग करणे, पोहणे, एरोबिक्स असा व्यायाम या ऋतूमध्ये करावा. या ऋतूमध्ये योगा करणे देखील फायदेशीर ठरते.
* उन्हाळ्यात बाहेर फिरणे टाळावे, दिवसा झोपू नये, चंदनाचा लेप कपाळावर लावावा, हलके आणि पातळ वस्त्रे परिधान करावेत.