Success Story: गोदरेजचे नाव तुम्ही खुप ऐकले असले. कधी एखाद्या साबणावर किंवा एखाद्या फ्रीजवर. मात्र गोदरेज कंपनीचे मालक आदि गोदरेज यांचा यशस्वी व्यावसायिकापर्यंतचा प्रवास मात्र खडतर होता. परिवाराच्या व्यवसायाला त्यांनी आज कशी ओळख निर्माण करुन दिली याचा आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवास आपण पाहणार आहोत.
गोदरेज कंपनीबद्दल प्रत्येक भारतीयाला माहितेय. ते कपाट असो किंवा घराचे टाळं, यासाठी ते फार प्रसिद्ध आहेत. गोदरेज ग्रुपचा केवळ भारतातील सर्वाधिक जुना व्यवसायच नव्हे तर गोदरेज परिवाराचा इतिहास सुद्धा फार जुना आहे. आर्देशियर गोदरेज आणि त्यांचा लहान भाऊ पिरोजशा गोदरेज यांनी 1897 मध्ये गोदरेज ग्रुपची स्थापना केली होती. आदि गोदरेज आणि पिरोशजा गोदरेज यांच्या मधे नातू-आजोबांचे नाते आहे. गोदरेज व्यवसायात आदि गोदरेज यांचा मुलगा पिरोजशा गोदरेज हे फार महत्त्वाची भुमिका निभावत आहेत. अशा प्रकारे गोदरेज ग्रुपची स्थापना जेव्हा झाली तेव्हापासून ते आता पर्यंत या कंपनीला चौथी पीढी सांभाळत आहे.
आदि गोदरेज यांच्या आयुष्याबद्दल…
सध्या गोदरेजचे मालक असलेले आदि गोदरेज यांचा जन्म 3 एप्रिल 1942 रोजी मुंबईत झाला. शालेय शिक्षण ही मुंबईतच झाले. त्यानंतर त्यांनी एचएल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर ते वयाच्या 17 व्या वर्षात MBA करण्यासाठी परदेशात गेले. त्यांनी MIT मधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले.
आदि गोदरेद यांना हा व्यवसाय वारसाने जरी मिळाला असला तरीही त्यांची क्षमता पाहूनच त्यांच्या हाती दिला आहे. परदेशातील आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात आले आणि आपल्या परिवाराचा व्यवसाय सांभाळू लागले.
1897 मध्ये टाळं बनवणाऱ्या कंपनीच्या रुपात गोदरेजची सुरुवात झाली
भारताच्या स्वातंत्र्यादरम्यान स्वदेशी आंदोलनासंबंधित या कंपनीने 1897 मध्ये टाळं बनणाऱ्या कंपनीच्या रुपात आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. 1918 मध्ये कंपनीने जगातील पहिलाच वेजिटेबल ऑइल सोप लॉन्च केला होता. टाळं आणि साबणानंतर गोदरेजने कपाटं बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. 1923 मध्ये गोदरेजने स्टीलची कपाटं तयार करण्यास सुरुवात केली. खास गोष्ट अशी की, गोदरेजने भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1951 मध्ये पहिल्यांदा झालेल्या निवडणूकीसाठीचा बॅलेट बॉक्स ही तयार केला होता. (Success Story)
गोदरेजचा प्रवास
गोदरेजने 1952 मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त सिन्थॉल साबण लॉन्च केला जो आज ही वापरला जातो. सिन्थॉलला लॉन्च केल्याच्या सहा वर्षानंतर म्हणजेच 1958 मध्ये रेफ्रिजरेटर्सचा व्यवसाय सुरु केला. कंपनीने 1974 मध्ये हेयर कलर लॉन्च केले. त्यानंतर 1990 मध्ये गोदरेज प्रॉपर्टीच्या व्यवसायात पाऊल ठेवले. 1991 मध्ये कंपनीने एग्री बिझनेस सुरु केला. 1994 मध्ये गोदरेजने मच्छरांचा खात्मा करणारे औषध गुड नाइट लॉन्च केले. 2005 मध्ये कंपनीने खाण्यापिण्याच्या वस्तूंचा व्यवसाय सुरु केला. 2008 मध्ये गोदरेजने एरोस्पेस सेक्टरमध्ये पाऊल ठेवले. 2017 मध्ये गोदरेज BSE आणि NSE मध्ये लिस्ट झाला.
हेही वाचा- उधारीने सुरु केले होते काम, 25 वर्षात उभारली भारतातील चौथी मोठी बँक
आर्देशिर गोदरेज आणि त्यांचा लहान भाऊ पिरोजशा गोदरेज यांनी खरोखर 126 वर्षांपूर्वी गोदरेज ग्रुपची स्थापना केली होती. मात्र त्या कंपनीला एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी गोदरेजने एक मुख्य भुमिका निभावली आहे.