चीन हा असा देश आहे की या देशातील बातम्या शक्यतो लवकर जगापुढे येत नाहीत. चीनमध्ये सोशल मिडियावर अनेक बंधनं आहेत. मात्र अलिकडील काही महिन्यात याच बंधनांवर मात करत चीनमधील बातम्या जगापुढे येत आहेत. आणि या बातम्यां ऐकून चीनमधील बिघडलेली सामाजिक अवस्था सामोरी येत आहे. नुकतीच चीनमधील एक बातमी समोर आली आहे, ती ऐकून या देशातील समाजव्यवस्था नेमकी कुठे चालली आहे, हा प्रश्न पडतो. चीनमध्ये अलिकडे स्ट्रीट गर्लफ्रेंड नावाचा नवा फंडा चालू झाला आहे. (Street Girlfriend In China)
स्ट्रीट गर्लफ्रेंड म्हणजेच भाड्यावर मिळणारी मैत्रिण. ही मैत्रिण तिला जे पैसे मिळतील त्या पैशाच्या बदल्यात समोरच्या व्यक्तिला चुंबन देते किंवा मिठी मारते, अधिक पैसे दिल्यास फिरायलाही सोबत येते. चीनमधील रस्त्यावर अशा किंमती लावलेल्या पाट्या घेऊन काही तरुणी आढळतात. या तरुणी त्यांनी सांगितलेली किंमत देणा-या व्यक्तीबरोबर ठराविक काळ व्यतीत करतात. चीनमधील या बदलत्या सामाजिक व्यवस्थेवर अनेकांना नाराजी व्यक्त केली आहे. तरुण पिढीवर नको तेवढा ताण आल्यामुळे त्यांना अशा प्रकारची कामे करावी लागत असल्याचा आरोप यातून लावण्यात आला आहे.
चीनमधील प्रमुख शहरांमध्ये स्ट्रीट गर्लफ्रेंड नावाचा नवा ट्रेंड चालू झाला आहे. येथील शेनझेन शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावर जेव्हा स्ट्रीट गर्लफ्रेंड या पाट्या घेऊन तरुणी दिसल्यावर त्याची चांगलीच चर्चा सुरु झाली. स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिस म्हणजे भाड्याने घेतलेली मैत्रिण. काही तासांसाठी पैसे देऊन संबंधित तरुणीला मैत्रिण करता येते. या तासांमध्ये ही तरुणी एखाद्या मैत्रिणीची भूमिका पार पाडते. ती ११ रुपये देऊन मिठी मारू शकते ११५ रुपयांमध्ये किस करू शकते. बघता बघता हा ट्रेंड चीनमधील सर्वच शहरांमध्ये वाढीस लागला आहे. (Street Girlfriend In China)
यामुळे येथील अनेक सामाजिक संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये नोकरीमधील कामाच्या ताणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. तसेच स्पर्धाही वाढली आहे. यामुळे तरुण पिढी ही कौटुंबिक जबाबदा-या टाळत आहे. चीनमधील तरुण लग्न करण्यास नकार देत आहेत. यामुळे या तरुण पिढीला मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. हा ताण दूर करण्यासाठी तरुणपिढी रस्त्यावरील विक्रेत्यांकडून ठराविक काळासाठी भावनिक बंध विकत घेत असल्याचा अहवाल येथील सामाजिक संस्थांनी दिला आहे.
स्ट्रीट गर्लफ्रेंड हा ट्रेंड मात्र आता चीनमध्ये चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, हा ट्रेंड सुरु झाला. आता हाच स्ट्रीट गर्लफ्रेंड ट्रेंड संपूर्ण चीनमध्ये पसरला आहे. आता चीनमधील सर्वच सबवे स्टेशनपरिसरात तरुणी स्टॉल लावत आहेत. या स्टॉलमध्ये ‘मिठीसाठी एक युआन, चुंबनासाठी १० युआन, एका चित्रपटासाठी १५ युआन. अशा पाट्या पहायला मिळत आहेत. या सोबत ‘घरकामात मदत करण्यासाठी २० युआन, तुमच्यासोबत मद्यपान करण्यासाठी ४० युआन प्रति तास’ अशा पाट्या लावलेल्या तरुणीही दिसत आहेत. या ट्रेंडमधून अनेक तरुणी आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसे मिळवत आहेत. स्ट्रीट गर्लफेंड हा ट्रेंड वाढल्यावर याबाबत कायदेशीर कारवाई काय करावी याचाही विचार येथे सरु झाला आहे. ही सेवा सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या स्पष्ट नियामक चौकटीच्या बाहेर असल्याचे येथील मान्यवर वकिलांचे मत आहे. त्यामुळे या ट्रेंड विरोधात वकिल संघटना न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहे. (Street Girlfriend In China)
===================
हे देखील वाचा : नेपाळच्या तरुणींची चीनमध्ये तस्करी !
====================
चीनमध्ये गेल्या काही वर्षात लोकसंख्या कमी होत आहे. एकमूल धोरण इथे राबवण्यात आले होते. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात कमालीची घट झाली. त्याच वाढलेल्या स्पर्धेमुळे तरुणपिढी विवाह करण्यासाठी उत्सुक नाही. त्यातही ज्यांचा विवाह झाला आहे, त्यांनी मुलांना जन्म देणे नाकारले आहे. यामुळे चीनमधील लोकसंख्येत कमालीची घट झाली. आता चीनमधील सरकारनं विवाहित दाम्पत्यांना एकापेक्षा जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत आहे. त्यासाठी अनेक सुविधा देण्यात येत आहेत. मात्र आता चीनमधील तरुण लग्नसंस्थेपासून दूर जात आहेत. नोकरीच्या ठिकाणी असलेली स्पर्धा पाहता येथील तरुण नोकरीतून एकही दिवस सुट्टी घेण्याचे टाळत आहेत. शिवाय या तरुणांचा कार्यालयीन वेळही अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे, चीनमधील घरांचे दरही जास्त आहेत. दैंनदिन वस्तूही येथे वाढीव दरानं विकल्या जातात. याच सर्वांतून स्ट्रीट गर्लफ्रेंड हा ट्रेंड वाढिस लागला आहे.
सई बने