बहुतांशवेळा ऑफिस आणि घरातील कामे व्यवस्थित पार पडावी म्हणून आपण उगाचच काळजी करत राहतो. यामुळे तणावाखाली जगण्याची कालांतराने सवय होते. हाच तणाव आपली पोटाची चरबी वाढवू शकतो. तज्ञ असे मानतात की, तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन सीक्रेशन वाढते. यामुळेच बेली फॅट वाढू लागते. तणाव कमी केल्यास खरंच पोटाची चरबी कमी होऊ शकते? यासाठी काय उपाय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत. (Stress and belly fat)
तणाव आणि बेली फॅट मधील कनेक्शन
विशेतज्ञ असे म्हणतात की, तणावामुळे पोटावर चरबी वाढू लागते. यालाच स्ट्रेल बेली असे म्हटले जाऊ शकते. स्ट्रेस बेली तणाव आणि तणावाच्या कारणास्तव होणारे हार्मोन सीक्रेनशच्या प्रभाव दर्शवतो. तणाव काही प्रकारे वजन वाढवू शकते. प्रथम तर शरिरातील कोर्टिसोल हार्मोनला ट्रिगर केले जाते.
कोर्टिसोल ब्लज शुगरचा स्तर नियंत्रित करणे, मेटाबॉलिज्मला सक्रिय करणे आणि सूज कमी करण्यास मदत करते. हे इम्युन सिस्टिमला बळकटी देण्यास जबाबदार असतात. दीर्घकाळापर्यंत कोर्टिसोलच्या स्तरात वाढ म्हणजेच याचा थेट संबंध हा बेली फॅटशी येतो. अशा व्यक्तींमध्ये याच कारणास्तव पोटावरील चरबी वाढली जाते, जे सतत तणावाखाली असतात.
तणावामुळे वाढलेले बेली फॅट कमी करण्यासाठी उपाय
मानसिक आरोग्याची काळजी घ्या
घरात रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या आवडीची गाणी ऐका. उत्तम पुस्तक वाचा अथवा सिनेमे पहा. आपल्यालासाठी हेल्दी फूड खा. अशा काही सकारात्मक गोष्टी केल्याने मानसिक आरोग्य ही संतुलित राहते.
एक्सरसाइज
एक्सरसाइज आणि योगासनामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतो. यामुळे शरिरातील तणाव हार्मोनला कमी करण्यास आणि एंडोर्फिनच्या प्रोडक्शनचा वाढवतो. पोटाच्या चरबीसह नकारात्मक दुष्पप्रभाव सुद्धा कमी होतात. दररोज ३० मिनिटे तरी एक्सरसाइज करा.
हेल्दी फूड आणि पोर्शन कंट्रोल
हेल्दी फूड आणि पोर्शन कंट्रोलमुळे पोटाची चरबी कमी होऊ शकते. आपल्या आहारात भरपूर प्रमाणात फळ, भाज्या, कडधान्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या खाव्यात जेणेकरुन तणाव कमी होण्यास मदत होईल. स्नॅक्स आणि फास्ट फूड सारख्या हाय कॅलरीज आणि प्रोसेस्ड फूड पासून दूर रहा.
हेही वाचा- Vitamin P आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
पुरेशी झोप
सहा तासांपेक्षा कमी झोप ही बेली फॅट वाढवते. यामुळे पोटाची चरबी कमी करणे आणि तणावापासून दूर राहण्यासाठी प्रतिदिन कमीत कमी सात ते आठ तासांची पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करावा. बेडवर फोन किंवा लॅपटॉपचा वापर करण्यापासून दूर रहा. यामधून निघणारी ब्लू लाइट तुमची झोप डिस्टर्ब करू शकते.