Success story: खादिम इंडिआ आज एक असे नाव आहे ज्याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. खादिम देशातील सर्वाधिक मोठी शू कंपनी बाटाला टक्कर देतेयं. मात्र खादिमच्या यशाचा प्रवास मात्र खुप संघर्षात्मक होता. लहानश्या व्यवसायाला सत्य प्रसाद रॉय बर्मन यांनी आपल्या कठोर मेहनतीने, परिश्रमाने तो यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवला. सध्या खादिम इंडियाची मार्केट वॅल्यू २०६५ कोटी रुपये आहे.
सत्य प्रसाद रॉय बर्मन यांचे सुरुवातीचे दिवस अधिक संघर्षात्मक होते. सत्य प्रसाद कोलकाता येथे रहायचे. एके दिवशी त्यांचे परिवारी भांडण झाले आणि तेथून निघून ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर काही दिवस बूटांच्या दुकानात काम केले. १९६५ मध्ये त्यांनी आपल्या घरी पुन्हा परतत चितपुर मध्ये केएम खादिमसाठी एक लहान दुकान खरेदी केले. येथूनच व्यवसायाचा पाया रचला गेला.
बूट, चप्पलांची विक्री करतांना त्यांना असे कळले की, स्वस्त आणि उत्तम चप्पल बनवल्यास नक्कीच उत्तम रिस्पॉन्स मिळेल. यावरुनच त्यांनी आपल्या प्रोडक्ट्सचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आणि ते पश्चिम बंगालच नव्हे तर पूर्व भारतात सुद्धा सर्वाधिक मोठे व्यावसायिक झाले. १९८० च्या सुरुवातीलाच बर्मन यांची कंपनी यशाच्या दिशेने वेग धरु लागली होती. त्याच काळात सत्य प्रसाद रॉय बर्मन यांचा मोठा मुलगा सिद्धार्थ रॉय बर्मनने सुद्धा कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंपनी अधिकच ग्रोथ करु लागली.
१९९२ मध्ये त्यांनी आपला ब्रँन्ड उल्कासाठी एक जाहिरात एजेंसीची नियुक्ती केली. या कंपनीने ३.५ लाख रुपयांत कंपनीसाठी एक अॅडवरटाइजिंग फिल्म तयार केली. १९९ ३मध्ये कोलकाता शहरात तीन रिटेल स्टोर्स सुरु केले. या स्टोर्सला जबरदस्त प्रतिदास मिळाला. त्यानंतर तमिळनाडू मार्केटमध्ये कंपनीने एंट्री केली. सध्या कंपनीचे २३ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात ८५३ ब्रँन्डेड एक्सक्लुसिव रिटेल स्टोर आहेत. ब्रिटिश वॉकर्स, लेजार्ड, क्लियो, शैरॉन आणि सॉफ्टटच सह खादिमचे नऊ सब ब्रँन्ड्स आहेत. (Success story)
हेही वाचा- एयर इंडियाच्या ‘महाराजा’चे पाकिस्तानाशी आहे खास नाते
या ब्रँन्डच्या चप्पल आणि बुट तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत. भारतात फुटवियर मार्केटची साइज जवळजवळ ४० हजार कोटी रुपये आहे. ७ डिसेंबर २०१३ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी सत्य प्रसाद रॉय बर्मन यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी सुरु केलेली कंपनी आता देशात एक मोठा ब्रँन्ड झाला आहे.