Home » Success Story: टेनिसपटू रेने लेकोस्टेच्या नावे जगभरात असा प्रसिद्ध झाला Lacoste ब्रँन्ड

Success Story: टेनिसपटू रेने लेकोस्टेच्या नावे जगभरात असा प्रसिद्ध झाला Lacoste ब्रँन्ड

by Team Gajawaja
0 comment
Success Story
Share

Success Story: रेने लॅकोस्टे म्हणजेच एकेकाळचे जगातील सर्वश्रेष्ठ टेनिटपटू. प्रत्येक मॅच वेळी यश मिळवत टेनिसच्या क्षेत्रात नवा इतिहास लिहिणारे रेने लॅकोस्टे यांनी आपल्या नावावर सात ग्रँन्ड स्लॅम पुरस्कार जिंकले होते. त्यांनी अमेरिकेतील मीडियाने त्यांना मगर अशी उपमा दिली होती. मात्र रेने लॅकोस्टे यांची ख्याती केवळ टेनिस क्षेत्रातपूर्तीच मर्यादित राहिलेली नाही. त्यांनी कपड्यांच्या ब्रँन्डमध्ये सुद्धा मोठी झोप घेतली. यात ही यश मिळवले. आज जगभरात लॅकोस्टे ब्रँन्ड प्रसिद्ध आहे.

रेने लॅकोस्टे यांनी सन् १९३० मध्ये सिमो थिओन यांच्याशी लग्न केले होते. ज्या गोल्फ चॅम्पियन होत्या. गोल्फ असा एक खेळ आहे जो त्यावेळी केवळ पुरुष मंडळीच खेळायचे. मात्र दोघांनी मिळून क्रिडा आणि क्षेत्रात आणि उद्योगाच्या जहात एक नवा इतिहास रचला. सन् १९३३ मध्ये त्यांनी पेटिट पिक नावाची अशी एक कंम्फर्टेबल पोलो शर्टाची सुरुवात केली होती. त्याला खुप पसंद केले गेले. त्यांनी आंद्रे गिलियर यांच्या सोबत मिळून लॅकोस्टे ब्रँन्ड तयार केला.

असे मिळाले यश
१९५० च्या दशकात लॅकोस्टे ब्रँन्डचे कपडे जगभरात निर्यात केले जाऊ लागले. लहान मुलं ते वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा लॅकोस्टे ब्रँन्डच्या कपड्यांचे रंग आणि डिझाइन सर्वांच्या पसंदीस पडले. मात्र पुढे जाऊन ६० च्या दशकात लॅकोस्टे ब्रँन्डने स्पोर्ट्स ड्रेसेस व्यतिरिक्त परफ्युम मार्केटमध्ये सुद्धा पाऊल ठेवले. ब्रँन्डने फ्रांसीसी फॅशन डिझाइनर आणि परफ्युमर जीन पटौ यांच्या मदतीने एक वेगळा आविष्कार केला. पाहता पाहता ते सुद्धा फार प्रसिद्ध झाला.

त्यानंतर लॅकोस्टेने फ्रांसीसी चमड्याच्या वस्तूंच्या मार्केटमध्ये पाऊल ठेवले. त्यांनी मॅसन हॅमन यांच्यासोबत मिळून डिझाइन केलेले बेल्ट आणि बॅग्स लॉन्च केले. ऐवढेच नव्हे तर शूज निर्माता पेंटलँन्ड यांच्यासोबत मिळून लॅकोस् नेटे कॅज्युअल फुटवेअर सुद्धा विक्री करण्यास सुरुवात केली.

जवळजवळ सात दशकानंतर लॅकोस्टेने २००६ मध्ये एका फाउंडेशनचे उद्घाटन केले. त्याच्या माध्यमातून सामाजिक रुपात आर्थिक स्थिती मजबूत नसणाऱ्यांची मदत करण्यासाठी एक मोहिम सुरु केली. हे फाउंडेशन खासकरुन क्रिडा क्षेत्रात प्रगती करणाऱ्या लोकांची मदत करते.(Success Story)

हेही वाचा- Bastille Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास

परंतु २०१२ मध्ये लॅकोस्टेला मौस फ्रेरेस एसए यांनी टेकओव्हर केले. मात्र लॅकोस्टे यांचा वारसा आणि मूल्य कायम ठेवली आहेत. लॅकोस्टे यांचा लोगो मगर हा आजही तसाच आहे. २०१९ मध्ये मौस फ्रेरेस एसए यांनी गैंट, आइगल, टेक्नीफाइबर आणि द कूपल्स सारख्या प्रीमियम ब्रँन्डला लॉन्च केले, जे खुप लोकप्रिय आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.