Home » Earthquake : जगात आजवर आलेले सर्वात शक्तिशाली भूकंप

Earthquake : जगात आजवर आलेले सर्वात शक्तिशाली भूकंप

by Jyotsna Kulkarni
0 comment
Earthquake
Share

रशियात आज ८.८ तीव्रतेचा महाभूकंप आला आहे. या भूकंपामुळे मोठमोठ्या त्सुनामी लाटा उसळल्या आहेत. भूकंपाचा फटका फक्त रशियालाच नाही तर जपान आणि अमेरिकेलाही बसला आहे. रशियात या भूकंपानंतर १५ फूट उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. तर जपानमध्ये ३ मीटरहून अधिक उंच त्सुनामीच्या लाटा उसळत आहेत. या शक्तीशाली भूकंपानंतर जगाच्या इतिहासातील आजवरच्या अनेक महाविनाशी भूकंपाची अनेकांना आठवण आली आहे. जाणून घेऊया याच महाभयंकर भूकंपांबद्दल (Todays Marathi HEadline)

वाल्डिव्हिया भूकंप

Earthquake

२२ मे १९६० रोजी चिली देशातील वाल्डिव्हिया या शहरामध्ये आजवरच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली ९.५ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. या भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले होते. जवळपास ६००० लोकं मृत्युमुखी अगणित लोकं जखमी झाले होते. तर जवळपास २० लाख लोक बेघर झाले. या भूकंपामुळे चिलीला सुमारे ५५० दशलक्ष अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले होते. (Top Marathi Headline)

अलास्का भूकंप

Earthquake

२७ मार्च १९६४ रोजी, अमेरिकेतील अलास्का राज्यात एक मोठा भूकंप झाला होता. हा भूकंप ‘द ग्रेट अलास्का अर्थक्वेक’ म्हणून ओळखला जातो. त्याची तीव्रता ९.२ इतकी मोजली गेली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू प्रिन्स विल्यम साऊंडजवळ होता. या भूकंपामध्ये १३९ लोकांचा जीव गेला होता. या भागात खूप कमी लोकं राहत असल्याने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा कमी होता. (Latest Marathi News)

इंडोनेशिया भूकंप

Earthquake

२६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशियाजवळील हिंदी महासागरात एक मोठा भूकंप झाला या भूकंपाची तीव्रता ९.१ इतकी मोठी होती. या भूकंपामुळे एक विनाशकारी त्सुनामी आला होता. या त्सुनामीमुळे इंडोनेशिया, श्रीलंका, भारत, थायलंड आणि इतर अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आणि जीवितहानी झाली. या घटनेला “बॉक्सिंग डे त्सुनामी” म्हणून ओळखले जाते. या आपत्तीमध्ये १४ देशांमध्ये तब्बल २ लाख ३० हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. (Top Trending News)

टोहोकू भूकंप

Earthquake

११ मार्च २०११ रोजी, जपानमधील टोहोकू येथे एक मोठा भूकंप आणि त्सुनामी आली होती. हा भूकंप ९.० इतक्या तीव्रतेचा होता. या भूकंपामुळे प्रशांत महासागरात मोठी त्सुनामी आली, ज्यामुळे जपानच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले. या आपत्तीमध्ये १८००० लोकांचा जीव गेला. शिवाय जपानच्या फुकुशिमा न्यूक्लियर प्लांटला देखील यामुळे मोठे नुकसान पोहचले होते. (Social News)

कमचटका भूकंप

Earthquake

==============

हे देखील वाचा :

Japan’s Earthquake : जपानच्या शक्तिशाली भूकंपानंतर 18 देशांना त्सुनामीचा धोका !

=============

४ नोव्हेंबर १९५२ रुसमधील कमचटका शहराच्या प्रायद्वीपीय भागात एक विनाशकारी भूकंप आला होता. याची तीव्रता ९.० इतक्या तीव्रतेचा होता. हा भूकंप मनुष्यवस्तीपासून लांब आला होता. यामुळे यात जास्त मनुष्यहानी झाली नाही. तरीही यात १० ते १५ हजार लोकांचा जीव गेला. या भूकंपामुळे मोठी त्सुनामी आली यामुळे देखील मोठे नुकसान झाले. रूसमधील सेवेरो-कुरिल्स्क शहराचे मोठे नुकसान झाले होते. यात ५० से ६० फूट उंचीच्या लाटांमुळे या शहरातील ६ हजार लोकांपैकी २ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. (Top Stories)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.