आजकालची मुलं कमी वयातच तणावाखाली जातात. काही वेळेस पालकांना सुद्धा मुलांच्या या तणावाबद्दल कळत नाही. तणावामुळे डिप्रेशन आणि एंग्जाइटी सारखी समस्या मुलांमध्ये सामान्य होते. त्यामुळे तुमचे मुलं स्ट्रेसमध्ये आहे की नाही हे कसे ओळखावे या बद्दलच्या पुढील काही टीप्स पालकांनी जरुर लक्षात ठेवाव्यात. तर मुलांमधील तणावाचा स्तर कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे हे पाहूयात. (Stress in children)
-मुलांना प्रश्न विचारा
जर तुम्हाला असे वाटत असेल ती तुमचे मुलं तणावाखाली असेल तर त्याला त्याचे प्रथम कारण विचारा. यावेळी मुलं खरं सांगण्यास सुरुतीला घाबरेल. अशातच त्याला त्याने दिवसभरात काय-काय गोष्टी केल्या त्याबद्दलचे प्रश्न विचारुन त्याला काय वाटते यावरुन अंदाज बांधा.
-अॅक्टिव्हिवर लक्ष ठेवा
मुलांमधील तणाव कमी करण्यासाठी त्यांच्या अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवा. अशातच जर तुमचे मुलं त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्यापासून दूर राहत असेल अथवा चिडचिड करत असेल तर तुमचे मुलं तणावाखाली आहे असे समजा.
-मुलांसोबत वेळ घालवा
मुलांसोबत वेळ घालवून तुम्ही तणाव कशामुळे आला आहे हे समजू शकता. अशातच मुलांसोबत बातचीत करत रहा आणि त्यांच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हाला मुलं काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करु शकतो.
-मुलाला प्रोत्साहन द्या
काही वेळेस चुक झाल्यानंतर मुलांच्या मनात एक भीती निर्माण होते, त्यामुळे ही मुलं तणावाखाली जाऊ शकतात. अशातच मुलांसोबत प्रेमाने वागा आणि त्यांना प्रोत्साहित करत रहा. जेणेकरुन तुमचे मुलं अधिक ताण घेणार नाही.
-काळजीपूर्वक त्यांचे ऐका
मुलाची एखादी सवय आवडली नाही तर त्याला लगेच ओरडू नका. यामुळे ही मुलामध्ये तणाव वाढतो. अशातच मुलाला नेमकं काय म्हणायचे आहे हे काळजीपूर्वक ऐका. त्याचसोबत त्याच्या चुकीच्या सवयी सुधारण्यासाठी त्याला समजावून सांगा.(Stress in children)
-मुलांकडे मदत मागा
मुलांना तणावमुक्त ठेवण्यासाठी त्यांच्याकडे कधीतरी त्यांची मदत मागा. जसे की, घरातील लहान कामे त्यांना करण्यास सांगा. तसेच त्यांना अधिकाधिक व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मुलं तुमच्या जवळ येईलच पण तणावापासून ही दूर राहिल.
हे देखील वाचा- तुमचे मुलं सातत्याने मोबाईलवर असते? दूर ठेवण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा
-रागवू नका
मुलांमधील तणाव पाहून तुम्ही अजिबात संतप्त होऊ नका. यामुळे मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे राग आल्यानंतर सर्वात प्रथम दीर्घ श्वास घ्या आणि नंतर मुलाला तुमच्या समोर बसवून समजवा.