जर तुम्ही वयाची चाळीशी पार केली असेल तर तुम्हाला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. या वयात बहुतांश महिलांची हाडं दुखण्यास सुरुवात होते.त्यामुळे काही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच औषधं घेण्यास सुरुवात करतात. याचे मात्र कालांतराने उलट परिणाम होऊ लागतात. परंतु जर तुम्ही योग्य वेळेतच फिजिकल अॅक्टिव्हिटी ते हेल्दी डाएट सारख्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे तुमची हाडं अधिक मजबूत होण्यास मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त हाडं दुखणे आणि बोन फ्रॅक्चर सारख्या समस्यांपासून दूर राहता. हाडं मजबूत राहण्यासाठी तुम्ही पुढील टीप्स फॉलो करु शकता.(Strong Bone Tips)
-हिरव्या पालेभाज्या
तुम्ही डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करु शकता. यामध्ये पालक, ब्रोकली आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. या भाज्यांमध्ये विटामिनसह कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. या भाज्यांमध्ये विटामिन सी सुद्धा असते. यामुळे तुमची हाडं अधिक मजबूत राहण्यास मदत होते.
-स्ट्रेंथ ट्रेनिंग
हाडं मजबूत करण्यासाठी हेल्दी डाएटसह फिजिकल अॅक्टिव्हिटीची सुद्धा गरज असते. दररोज व्यायाम जरुर करा. तुम्ही वॉकिंग, जॉगिंग आणि एरोबिक्स सारख्या अॅक्टिव्हिटी करु शकता. यामुळे ही तुमची हाडं मजबूत होऊ शकतात. दररोज व्ययाम केल्याने आरोग्यसंबंधित समस्या ही दूर होतात.
-कॅल्शिअमयुक्त डाएट
शरिरातील हाडं ही कॅल्शिअम पासून बनलेली असतात. कॅल्शिअमयुक्त फुड्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात. त्यामुळे तु्म्ही डाएटमध्ये दुध, चीज आणि कॅल्शिअमयुक्त फूड्सचा सुद्धा समावेश करु शकता. यामुळे उच्च रक्तदाब आणि हार्मोनचा स्तर ही नियंत्रणात राहतो.
-प्रोटीनयुक्त डाएट
हाडांना बळकटी देण्यासाठी प्रोटीनयुक्त डाएट खा. तुम्ही डाएटमध्ये टोफू, छोले आणि अळशीच्या बियांचा समावेश करु शकता. प्रोटीनयुक्त फूड्स तुम्हाला हाडांसंबंधित समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता ही कमी होते.(Strong Bone Tips)
-स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर रहा
स्मोकिंग आणि अल्कोहोलमुळे तुमच्या आरोग्याला फार धोका पोहचू शकते. यामुळे तुमच्या हाडांना नुकसान ही पोहचते. यामुळे स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
हे देखील वाचा- खुप वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने होऊ शकतात ‘या’ समस्या
-हेल्दी वजन
आरोग्यदायी राहण्यासाठी हेल्दी वजन असणे फार गरजेचे असते. असा प्रकारचे डाएट खा जेणेकरुन तुमचे वजन नियंत्रणात राहिल. त्याचसोबत तुमच्या हाडांना बळकटी ही मिळेल.