कोणताही ऋतू असो महिला कधीच आपल्या फॅशनकडे दुर्लक्ष करत नाहीत. परंतु सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने आपण किती ही प्रयत्न केला तरी योग्य फॅब्रिक्सचे कपडे निवडू शकलो नाही तर कंम्फर्ट निघून जातो. तसेच उन्हामुळे येणाऱ्या घामामुळे अजूनच त्रास होतो. त्यामुळेच तुम्ही जेव्हा उन्हाळ्यात आउटफिट कोणते घालायचे किंवा कोणते निवडायचे असा विचार करत असाल तर थांबा, आम्ही तुम्हाला याच बद्दल अधिक सांगणार आहोत. कारण उन्हाळ्यात कधीच अशा फॅब्रिक्सची निवड करु नका ज्यामुळे अधिक घाम येईलच आणि तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवेल. (Summer Fashion)
-पॉलिस्टर
उन्हाळा असो किंवा थंडीचे दिवस तुम्हाला बाजारात पॉलिस्टर फॅब्रिक पासून तयार करण्यात आलेले विविध टॉप्स, कुर्ते अथवा ड्रेसेस आराम मिळतात. परंतु जर तुम्ही उन्हाळ्यात पॉलिस्टर कापड असलेले कपडे घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्लास्टिक अंगावर घातल्याचा अनुभव येईल. या कपड्यामुळे उन्हात तुम्हाला अधिक घाम येईल आणि असे कपडे अंगाला चिकटतात. यामुळे स्किन इंफेक्शन, रॅशेज अशी समस्या उद्भवू शकते.
-रेयॉन
रेयॉन हे एक नैसर्गिक सेलूलोज असून ते लाकूड अथवा बांबूच्या लगद्यासारख्या विविध गोष्टींपासून तयार केले जाते. ते तयार करण्यासाठी सोडियम हाइड्रॉक्साइड आणि कार्बन डाइसल्फाइडसह काही प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातो. तांत्रिक रुपात हे पूर्णपणे सिंथेटिक नसते. तुम्हाला बाजारात विस्कोस, लियोसेल सारखे रेयॉन मटेरियल मिळेल. परंतु तुम्ही जर लिनन रेयॉनचे कपडे घेतले तर तो बेस्ट ऑप्शन ठरेल. परंतु अन्य रेयॉनच्या कपड्यांमध्ये घाम तसाच शरिराला चिकटून राहिल.
-डेनिम
डेनिम आउटफिट्स हे संपूर्ण वर्षभर घातले जातात. खरंतर डेनिमचा कापड हा जाड असतो आणि त्वचेला आवळला जातो. परंतु डेनिममध्ये विविध प्रकार ही पहायला मिळतात. अशातच तुम्हाला उन्हाळ्यात डेनिमचे कपडे घालायचे असेल तर कॉटन बेस्ड डेनिम फॅब्रिक घालू शकता. खरंतर अशा प्रकारच्या फॅब्रिकमध्ये कॉटन फॅब्रिकला डेनिमचा लूक दिला जातो. परंतु डेनिमच्या जीन्स अथवा शर्ट घालणे उन्हाळ्यात तरी टाळा.(Summer Fashion)
-नायलॉन
नायलॉनचे कपडे हे वजनाने अत्यंत हलके असतात. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात या कपड्यांमध्ये अधिक गरम होते. तसेच असे कपडे घामामुळे अंगाला चिकटतात. नायलॉन ऐवजी तुम्ही सिल्क फॅब्रिकचा वापर करु शकता. तर नायलॉनचा कापड घाम शोषून घेत नाही.
हे देखील वाचा- कॉटनसह फॅब्रिक कपड्यांना इस्री करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
-सॅटिन
सॅटिनचे कापड हे घातल्यानंतर आलिशान वाटते. परंतु उन्हाळ्यात तुम्ही सॅटिनचे कापडे घालणे टाळा. असे कपडे घालतल्याने ते चिकटतात आणि आपल्याला कंम्फर्टेबल वाटत नाही. बाजारात तुम्हाला सॅटिन फॅब्रिकचे कपडे खुप मिळतील. असे कपडे तुम्ही पार्टीला घालू शकता.