कोणतेही ही कपडे हे प्रत्येक महिलेला आकर्षक आणि सुंदर दिसण्यास मदत करतात. खरंतर महिलांसाठी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या ब्रँन्ड्सच्या ड्रेसचे कलेक्शन उपलब्ध असते. मात्र याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक आउटफिट हे तुमच्या लूकला परफेक्ट करतील.त्यामुळे कोणत्याही स्टाइलची निवड करताना तुम्ही तुमच्या उंचीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. खरंतर जर तुमची उंची कमी असेल तर असे कपडे निवडले पाहिजेत ज्यामध्ये तुम्ही अधिक बुटके नव्हे तर उंचीने ही अधिक दिसाल. याच बद्दलच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Styling tips for short height)
मोनोक्रोमॅटिक आउटफिट्स
ही एक अत्यंत शानदार स्टाइलिंग ट्रिक आहे. जी शॉर्ट हाइट असलेल्या महिलांवर अगदी सूट होते. अशातच प्रयत्न करा की, टॉप आणि बॉटम आउटफिटचा रंग हा एकच असेल तर उत्तम. जेव्हा तुम्ही अशा प्रकारची स्टाइल करता तेव्हा तुमची उंची थोडी वाढलेली दिसेल. काही महिलांना एकाच रंगाचे कपडे घालणे पसंद पडत नाही. मात्र तुम्ही उंचीने मोठे दिसण्यासाठी एकाच रंगाचे विविध शेड्स वापरु शकता. यामुळे तुमचा लूक स्टाइलिश दिसेल आणि अधिक स्लीम.
ब्लॅक जीन्स
ब्लॅक जीन्स ही एक असे आउटफिट आहे जे अत्यंत वर्सेटाइल मानले जाते. अशा प्रकारची जीन्स कोणत्याही प्रकारचे टॉप, टी-शर्ट सोबत तुम्ही कधीही घालू शकता. जर तुमची उंची लहान असेल तर तुम्ही ब्लॅक जीन्स जरुर घाला. जेव्हा तु्म्ही ब्लॅक नॅरो जीन्स घालाल तेव्हा तुमचे पाय अधिक पातळ दिसतील. त्याचसोबत तुमची उंची ही वाढलेली दिसेल. ब्लॅक जीन्ससह तुम्ही हिल्स ही घालू शकता.

स्केटर ड्रेस
बहुतांश महिलांना स्केटर ड्रेस घालणे फार आवडते. परंतु तुमची उंची लहान असेल तर तुम्ही स्केटर ड्रेस घालू शकता. स्केटर ड्रेसमध्ये तुमची वेस्ट बारीक दिसते आणि तुम्ही बारीक ही दिसता. त्यामुळे तुमची उंची आपोआप वाढलेली दिसते. तुम्ही कलरफुल स्केटर ड्रेस स्टाइल करुन आपला कॅज्युअल लूक पूर्ण करु शकता.
सॅटिन स्लिप ड्रेस
जर तुम्हाला पार्टीसाठी एखादा ड्रेस निवडायचा असेल तर सॅटिन स्लिप ड्रेस नक्की ट्राय करुन पहा. तुम्हाला तो क्लासी लूक देईल आणि पार्टी किंवा डेट नाइटसाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे. तुमची उंची लहान असल्याने तुम्ही सॅटिन स्लिप ड्रेससह काउल नेकलाइन स्टाइलकडे लक्ष द्या. (Styling tips for short height)
हेही वाचा- Ready to wear साडी खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
वर्टिकल स्ट्राइप्ड ड्रेस
जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही जाड असाल तर वर्टिकल स्ट्राइप्ड ड्रेस जरुर घाला. जेव्हा तुम्ही असे कपडे निवडता तेव्हा नॅच्युरली तुमची उंची वाढलेली दिसते. त्याचसोबत तु्म्ही स्लिम सुद्धा दिसता. तुमची उंची अधिक लांब दिसण्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म किंवा पेन्सिल हिल्स ही घालू शकता.