जेव्हापासून अमेरिकेच्या प्रवक्त्या नैंसी पेलोसी यांनी ताइवानचा दौरा केल्यानंतर चीन हा संतप्त झाला आहे. यावर आपली नाराजी व्यक्त करत त्याने ताइवानच्या जवळील परिसरातील सैन्यांचा अभ्यास सुरु केला आहे. यामुळे चीन-ताइवानमध्ये युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान चीनने अमेरिकेला धमकी सुद्धा दिली आहे. परंतु आता असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, जर चीन आणि ताइवानमध्ये युद्ध झाल्यास दोन्ही देशांच्या सैन्याची ताकद ही समान आहे का? खरंच चीनच्या पुढे ताइवान उभा राहू शकतो?(Strawberry Soldiers)
या सर्व प्रश्नांमध्ये एक खास तथ्य समोर आले आहे. त्यानुसार ताइवानच्या सैन्याची ताकद ही चीनच्या समोर अत्यंत कमी आहे. कारण ताइवान मधील तरुण वर्ग हा सैन्यात दाखल होण्यापासून दूर राहतात. त्यासाठी ते विविध मार्गांचा अवलंब करतात. त्यांना पश्चिमी मीडियात स्ट्रॉबेरी सोल्जर असे म्हटले जाते.
हे देखील वाचा- One China Policy काय आहे? जाणून घ्या भारतासह अन्य देशांची या संदर्भातील भुमिका
सैन्यात जाऊ नये म्हणून वाढवतात वजन
चीन-ताइवान मधील युद्धाच्या स्थितीदरम्यान सध्या संपूर्ण जगाचे लक्ष हे ताइवान मधील स्ट्रॉबेरी सोल्जर्सवर गेले आहे. एका बाजूला चीन ताइवानला अशा प्रकारे घेरत आहे की, जसे यापूर्वी कधी काही झालेच नाही. तर दुसऱ्या बाजूला ताइवान मधील तरुण हे चीनला दोन हात करु पाहत नाहीत. युरो एशियन टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, ताइवान मधील बहुतांश तरुणांना एक उत्तम आणि स्थिर करियरच्या संधी हव्या आहेत. त्यांना सैन्यात जायचे आहे ना चीन सोबत कोणताही वाद ठेवायचा आहे. याच कारणामुळे ताइवान मधील तरुण मंडळी आपले वजन वाढवण्यासाठी हॅमबर्गर खात असतात. वजन वाढवल्यानंतर सैन्यात भरती करुन घेत नाहीत. त्यामुळेच त्यांना जगभरात स्ट्रॉबेरी सोल्जर अशा नावाने ओळखले जातात.(Strawberry Soldiers)
ट्रेनिंग संदर्भात ही प्रश्न उपस्थितीत होतात
खरंतर ताइवानमध्ये सैन्य भरती ही अनिवार्य होती. परंतु लोकांनी विरोध केल्याने ती बंद करण्यात आली. याच कारणास्तव ताइवान मध्ये सैन्यातील जवानांच्या संख्येत गेल्या एका दशकात खुप घट झाली आङे. अनिवार्य सैन्य भरतीच्या रुपात आता सर्व तरुणांना चार महिन्याची बेसिक ट्रेनिंग दिली जाते. यामधील काही तरुणांना सैन्यात भरती व्हायचे नसते आणि त्यापासून दूर राहण्यासाठी ते वजन वाढवतात.