सध्याच्या काळात उच्च शिक्षणासाठी बहुतांश विद्यार्थ्यांचा भारतात शिकण्याऐवजी परदेशात शिकायला जाण्याचा कल दिसून येत आहे. परंतु परदेशात जाणून शिक्षण घेणे सुद्धा थोडे धोकादायक सुद्धा आहे. कारण परदेशात जाऊन शिक्षण घेणे हे सर्वच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालनकांना जमण्यासारखे नाही. कारण यामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च ते अन्य काही गोष्टींची चिंता सुद्धा अधिक वाटते. त्यामुळे परदेशात जाऊन एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.(Study Abroad)
-शिक्षणासाठी किती खर्च येईल
परदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट अशी की, त्यांच्या पालकांकडे युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ट्युशन फी आणि त्या व्यतिरिक्त येणाऱ्या खर्चांसाठी पुरेसे पैसे आहेत का याचा विचार करावा. कारण युनिव्हर्सिटीच्या वेबसाइटवर जेवढे लिहिलेले असते त्या पेक्षा थोडे अधिक पैसे तुम्हाला विद्यार्थ्याला द्यावे लागतात. त्यामुळेच प्रवेश घेण्यापूर्वी आपण सर्व खर्च करु शकतो का आणि आर्थिक मदत म्हणून आपल्याला स्कॉलरशिप मिळेल का याची सुद्धा माहिती घ्या.
-इंटर्नशिपची संधी
कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची इंटर्नशिप दिली जाते हे पहा. हे अशा कारणासाठी महत्वाचे आहे की, ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर कामाचा अनुभव मिळाला तर तुमच्या भविष्यातील करियरसाठी ते फायदेशीर ठरेल.
-इमिग्रेशनचे नियम
कोरोनाच्या परिस्थितीनंतर इमिग्रेशनच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. अशातच प्रवेश घेण्यापूर्वी सर्व नियम जाणून घ्या. काही देशांनी इमिग्रेशन संदर्भातील नियम अधिक कठोर केले आहेत. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सूट दिली गेली आहे.
हे देखील वाचा- सुट्टी हिताची नसते! ‘या’ देशात रविवारीही करावे लागते काम, मात्र पगार मिळतो सहाच दिवसांचा
-शैक्षणिक सुविधा
कोणत्याही युनिव्हर्सिटीत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांच्या संबंधित शैक्षणिक सुविधा कोणत्या दिल्या जातात याची माहिती मिळवा. तसेच ज्या युनिव्हर्सिटीत तुम्ही प्रवेश घेत आहात त्याची रँकिंग, स्कॉलरशिपच्या संघी आणि त्यामध्ये शिकवले जाणारे कोर्सेस या सर्वाची सुद्धा माहिती जरुर घ्या.(Study Abroad)
-युनिव्हर्सिटीनंतर करियर
परदेशात युनिव्हर्सिटीची निवड करताना विद्यार्थी बहुतांश वेळेस शिक्षणानंतर करियर कसे असणार याकडे दुर्लक्ष करतात. तर हा प्रश्न सर्वाधिक महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी नेहमीच लक्षात ठेवावे की, आपण ज्या विषयासाठी शिक्षण घेत आहोत त्यामध्ये करियरच्या संधी परदेशात कशा प्रकारे उपलब्ध आहेत हे सुद्धा जाणून घ्या.