आमचा मुलगा मोठा होऊन इंजिनिअर-डॉक्टर होणार असे प्रत्येकजण बोलतो. मात्र ही एक प्रकारची जबाबदारी असून जी मुलांच्या खांद्यावर टाकली जाते. पण शाळेत जाणाऱ्या मुलाला हे तेव्हापासून सांगितले तर तो त्याची स्वप्न कशी पूर्ण करणार? त्याला ज्या क्षेत्रात शिकायचे आहे ते कसे होणार? त्याने पाहिलेले स्वप्न हे कधीच पूर्ण होणार नाही अशी खंत सुद्धा मनात राहते पण घरातल्या मंडळींनी ठरवलेले करावे लागेल असा ही विचार काही विद्यार्थी करतात. अशातच कोटा फॅक्ट्ररी म्हणून ओटीटीवर एक वेबसीरिज ही आली होती. त्यामध्ये आयआयटी आणि नीटच्या परिक्षेसाठी किती काय काय करावे लागते हे दाखवण्यात आले आहे. मात्र त्या परिक्षा पास होण्यासाठी आपलं मुलं तेवढं सक्षम आहे का याचा सुद्धा पालकांनी विचार केला पाहिजे.(Suicides in Kota)
आयआयटी आणि नीटच्या स्वप्नांमध्ये ऐवढी हवा भरली जाते की, मुलांना कोटा येथे शिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी तीन विद्यार्थ्यांनी येथे आत्महत्या केली. पण आयुष्यात त्यांना काही तरी वेगळे करायचे होते. या तिघांच्या आत्महत्येमागील कारण समोर आले ते हैराण करणारे होते. त्यांच्यावर अभ्यासाठी दबाव टाकला जात असल्याने ते तणावाखाली होती आणि काही दिवसांपासून कोचिंग क्लास किंवा कॉलेजमध्ये सुद्धा जायचे नाहीत.
प्रत्येक वर्षी वाढतोय आत्महत्येचा दर
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार प्रत्येक वर्षी देशात विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आत्महत्या करतात. गेल्या पाच वर्षातील आकडे पाहिल्यास तर २०१७ मध्ये जेथे ९९०५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती, तर २०१८ मध्ये त्याचा आकडा वाढून १०,१५९ वर पोहचला होता. २०१९ मध्ये १०,३३५, २०२० मध्ये १२,५२६ वर पोहचला होता. तर २०२१ मध्ये देशात एकूण १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तर २०२० ते २०२१ मध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती त्यावेळी कोरोनाची स्थिती होती. बहुतांश विद्यार्थी घरुनच अभ्यास करत होते. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, हॉस्टेल मध्ये राहण्याऐवजी जेव्हा विद्यार्थी घरी राहून अभ्यास करत होते तेव्हा आत्महत्या करण्याचा दर हा अधिक होता. एनसआरबीच्या आकडेवारीत आणखी एक बाब समोर आली की, आत्महत्या करणऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांची संख्या अधिक होती.(Suicides in Kota)
हे देखील वाचा- जगातील लोकसंख्या वाढून ८ करोड झाली खरी पण मोजली कशी? जाणून घ्या अधिक
या पाच राज्यातील विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आकडा अधिक
विद्यार्थ्यांच्या आकडेवारीतील प्रकरणांमध्ये देशातील जी पाच राज्य सर्वात वर आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशाचा समावेश आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२१ मध्ये महाराष्ट्रातील १८३४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तर मध्य प्रदेशातील १३०८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तर तमिळनाडूतील १२४६, कर्नाटक ८५५, ओडिशा मधील ८३४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. पण एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला नाही की, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय होते. मात्र हे जरुर सांगितले आहे की, वर्ष २०२१ मध्ये ज्या १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांचे वय १८ वर्षापेक्षा कमी होते.