Success Story: खरंतर दलित समाज सुरुवातीपासूनच सामाजिक दुर्लक्षामुळे आर्थिक रुपात कमकुवत होता. मात्र काही दलितांनी वेळेस आपल्या मेहनीच्या जोरावर देशातच नव्हे तर जगात आपल्या यशाची झेंडे उभारले. त्यापैकीच एक म्हणजे देशातील पहिले दलीत अरबपति म्हणून ओळखले जाणारे राजेश सरैया. त्यांची नाव जगातील यशस्वी व्यक्तींमध्ये घेतले जाते.
दलित अरबपतिंमध्ये सर्वाधिक मोठे नाव राजेश सरैया यांना देशातील पहिले दलित अरबपति मानले जाते. ते उत्तर प्रदेशातील सीतापुर जवळील एका गावात मध्यमवर्गीय घरात जन्माला आले होते. राजेश यांचा व्यवसाय भारताबाहेर युक्रेन, रशिया, जर्मनी, इस्तांबुल, दुबई आणि तियाजनिज सारख्या देशात विस्तारला आहे.
खरंतर राजेश सरैया युक्रेन आधारित कंपनी SteelMont चे सीईओ आहेत.त्यांची कंपनी मेटल सेक्टरमध्ये काम करते. काही रिपोर्ट्सनुसार राजेश सरैया यांचे सुरुवातीचे शिक्षण भारतातील देहरादून मध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी रशियातील एयरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांनी स्टीलमॉन्ट सुरु केले.
मेटल ट्रेडिंग करणारी राजेश यांची कंपनी युक्रेनमध्ये आहे. त्यांच कंपनी ब्रिटेनमध्ये ट्रेडिंग करते. मात्र राजेश यांना आपल्या देशावर प्रेम आहे. त्यामुळे येत्या काही काळात त्यांना भारतात स्थायिक व्हायचे आहे. त्यांनी एका मुलाखतीत सुद्धा सांगितले होते की, भारतात त्यांना एक फूड प्रोसेसिंग युनिट सुरु करायचे आहे. राजेश यांना भारत सरकारने काही पुरस्काराने सुद्धा गौरवले आहे. त्यामध्ये २०१४ मध्ये पद्मश्री आणि २०१२ मध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार ही मिळाला आहे. (Success Story)
असा सुरु केला व्यवसाय…
मीडिया रिपोर्ट्सनुसार राजेश असे म्हणाले होते की, त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसात लंडन मधून इलेक्ट्रिक सामान खरेदी करुन रशियन देशांना विक्री करायचे. त्याच दरम्यान भारतातील मित्तल परिवारातील सदस्य लक्ष्मी मित्तल, प्रमोद मित्तल आणि विनोद मित्तर स्टील बिझनेसच्या कारणास्तव रशियात येत जात होते. एकदा प्रमोद मित्तल हे बिझनेससाठी युक्रेनला आले होते आणि अचानक त्यांची भेट एका हॉटेल बाहेर प्रमोद यांच्याशी झाली. प्रमोद यांना रशियन भाषा येत नव्हती. राजेश नेहमीच अशा व्यावसायिक आणि व्हिआयपी लोकांसोबत रशियन भाषेतील ट्रांसलेटरचे काम करत आपल्या बिझनेससाठी पैसे जमा करत होते. प्रमोद मित्तल यांना राजेश यांचे व्यक्तीमत्त्व फार आवडले. त्यांनी मित्तल स्टीलच्या ऑफिसमध्ये पाचशे डॉलर महिन्याच्या वेतनावर त्यांना कामावर ठेवले. काही काळ नोकरी केल्यानंतर राजेश यांना स्वत:चा व्यवसाय असावा असे वाटू लागले होते. स्टील बिझनेसच्या ऑफिसमध्ये काम करताना त्यांना त्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळाली.
त्यांनी मल्टी एरा नावाची कंपनी स्थापन करुन स्टील ट्रेडिंग सुरु केली. व्यवसायाला वेग येत होता तेव्हाच रशियावर एक मोठे राजकीय संकट कोसळले गेले. रशियाचे विभाजन झाले आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. राजेश यांच्याकडे काहीच राहिले नव्हते. भारतात परतणे हा पर्याय सुद्धा हातात नव्हता. त्यामुळे तेथेच व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले. युक्रेनमध्ये स्थिती जेव्हा थंडावली गेली तेव्हा पुन्हा राजेश यांच्या व्यवसायाने वेग पकडला. त्याच दरम्यान त्यांनी स्टील मॉन्ट कंपनीची स्थापना केली.
हेही वाचा- Success Story: रिक्षावालाचा मुलगा झाला IAS, गोविंद जायसवाल यांची Inspirational स्टोरी
१९४४ मध्ये त्यांच्या कंपनीला रतन टाटा यांच्या टाटा स्टील कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली. रशियन आणि युरोपियन देशानंतर आता त्यांना भारतात सुद्धा मोठे ऑर्डर मिळू लागले होते. आज संपूर्ण जगात स्टील मॉन्टचा फार मोठा व्यवसाय आहे. मित्तल आणि टाटा यांच्यासारख्या बड्या कंपन्यांसोबत त्यांचा ग्रुप आज व्यवसाय करत आहे.