Home » शुगर डिटॉक्सचे ‘हे’ आहेत फायदे

शुगर डिटॉक्सचे ‘हे’ आहेत फायदे

साखर आपल्या शरीराला उर्जा देण्याचे काम करते. ती आपल्या बॅलेन्स्ड डाएटचा सुद्धा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. परंतु एनर्जीच्या नावाखील एडेड शुगर युक्त खाद्य पदार्थ आणि रिफाइंड शुगरचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

by Team Gajawaja
0 comment
Sugar Detox
Share

बहुतांश लोक आपल्या खाण्यापिण्यात रिफाइंड शुगरचा वापर करतात. परंतु हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. काही लोक असा विचार करतात डाएटमध्ये रिफाइंड शुगरचे प्रमाण कमी केल्याने आरोग्याला नुकसान पोहचत नाही. पण कमी प्रमाणातील साखर सुद्धा तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकते. त्यामुळेच शुगर डिटॉक्स म्हणजे नक्की काय हे पाहूयात. (sugar detox)

साखर आपल्या शरीराला उर्जा देण्याचे काम करते. ती आपल्या बॅलेन्स्ड डाएटचा सुद्धा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. परंतु एनर्जीच्या नावाखील एडेड शुगर युक्त खाद्य पदार्थ आणि रिफाइंड शुगरचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. खरंतर आपल्या शरीराला नॅच्युरल साखरेचे गरज असते. पण नैसर्गिक साखर ही मॉडरेशनमध्ये घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

शुगर डिटॉक्सचे फायदे काय आहेत?
शरीरातील एक्स्ट्रा फॅट आणि पाणी कमी होते
जेव्हा आपण नैसर्गिक आणि मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करतो तेव्हा शरीरातील साखर ही ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते. त्यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते. मात्र तुम्ही गरजेपेक्षा अधिक साखरेचे सेवन करत असाल तर शरीरात एक्स्ट्रा फॅट जमा होतात. हे एक्सिस फॅट एडिपोज टिश्यू मध्ये जमा होतात. यामळे वजन वाढण्याची शक्यता वाढली जाते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करावे.

अत्याधिक साखरेचे सेवन वॉटर रिटेंशनचे कारण ठरू शकते
जेव्हा तुम्ही अत्याधिक प्रमाणात साखर किंवा साखरयुक्त पदार्थांचे सेवन करता तेव्हा शरीरातील पाणी रोखले जाऊन साखरेला डाइल्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे वॉटर रिटेंशनची समस्या निर्माण होते. ही स्थिती ब्लोटिंगसोबत वेट गेनचे सुद्धा कारण ठरू शकते. या व्यतिरिक्त वॉटर रिटेंशनच्या कारणास्तव एडिमा म्हणजेच पायांना सूज येणे, डोळ्यांखाली सूज येणे, चालण्यास समस्या येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

पण जेव्हा आपण मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करतो तेव्हा शरीरातील पाणी बाहेर जाण्यास सुरुवात होते.तसेच ब्लोटिंगची स्थिती सुधारली जाते. ऐवढेच नव्हे तर हे एकूणच वजन ही कमी करते. (sugar detox)

शुगर क्रेविंग्स कमी होते
शुगर डिटॉक्सनंतर तुम्हाला सर्वाधिक पॉझिटिव्ह गोष्ट अशी पहायला मिळेल की, तुमची शुगर क्रेविंग अगदी कमी झाली असेल. त्याचसोबत असे केल्याने तुम्ही मानसिकरित्या मजबूत होता. तुमचे कामात लक्ष, एकाग्रता वाढली जाते.

बॉडी इंन्फ्लेमेशन कमी होते
साखर शरीरातील इंन्फ्लेमेशनला ट्रिगर करते आणि क्रोनिक हेल्थ कंडीशन्ससह दुखणे वाढवते. अशातच शुगर डिटॉक्सच्या माध्यमातून तुम्ही शरीरात इंन्फ्लेमेशनला कमी करू शकता. यामुळे दुखण्यापासून आराम मिळेल.


हेही वाचा- पाणी पिण्याच्या वेळाही करतात आरोग्यावर परिणाम


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.