Home » गॅरेजपासून HP ने केली होती सुरुवात, दोन मित्रांनी मिळून ‘अशा’ पद्धतीने बनवली IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी

गॅरेजपासून HP ने केली होती सुरुवात, दोन मित्रांनी मिळून ‘अशा’ पद्धतीने बनवली IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी

by Team Gajawaja
0 comment
Success Story of HP
Share

अमेरिकेत अभ्यासादरम्यान दोन मुलांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांची अधिक घट्ट मैत्री झाली आणि त्यांनी एकत्रितपणे आयटी जगातील दिग्गज कंपनी एचपीचा पाया बांधला. हे मित्र होते विलियम रेडिंगटन हॅवलेट आणि डेविड पॅकार्ड. या दोघांनी आपल्या कंपनीचे नाव आडवानाच्या आधारावर ठेवले. एचपी म्हणजेच हॅवलेट पॅकार्ड. जी अमेरिकेतील मल्टिनॅशनल कंपनी बनली. याचे मुख्यालय कॅलिफोर्नियात आहे. या कंपनीने आयटी जगात काही गोष्टींचे संधोशन केले ज्यामुळे व्यक्तीचे आयुष्य हे सोप्पे झाले.(Success Story of HP)

विलियम हॅवलेट याचा जन्म अमेरिकेतील मिशिगन मध्ये २० मे १९१३ मध्ये झाला. त्यांचे वडिल मिशिगन युनिव्हर्सिटीत फॅकल्टी होते. विलियम यांनी सुरुवातीचे शिक्षण कॅलिफोर्नियातून केले. याच दरम्यान, त्यांना डिस्केक्सिया झाला. जो एक प्रकारचा लर्निंग डिसऑर्डर आहे. म्हणजेच यामध्ये रुग्णाला शिकणे मुश्किल होते. यामुळे असे झाले की, विलियम यांना लिहिणे-शिकणे अधिकच कठीण होत चालले होते. हा आजार विलियम यांना अधिक त्रास देत होता. मात्र त्यांचे लक्ष कायम ठरलेले होते. विज्ञान आणि गणित प्रकरणी त्यांचा मेंदू अतिशय वेगाने काम करायचा.

हायस्कूलमध्ये रेडियो बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले
७ सप्टेंबर १९१२ रोजी अमेरिकेतील कोलोराडो मध्ये जन्मलेले डेविड पॅकार्ड यांना लहान वयातच आपल्याला जे काही कळले किंवा शिकलो त्यामधून पालक आणि शिक्षकांना आश्चर्यचकित केले. त्यांना हायस्कूलमध्ये एक रेडिओ तयार करुन सर्वांना हैराण केले. १९३० मध्ये डेविडने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग करण्यासाठी स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांची भेट विलियम हेवलेट यांच्यासोबतझाली. दोघांनी फ्रेडरिक टेरमॅनअंतर्गत शिक्षण घेतले ज्यांना सिलिकॉन वॅलीचे फादर असे म्हटले जाते. दोघांनी फ्रेडरिक सोबत आपला व्यवसाय सुरु करण्यासह आणि काही नवा शोध घेण्याची इच्छा व्यक्त केली. या दरम्यान, दोघा मित्रांनी आपला स्टार्टअप सुरु करण्याचा विचार केला.

कंपनीचे नाव ठेवण्यापूर्वी टॉस केले
एचपीचे नाव ठेवण्यापूर्वी टॉस करण्यात आला होता. तेव्हा अशी अट ठेवली गेली की, या टॉसमध्ये जो जिंकेल त्याचे आडनाव ठेवले जाईल. यामध्ये मारी हेवलेट यांनी बाजी मारली. अशा प्रकारे कंपनीचे नाव हॅवलेट पॅकार्ड असे ठेवले गेले. सुरुवातीच्या काळात कंपनीची सुरुवात एका गॅरेजपासून झाली. अधिकृत रुपात ४४ हजार रुपयांच्या रक्कमेसह १ जानेवारी १९३९ ला कॅलिफोर्नियात कंपनीची सुरुवात केली. डेविडच्या घरामागील गॅरेजमध्ये कंपनीचे ऑफिस बनवले.(Success Story of HP)

जेव्हा कंपनीने पहिले प्रोडक्ट बनवले
खुप महिन्यांच्या मेहनतीने कंपनीने पहिले प्रोडक्ट बनवले. तो ऑडियो ऑसलेटर होते जे विविध प्रकारचे ऑडिओची निर्मिती करत होता. याचे नाव होते-HP200A. तो हायक्वालिटीची ऑडिओ फ्रीक्वेंसी रिलीज करायचा. त्याची विक्री करण्यासाठी डेविड आणि विलियम यांनी युनिव्हर्सिटीज आणि शाळांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. पहिल्यांना त्यांना त्यासाठी ४ ऑर्डर मिळाले. त्यानंतर त्यांनी मार्केटिंग करत करत त्यांच्या ऑर्डरमध्ये अधिक वाढ झाली. त्याचसोबत प्रोडक्टची किंमत वाढून त्या दरम्यान, १४ हजारांपर्यंत पोहचली होती.

Success Story of HP
Success Story of HP

या व्यतिरिक्त कंपनीने बल्ब तयार केले. त्यांच्या प्रोडक्ट्सला पसंदी मिळाली आणि प्रसिद्ध वॉल्ट डिज्नी स्टुडिओने ऑडियो ऑसलेटची ऑर्डर दिली. त्यासाठी त्यांना ४७ हजार रुपयांचे पेमेंट केले. ही एचपीसाठी त्या काळातील सर्वाधिक मोठी ऑर्डर होती. पहिल्याच वर्षापासून कंपनीला खुप प्रॉफिट होऊ लागला होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या कारणास्तव नफा अधिक मिळाला?
१९४१ मध्ये अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरला. अमेरिकेच्या सैन्याने कंपनीला ऑडिओ ऑसलेटरची ऑर्डर दिली. या व्यतिरिक्त कंपनी तेव्हा अॅनाइलजर, वॅक्युम ट्युब आणि वॉल्टमीटर सुद्धा बनवू लागले होते. याची गरज सैन्याला पडली. अशा प्रकारे कंपनीला अधिकाधिक नफा होऊ लागला. १९४३ मध्ये कंपनीची सेल वाढवून सव्वा आठ कोटींवर पोहचला. या नफ्यानंतर कंपनीने इनोवेशनच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अधिक प्रयत्न केले.

वाढत्या नफ्यासह कंपनीने नव्या इमारतीत आपले ऑफिस शिफ्ट केले आणि काही सॉफ्टवेयर कंपन्या खरेदी करण्यास सुरुवत केली. कंपनीने परदेशात आपले प्रोडक्ट विक्री करण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९५७ ला एचपी ही प्रायव्हेट कंपनी झाली. कंपनीने जेनेवात मार्केटिंग ऑर्गेनाइजेशनची सुरुवात केली. त्याचसोबत जापनाची सोनी आणि योकोगावा इलेक्ट्रिकसह मिळून हाय क्वालिटी प्रोडक्ट तयार करण्याची योजना बनवली. मात्र प्रोडक्ट महाग झाल्याने यश मिळाले नाही.

हे देखील वाचा- राजस्थानच्या मिर्ची बड्याचा स्वाद लंडनमध्ये

जगातील पहिले कॅल्युलेटर बनवले
१९६१ मध्ये एचपीने सेनबॉर्न कंपनीला खरेदी केले आणि मेडिकल इक्विपमेंटची निर्मिती करण्यास सुरुवात केली. जगातील पहिला वैज्ञानिक कॅल्युलेटर बनवण्याचे श्रेय ही एचपीला जातो. कंपनीने अॅटोमॅटिक क्लॉक बनवले जो सेकंदाच्या १० लाखाव्या हिस्स्याची माहिती देत होता. एचपीने अपोलो आणि कॉन्वेक्स कंप्युटरला खरेदी केले आणि १९६६ मध्ये मिनीकंप्युटर तयार केला.(Success Story of HP)

जगातील पहिलाच पर्सनल कंप्युटर बनवला
१९६८ मध्ये एचपीने जगातील पहिला पर्सनल कंप्युटर बनवला, जो Hewlett-Packard 9100A चे नाव दिले. त्यानंतर कंपनीने एकापेक्षा एक उत्तम प्रोडक्ट बनवले आणि इतिहास रचला. मे २०२२ मध्ये कॉम्पॅक आणि एचपी एकत्रित आले आणि कंपनीचे नाव झाले HPQ म्हणजेच हॅवलेट पॅकार्ड अॅन्ड कॉम्पॅक, दरम्यान, हे मर्जर बिझनेसच्या दृष्टीने उत्तम नव्हते. कंपनीने आपल्या प्रॉफिटमधील काही हिस्सा कर्मचाऱ्यांना सुद्धा देण्यास सुरुवात केली. एपचीने प्रोडक्टमध्ये इनोवेशन करण्याचे जे लक्ष्य ठेवले होते ते आज ही कायम आहे. हेच कारण आहे की, आज ८ दशक पूर्ण झाली तरीही एचपी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी बनली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.