Home » सुधा मूर्ती: उत्तम मार्गदर्शक म्हणून नेहमीच टाटांबद्दल आदर वाटतो

सुधा मूर्ती: उत्तम मार्गदर्शक म्हणून नेहमीच टाटांबद्दल आदर वाटतो

by Correspondent
0 comment
Share

एका सामन्य कुटुंबात जन्म घेऊन, स्वतःची एक वेगळी यशस्वी गोष्ट निर्माण करत भारतीयांपुढे एक उत्तम उदाहरण निर्माण करणाऱ्या सुधा कुळकर्णी-मूर्ती (Sudha Murty) यांचा आज जन्म दिवस. १९ ऑगस्ट १९५०, शिगगाव कर्नाटक मध्ये सुधा कुळकर्णी यांचा जन्म झाला. विमल कुळकर्णी आणि डॉ.आर.कुळकर्णी यांच्या सोबतच भाऊ श्रीनिवास कुळकर्णी, बहीण जयश्री कुळकर्णी-देशपांडे यांच्या सह सुधा कुळकर्णी अगदी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य कुटुंबात वाढल्या.

Sudha Murty

लहानपण कर्नाटकातल्या छोट्याश्या गावात गेलं, त्यामुळे करमणुकीसाठी पुस्तक हाच त्यांचा आधार होता. लहानपणा पासून पुस्तक वाचनाची आवड असल्यामुळे, हळूहळू त्यांच्या लेखणीतही एक वेगळी शैली निर्माण होत गेली. लहानपणी शाळेत असताना उत्तम निबंध लिहिण्यासाठी बक्षीसं मिळवलेल्या सुधा मूर्तींची लिखाणाची आवड वाढत गेली. कन्नड भाषेवर तेव्हा त्यांचे जास्त प्रभुत्व होते; पण आज कन्नड सोबतच मराठी आणि इंग्रजीतील त्यांनी लिहिलेली पुस्तकं सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत. साधी, सोपी भाषा शैली हे त्यांच्या लिखाणाच्या लोकप्रियतेचंखरं गमक म्हणता येइल. अस्तित्व, आजीच्या पोतडीतील गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, ओल्ड मॅन अँड हीज गॉड, कल्पवृक्षाची कन्या, गोष्टी माणसांच्या, परिघ, पितृऋण,बकुळ ही आणि इतर अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर रुजू आहेत.

सुधा मूर्ती (Sudha Murty) यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी ई इलेक्ट्रिकल पदवी सुवर्णपदकासह मिळवली. पण एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत पुढे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून कॉम्प्युटर सायन्स मध्ये एम.इ. झाल्या. त्यावेळी प्रथमच ‘टेल्को’ कंपनीतील ‘पहिल्या महिला अभियंत्या’ होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्याकाळी टाटांना त्यांनी लिहिलेल्या पत्राची गोष्ट आजही आपण ऐकतो. पुढे टाटा कंपनी साठी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम करत त्यांनी आपल्या कारकिर्दीचा आलेख उंचावत नेला.

घरातील पार्श्वभूमी शिक्षकांची असल्यामुळे अर्थातच त्यांची पुस्तकांशी मैत्री झाली. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर त्यांनी शिक्षकी पेशाही उत्तम निभावला; 1995 सली त्यासाठी त्यांना उत्तम शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

लग्नानंतर आर.नारायण मूर्ती यांनी ‘इन्फोसिस’ सुरू करण्याची कल्पना, सुधा मूर्ती यांना सांगितली. हातात असलेली नोकरी सोडून, असे काहीतरी नवीन उभे करायचे ज्याने देशाची प्रगती होण्यास मदत होईल, हा निर्णय घेताना बरेच अडथळे त्यांच्या समोर होते, पण त्या सर्वातून मार्ग काढत यशस्वी व्हायलाच हवं या ध्येयाने त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. नारायण मूर्ती यांच्या प्रयत्न आणि कष्टासोबच आपल्या यशाचं क्रेडिट त्या टाटांनाही देतात. ‘उत्तम मार्गदर्शक म्हणून नेहमीच टाटांबद्दल आदर वाटतो’, हे त्या सांगतात.

उत्तम लेखिका बिजनेस वूमेन या सोबतच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपण सुधा मूर्ती (Sudha Murty) यांना ओळखतो. सध्या कोरोना ग्रस्तांसाठी केलेलं काम, पूरग्रस्तांसाठी केलेलं त्यांचं काम आपण नेहमीच बघतो. त्यांच्या एका मुलाखती दरम्यान सुधा मूर्तींनी सांगितलं होतं, “पैसे कमावणं यापेक्षा आपल्या हातून चांगलं काम होणं यावर माझा जास्त फोकस असतो, आपण कामाशी प्रामाणिक राहिलो की, लक्ष्मी आपोआपच आपल्या पाठीशी उभी राहते..”

============

हे ही वाचा: सामान्य नागरिकांप्रमाणे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सुट्टी घेता येते का?

============

आदर, कौतुक, अभिमान आणि आदर्श वाटावं अशा सुधा मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. तरुण् पिढीने त्यांच्याकडून घ्यावेत असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसारणी ’ या उक्तीला अगदी साजेसं वर्तन असणाऱ्या सुधा मूर्ती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.