Summer Health Care : उन्हाळ्याच्या दिवसात दह्याचे सेवन भरपूर सेवन केले जाते. यापासून काही पदार्थही तयार केले जातात. खरंतर, दही आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानले जाते. पण दह्याचे सेवन करण्याची योग्य वेळ आणि नियम देखील आहे. आयुर्वेदानुसार, चुकीच्या वेळेस दह्याचे सेवन केल्यास आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. यामुळेच दह्याचे सेवन करताना कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
दह्याचे सेवन करताना करू नका या चुका
-हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते दही कधीच गरम करू नका. यामुळे दह्यातील गुणधर्म नष्ट होतात.
-ज्या लोकांना कफ किंवा इंफ्लेमेशनची समस्या असते त्यांनी दह्याचे सेवन करू नये.
-जर तुमचे वजन वाढलेले असल्यास दह्याऐवजी ताकाचे सेवन करू शकता.
-उन्हाळ्यात दररोज दह्याचे सेवन करणे टाळावे.
-ताकामध्ये सैंधव मीठ, काळी मिरी पावडर, पुदिन्याची पाने आणि जीरे पावडर मिक्स करुन प्यावे.
-दह्यासोबत फळे अजिबात खाऊ नका. खरंतर, दह्यासोबत फळं खाल्यास तुमचा मेटाबॉलिज्म मंदावला जाऊ शकतो. अशातच काही अॅलर्जीही होऊ शकते.
-हेस्थ एक्सपर्ट्सच्या मते, दह्याचे रात्रीच्या वेळेस सेवन करणे टाळावे. (Summer Health Care)
-दही नॉनव्हेजसोबत मिक्स करून शिजवणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. यामुळे शरिरात टॉक्सिन्स जमा होऊ लागतात.