उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. वाढत्या उन्हामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खासकरून त्वचेशी संबंधित अनेक समस्या उन्हाळ्यात वाढायला लागतात. घामोळ्या येणे, स्किन टॅन होणे, सनबर्न होणे आदी अनेक त्वचेच्या समस्या उन्हाळ्यात डोकेदुखी ठरतात. चेहऱ्यावर तर सर्रास टॅनिंग आणि सनबर्न होते. याचा खूपच त्रास होतो आणि चेहरा देखील खराब दिसतो. मी यावर काही सोपे आणि साधे उपाय आहेत का? अहो आहेत का काय विचारताय तुम्ही गाजावाजा फॉलो करतात ना…मग आम्ही तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारच. चला मग जाणून घेऊया उन्हाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी घरगुती पॅक आणि उपाय कोणते आहेत.
लिंबू, मध आणि दही पॅक
एका भांड्यात थोडे दूध, मध आणि लिंबाचा रस घ्या. आता हे सर्व पदार्थ नीट एकत्र करून मिश्रण चांगले मिक्स करा. हा पॅक आता टॅनिंग झालेल्या भागावर लावायचा. पॅक कोरडा झाल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
हळद आणि बेसन पॅक
हा पॅक बनवण्यासाठी थोडी हळद, थोडे गुलाबपाणी, थोडे दूध घ्या त्यात गरजेनुसार बेसन टाकून नीट एकजीव करून घ्या. आता जिथे टॅनिंग झाले असेल तिथे हा पॅक लावा आणि कोरडा झाल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा पॅक तुम्ही एक दिवस आड देखील लावू शकतात.
बटाटा
त्वचेवरील टॅन दूर करण्यासाठी बटाटा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. यात असलेले कॅटेकोलेज नावाचे रसायन त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी, कच्च्या बटाट्याची पेस्ट तयार करायची आणि टॅनिंग झालेल्या ठिकाणी लावायची. थोडावेळ राहू द्यायची आणि नंतर थंड पाण्याने धुवून काढायचे.
============
हे देखील वाचा : Sweat Smell : चारचौघात घामाच्या दुर्गंधीमुळे ओशाळलेपणा जाणवतो….? मग करा ‘हे’ सोपे उपाय
============
कच्चे दूध
टॅनिंग दूर करण्यासाठी कच्चे दूध अतिशय उपयुक्त आहे. या दुधात हळद आणि लिंबाचा रस घालून पॅक टायर करायचा. हा पॅक नैसर्गिक टॅन रिमूव्हर आहे. हा पॅक टॅन झालेल्या भागावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. पॅक कोरडी झाल्यानंतर धुवा.
कोरफड
चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी कोरफडी अतिशय प्रभावी उपाय आहे. कोरफड आपल्या त्वचेसाठी किती बहुगुणी हे काही वेगळे सांगायची गरज नाही. एलोवेरा जेल चेहऱ्यावर किंवा टॅन झालेल्या जागेवर लावा आणि १५ – २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.
============
हे देखील वाचा : Heatstroke : उन्हाळ्यात उष्मघातापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
============
दही
सनबर्न आणि टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी दही देखील उत्तम पर्याय आहे. दह्यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंगची समस्या दूर होते. थंड दही घेऊन ते १५ – २० टॅनिंग झालेल्या भागावर लावून ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या )