Success Story: प्रत्येक व्यक्तीमध्ये ईकिगाई असतो. तो ओळखता आला की, आयुष्य जगण्यााच अर्थ आणि आयुष्यातील स्वप्न नक्की पूर्ण होतात. खरंतर ईकिगाई हे जापानी लोकांच्या जगण्याचे रहस्य आहे. आपण जगभरातील अनेक यशस्वी व्यक्तिमत्त्व पाहतो, त्यांच्याबद्दल वाचतो. त्यांच्या आयुष्याची खरी कथा कळल्यानंतर आपल्याला सुद्धा आयुष्यात काहीतरी करावे अशी उमेद आपल्यात निर्माण होते. त्यापैकीच एक असलेला भारतातील प्रसिद्ध युट्युबर भुवन बाम.
ऐकेकाळी ५ हजारांत क्लबमध्ये गाणं गाणारा भुवन बाम आज भारतातील सर्वाधिक श्रीमंत युट्युबरच्या लिस्टमध्ये मोडतो. सिंगिग टीवी शो मध्ये सुद्धा एंन्ट्रीसाठी काही तासांच्या रांगेत उभा राहणारा भुवन बाम आज एक सेलिब्रेटी बनला असून लोक त्याला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. आज तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.
भुवन बामचा जन्म वडोदरामधील एका मध्यम वर्गीय घरात झाला. त्याला सुरुवातीपासूनच गाण्याची फार आवड होती. त्यामुळे गायनाच्या क्षेत्रातच आपले करियर करण्याचा विचार केला होता. मात्र हा मार्ग फार खडतर होता. तो नवी दिल्लीतील एका लहान कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये गाणं गायचा. यामध्ये सर्वाधिक मोठी समस्या होती, त्याला प्रतिदिन केवळ १५० रुपयांपेक्षा थोडेफार अधिक पैसे मिळायचे.
गाण्याच्या क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याने भुवन बामने त्याच्या करियरचा निर्णय बदलला. त्यानंतर त्याने युट्यूबवर आपले टॅलेंन्ट दाखवण्यास सुरुवात केली. भुवने सर्वात प्रथम पेरोडी व्हिडिओ तयार करुन युट्यूबवर पोस्ट केला. हा पेरोडी कश्मीर मधील एका व्हायरल व्हिडिओवर होता. या व्हिडिओत पुरात घर वाहून गेलेल्या एका व्यक्तिला फार असंवेदनशील प्रश्न विचारत होता.(Success Story)
भुवनच्या या पहिल्या व्हिडिओला फार पाहिले गेले. अशा प्रकारे तो एक कॉमेडियनच्या नव्या रुपात समोर आला. त्यानंतर भुवन बामने कधीच मागे वळून पाहिले नाही. भुवनने आपली सीरिज बीबी वाइन्स लॉन्च केले. त्यामध्ये तो लहान-लहान व्हिडिओ पोस्ट करायचा. व्हिडिओमध्ये स्वत:च परिवारातीव विविध कॅरेक्टर तो करायचा. त्यानंतर स्पूफ व्हिडिओ आणि हैरतअंगेज कमेंट्रीने त्याला रातोरात स्टार केले. बीबी वाइन्सचे २६ मिलियन पेक्षा अधिक सब्सक्राइबर झाले आहेत.
हेही वाचा- Success Story: नेत्रहिन असूनही इतरांच्या आयुष्याला प्रकाश देणारे- भावेश भाटिया
सध्या भुवन बाम हा भारतातील एक श्रीमंत युट्युबर आहे. आज त्याच्याकडे १२२ कोटींची संपत्ती आहे. तो ब्रँन्ड एंडोर्समेंट, मूवी आणि युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून वर्षाला करोडो रुपये कमवतो. पैशांसह त्याला प्रसिद्धी सुद्धा मिळाली. आता तो एक सेलिब्रेटी झाला आहे.