Success Story: महागाईने आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यात आता टोमॅटोचे दर वाढले गेल्याने सामान्य नागरिक अधिकच त्रस्त झाला आहे. शंभरीपार गेलेल्या टोमॅटोच्या किंमतीमुळे कोणीही ते खरेदी करण्याचा विचार करत नाहीयं. ऐवढेच नव्हे तर मॅकडॉनल्ड सारख्या फूड कंपनीने सुद्धा त्यांच्या बर्गरमध्ये आम्ही टोमॅटो वापरणार नाहीत असे स्पष्टपणे सांगत एक पत्रक जाहिर केले होते. मात्र आंध्र प्रदेशातील एक शेतकऱ्याने सध्या टोमॅटोची विक्री करुन करोडो रुपये कमावले आहेत. सध्या त्याची चर्चा जोरदार सर्वत्र सुरु आहे.
रिपोर्ट्नुसार हे प्रकरण आंध्र प्रदेशातील चित्तूर मधील आहे. येथील 48 वर्षीय शेतकरी मुरली याने टोमॅटोची विक्री करुन केवळ दीड महिन्यात म्हणजेच 45 दिवसात जवळजवळ चार कोटींची कमाई केली आहे. असा दावा करण्यात आला आहे की, यामध्ये त्याला चक्क दोन कोटींचा नफा झाला आहे.
टोमॅटोने केले मालामाल
मीडिया रिपोर्ट्सनुसार एकेकाळी कर्जात बुडालेल्या मुरलीने त्याच्या डोक्यावरील कर्ज फेडले आहे. मुरलीची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. यापूर्वी तेलंगणा मधील एका शेतकऱ्याने एका महिन्यात टोमॅटोची विक्री करुन दोन कोटी रुपये कमावले होते. मुरली या बद्दल असे सांगतो की, जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याच्या वडिलांनी टोमॅटोचे उत्पादन विक्री करुन 50 हजार रुपये कमावले होते. ते पैसे कपाटात सुरक्षितरित्या ठेवल्यानंतर संपूर्ण परिवार दररोज त्या फर्नीचरच्या जागेची पूजा करायचा. तेव्हा मुरली याला माहिती नव्हते की, ती शेती एक दिवस त्याला एका महिन्यापेक्षा अधिक काळात कोटींची कमाई करुन देईल.
130 किमी दूर जाऊन विक्री करतो टोमॅटो
मुरली असे सांगतो की, तो गेल्या आठ वर्षांपासून टोमॅटोची शेती करत आहे. मात्र त्याला कधीच ऐवढा मोठा नफा झाला नव्हता. कोलार मध्ये आपल्या टोमॅटोची विक्री करण्यासाठी तो १३० किमी पेक्षा अधिक दूरचा प्रवास करायचा कारण तेथे पीएमसी यार्ड उत्तम किंमत देतात. (Success Story)
यापूर्वी सुद्धा फार मोठे नुकसान सहन केलेयं
चित्तूर जिल्ह्यातील करकमंडला गावात राहणारा मुरली जॉइंट फॅमिलीत राहतो. त्याला 12 एकर जमीन ही वारसा म्हणून मिळाली होती. तर काही वर्षांपूर्वी त्याने आणखी १० एकर जमीन खरेदी केली होती. खरंतर गेल्या वर्षात जुलै महिन्यात टोमॅटोच्या किंमतीत फार मोठी घट झाल्याने त्याच्या परिवाराला मोठे नुकसान झाले होते. त्याच्यावर दीड कोटींचे कर्ज होते.
मुलगा इंजीनिअरिंग शिकतोय
मुरली असे सांगतो की, गेल्या वर्षात शेतीचे फार मोठे नुकसान झाले. मात्र यावेळी जी शेती आली त्याची गुणवत्ता एकदम उत्तम आहे. आता पर्यंत ३५ टक्के कापणी झाली आहे. 15-20 टक्के आणखी कापणी शिल्लक आहे. त्याचा मुलगा इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर मुलगी मेडिकलचे शिक्षण घेतेयं.
हेही वाचा-Success Story: नेत्रहिन असूनही इतरांच्या आयुष्याला प्रकाश देणारे- भावेश भाटिया
टोमॅटोने बनवले करोडपती
आंध्रप्रदेशातील मुरली हा एकटा असा व्यक्ती नाही ज्याला टोमॅटोची विक्री करुन करोडो रुपये मिळाले आहेत. देशातील आणखी काही असे शेतकरी आहेत ज्यांचे नशीब टोमॅटोने पालटले आहे. दिल्ली, बिहार, हिमाचल प्रदेशासह काही अशी राज्य आहेत जेथे टोमॅटोच्या किंमती वाढल्या गेल्या आणि शेतकऱ्यांची बक्कळ कमाई झाली. अशातच हिमाचल मधील मंडी जिल्ह्यातील शेतकऱ्याने टोमॅटोची शेती करुन करोडपती झाला. रिपोर्ट्सनुसार, मंडीमधील जयराम या शेतकऱ्याने टोमॅटो मधून 1 कोटी 10 लाखांची कमाई केली. तो गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ टोमॅटोची शेती करत आहे.