Home » लोकांना करोडो रुपयांना गंडवणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण?

लोकांना करोडो रुपयांना गंडवणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण?

by Team Gajawaja
0 comment
Sukesh Chandrashekhar
Share

महाचोर सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून फारच चर्चा सुरु आहे. त्याचसोबत त्याच्या संदर्भात झालेले विविध खुलासे हे सुद्धा धक्कादायक होते. ३२ वर्षीय सुकेशकडे पाहून कोणालाही वाटणार नाही की तो खुप चतुर आहे. परंतु जेव्हा त्याच्या काही गोष्टी समोर आल्या तेव्हा सर्वजण हैराण झाले. त्याला २०० कोटींच्या गफलतीमुळे त्याला दिल्लीतील एका तुरुंगात ठेवण्यात आले होते. ऐवढेच नव्हे तर तुरुंगात राहून सुद्धा त्याने लोकांची फसवणूक करणे सोडले नाही.

सुकेश ज्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचा की त्यांना आपण फसत आहोत हे कळायचेच नाही. परंतु जेव्हा ईडी आणि दिल्ली पोलिसांकडून त्याला अटक केल्यानंतर जी चौकशी केली तेव्हा असे काही खुलासे झाले की ते सुद्धा हैराण झाले. सुकेश चंद्रशेखर याने रॅनबॅक्सी कंपनीच्या माजी चेअरमॅन शिवसेंद्र सिंग यांची पत्नी अदिती सिंह हिच्याकडून जबरदस्तीने वसूली केली होत. कथित रुपात सुकेशनने अदिती यांच्याकडून २०० कोटी रुपयांची वसूली केली होती. सुकेशने अदितीला तिच्या नवऱ्याला तुरुंगातून बाहेर काढतो असे सांगून आपल्या जाळ्यात ओढले होते. खरंतर यामधील धक्कादायक बाब अशी की, एका फसवणूकीच्या प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असताना सुद्धा त्याने ही वसूली केली होती.

स्वत: ला मंत्रालयातील अधिकारी म्हणून सांगत फिरायचा
सुकेश जेव्हा अदिती हिच्यासोबत बोलायचा तेव्हा तो स्वत:ला पीएमओ आणि गृहमंत्रालयातील तैनात अधिकारी असल्याचे सांगायचा. या सर्व गोष्टींसाठी तो वॉइस मोड्युलेटिंग सॉफ्टवेयरचा ही वापर करत होता. त्याने मंत्रालयासंबंधित काही क्रमाकांची कॉपी केली होती त्यामुळे कॉल करतेवेळी कोणाला संशय येऊ नये. हे सर्व काम सुद्धा ते तुरुंगातूनच करत होता.

या व्यतिरिक्त सुकेश याने बॉलिवूडमधील काही अभिनेत्र्यांना ही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये अभिनेत्री जॅकलीन हिचे नाव अधिक चर्चेत होते. यासाठी जॅकलिन हिला सुकेशच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी सुद्धा बोलावण्यात आले होते. प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आणि तपासादरम्यान असे समोर आले की, सुकेश चंद्रशेखर हा जॅकलीनवर पाण्यासारखा पैसा उधळायचा.

हे देखील वाचा- करिअर ऐनभरात असताना पडद्यावरुन गायब झाली होती आएशा कारण…

Sukesh Chandrashekhar
Sukesh Chandrashekhar

कोण आहे सुकेश चंद्रशेखर
लोकांना फसवून, आपल्या जाळ्यात ओढून करोडीची माया जमा करुन मालक झालेल्या सुकेशचा (Sukesh Chandrasekhar) जन्म बंगळुरुतील. तो एक मध्यमवर्गीय घरात जन्मलेला आहे. सुकेशच्या वडिलांचे सुद्धा काही काळापूर्वीच निधन झाले आहे. एका मध्यमवर्गीय परिवाराचा वारसदार म्हणून आपल्या मुलाने सुद्धा उत्तम शिक्षण घ्यावे अशी सुकेशच्या वडिलांची इच्छा होती. परंतु १२ वी नंतर सुकेशने शिक्षण सोडले आणि रियल इस्टेट सेक्टरमध्ये काम सुरु केले होते. सुकेशला कारचे खुप वेड आहे. जेव्हा तरुण वयापासूनच तो कारच्या रेस आयोजित करु लागला होता.

वयाच्या १७ व्या वर्षापासून चोरी
सुकेशने वयाच्या १७ व्या वर्षापासूनच एक बनावट अधिकारी म्हणून लोकांना लुबाडण्यास सुरुवात केली होती. २००७ मध्ये त्याने फोनवर स्वत:ला उच्च अधिकारी सांगून बंगलोर विकास प्राधिकरणात काम करत असल्याचे सांगत १०० लोकांहून अधिक लोकांना लुडाबले पण त्याचा सुद्धा खुलासा झाला. २००७ मध्ये त्याला पहिल्यांदाच बंगळुरुतील बन्नेरघट्टा पोलिसांनी अटक केली होती.तुरुंगात जाऊन सुद्धा सुधारण्याऐवजी त्याने पुढे सुद्धा लोकांना लुबाडणे सुरुच ठेवले होते. फक्त या सर्व गोष्टी तो मोठ्या स्तरावर करत होता. या दरम्यान त्याने काही मित्र सुद्धा जोडले आणि ते सुद्धा त्याला या सर्व कामांमध्ये मदत करु लागले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.