Home » प्राचीन मुर्त्यांची तस्करी करणारा डॉन सुभाष कपूर, जाणून घेऊयात अधिक

प्राचीन मुर्त्यांची तस्करी करणारा डॉन सुभाष कपूर, जाणून घेऊयात अधिक

by Team Gajawaja
0 comment
Subhash Kapoor
Share

तुम्हाला माहिती आहे का की प्राचीन मुर्त्यांची तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट कसे चालवले जाते? तसेच भारतातील मुर्त्यांची चोदी करणारा अंडरवर्ल्ड डॉन कोण आहे? अमेरिकतून तस्करीचे रॅकेट चालवणारा तो कोण डॉन होता(Subhash Kapoor) ज्याच्या इशाऱ्यावर वर्षानुवर्षे देशातील विविध ठिकाणाच्या मुर्त्या चोरी केल्या जात होत्या. अशाच काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा लेख जरुर वाचा.

जेव्हा वाराणसीमध्ये देव दीपावलीच्या भव्य कार्यक्रमावेळी पीएम मोदी यांनी देशाला संबोधित करत असे म्हटले होते की, एक खास क्षण आपल्यासाठी येणार आहे. जवळजवळ १०० वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवतेची जी मुर्ती काशीहून चोरी झाली होती तो पुन्हा भारतात आणली जाणार आहे. तर देशातील बहुतांश मुर्त्या ज्या भारतातून चोरी झाल्या होत्या त्या मोदी यांच्या प्रयत्नाने भारतात आणल्या गेल्या आहेत. २०१६ मध्ये जेव्हा पीएम मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असता तेव्हा भारतातील लहान-मोठ्या २०० मुर्त्या परत आणण्यात आल्या होत्या.

दरम्यान, अशा बहुतांश मुर्त्या आहेत ज्या आजही परदेशातील श्रीमंतांच्या ड्रॉइंग रुममध्ये आणि संग्रहालयांची शोभा वाढवत आहेत. परंतु या सर्व गोष्टी चोरीछुप्या पद्धतीने तस्करी करुन परदेशात नेण्यात आल्या होत्याय आपल्या देशातील अशी बहुतांश मंदिरे आहेत ज्यामध्ये देवी-देवतांच्या प्राचीन मुर्त्यांचा खजिना आहे. परंतु अशाच मुर्त्यांना परदेशातील चोर बाजारात खुप मागणी असून त्यांच्यासाठी बक्कळ पैसा दिला जातो.

मंदिर ते चोरबाजारापर्यंतचे आंतरराष्ट्रीय रॅकेट

तमिळनाडू येथील एका मंदिरातून २००५ मध्ये चोरी झालेली उमा परमेश्वरी यांची एक मुर्तीवर २०००८ मध्ये जवळजवळ २५ लाख डॉलरची किंमत लावण्यात आली होती. रुपयांमध्ये हिच किंमत ११ कोटी रुपये होते. ती मुर्ती तमिळनाडू येथून चोरी केल्यानंतर भारतातून तस्करी करत हॉंगकॉंग येथे नेण्यात आली. तेथून छुप्या पद्धतीने लंडन येथे नेण्यात आली. लंडन येथील विशेषज्ञांनी कोटी रुपयांमध्ये ती मुर्ती रिस्टोर केली. त्यांनी ती नवी तयार केली आणि नंतर न्युयॉर्कमध्ये पाठवण्यात आली. २००८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये एक आर्ट डीलरने त्याने आपल्या कॅटलॉगमध्ये ठेवण्यात आली जेणेकरुन त्याच्यावर बोली लावली जाईल. त्याचे नाव होते सुभाष कपूर.

Subhash Kapoor
Subhash Kapoor

अमेरिकेतील सर्वात मोठ्या कला विक्रेत्यांपैकी एक, परंतु 2011 मध्ये सुभाष कपूर याला जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर अटक झाली. जेव्हा जगाला कळले की, ते ज्याला आर्ट डीलर समजत होते तो खरा जगातील चोरीच्या मुर्त्या आणि कलाकृतींची तस्करी करणारा सर्वाधिक मोठा चोर होता. कलाकृतींची चोरी करणारा सर्वात मोठा अंडरवर्ल्ड डॉन. त्याचे रॅकेट ऐवढे मोठे होते की, त्याने भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, थायलंड आणि नेपाळ मधील मंदिरांतून चोरी करण्यात आलेल्या मुर्त्या या आपोआप त्याच्याजवळ येत होत्या.

हे देखील वाचा- सोन्याची गुफा, दरवाजा उघडल्यास मालामाल होईल भारत

ऑपरेशन हिडन ऑयडल
जगासमोर सुभाष कपूर याच्या दुटप्पी आयुष्याचे सत्य २०११ मध्ये समोर आले. परंतु कायद्याच्या रडारवर तो फेब्रुवारी २००७ मध्येच आला होता. खरंतर त्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये पाण्याच्या जहाजातून फर्निचरचे एक कन्साइंटमेंट आले होते. खरंतर त्यामध्ये फर्निचर नव्हे तर त्याच चोरी केलेल्या मुर्त्या होत्या. अमेरिका आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी पोलिसांना एका गुप्त व्यक्तीने सांगितले होते की, त्यामध्ये चोरी करण्यात आलेल्या मुर्त्या आहेत. मात्र त्या न्युयॉर्कमध्ये दाखल झाल्यानंतर जप्त करण्यात आल्या. मात्र पोलिसांना हे पहायचे होते की, हे जप्त करण्यात आलेले सामान घेण्यासाठी नक्की कोण येणार? पण कोणीही आले नाही.

त्यानंतर एफबीआयने ऑपरेशन हिडन ऑयडल नावाचे एक गुप्त अभियान सुरु केले. गुन्ह्याच्या तळापर्यंत पोहोचण्याच्या कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एफबीआयला अखेर आर्टिफॅक्ट चोर सापडला. 2011 मध्ये, एफबीआयने जारी केलेल्या इंटरपोल नोटिसच्या आधारे सुभाष कपूर यांना जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर अटक करण्यात आली होती.

दरम्यान, एफबीयआय द्वारे जारी इंटरपोल नोटीसवर जर्मनीत अटक केल्यानंतर सुद्धा सुभाष कपूरला (Subhash Kapoor) भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. तमिळनाडूतील त्रिचारपल्लीच्या तुरुंगात त्याला बंद करुन ठेवण्यात आले आहे. चोरीच्या कलाकृतींमध्ये अंडरवर्ल्डचे बहुतांश गुपित आता समोर आली आहेत. या प्रकरणी २०१६ मध्ये तमिळनाडू मधील मुर्ती चोरीच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या विभागाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा अटक केली होती. वृत्तांनुसार ज्या विभागाला मुर्त्यांची तस्करी थांबवण्यासाठी तयार केले होते त्यामधीलच काहीजण आरोपी निघाले. सुभाष कपूर यांच्या सांगण्यावरून त्यांच्या संरक्षणाखाोली चोरांचे जाळे मंदिरांतून मूर्ती चोरायचे.



Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.