Home » तणावापासून दूर राहण्यासाठी करा हे 5 उपाय, नेहमीच रहाल आनंदित

तणावापासून दूर राहण्यासाठी करा हे 5 उपाय, नेहमीच रहाल आनंदित

by Team Gajawaja
0 comment
Mental stress of women
Share

Stress Management Tips : शारिरीक आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. यामुळे म्हटले जात की मन सुदृढ असल्यास आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होते. मानसिक संतुलन योग्य रहाण्यसाठी तुम्ही स्ट्रेस फ्री असणे महत्वाचे आहे. खरंतर,मानसिक संतुलनाचा समतोल राखणे खूप गरजेचं आहे. तुम्ही खूश असाल तर पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमध्ये व्यवस्थितीत समतोल राखू शकतो. जर तुम्ही तणावाच्या स्थितीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचा परिणाम फार वाईट होऊ शकतो. कालांतराने तणावाची स्थिती शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते.

-रिलॅक्सेशन टेक्निक
मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी कमीत कमी 10 ते 20 मिनटे मेडिटेशन, ब्रीदिंग एक्सरसाईज करा, अनुलोम – विलोम या सारख्या प्राणायाम करू शकतात. ज्यावेळी तणावासारखे वाटते तेव्हा डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. असे केल्याने थोडा रिलॅक्स वाटण्यास मदत होईल. यावेळी पद्मासन, पश्चिमोत्तासन, बालासन केल्यास फायदा होईल.

– पुरेशी झोप घेणे
तणावापासून दूर राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. दररोज 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या. या शिवाय तुम्ही योग्य वेळात झोपणं आणि योग्य वेळात उठणं आवश्यक आहे

Stress Management Tips

Stress Management Tips

-आवडणाऱ्या गोष्टी करा
ज्यावेळी मनाला आवडणाऱ्या गोष्टी करता तेव्हा तुम्हा अंतरसुख मिळते. जर तुम्हाला बागकाम आवडत असेल तर आठवड्यातून एकदा नक्की करा.पुस्तके वाचा, गाणी ऐका, काही नवीन गोष्टी शिका. जेणेकरुन तुम्ही आनंदित रहाल.

– सेल्फ केअर करा
स्वतःला खूश ठेवण्यासाठी सेल्फ केअर करणे गरजेचे आहे. यावेळी फिटनेस, स्किन केअर ते हेअर केअर करण्यासाठी स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आनंदित राहण्याचा प्रयत्न करा.

– निसर्गाच्या सानिध्यात रहा
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, जवाबदाऱ्यांच्या तणावाखाली तुम्ही स्वतःला विसरत चला आहात. यामुळे तणावाखाली राहण्यासाठी तुम्हाला वेळात वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं गरजेचं आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.