GST आणि टॅक्सचा विषय निघाला की पहिल्या ट्रॉल होतात त्या निर्मला सीतारमण, आताही त्या चर्चेत आल्या आहेत. कारण, GST काउंसिलच्या झालेल्या बैठकीत पॉपकॉर्न आणि गाड्यांवर 18% GST टॅक्स लागू केला आहे. आता हे टॅक्स काय आहेत आणि ते कसे आहेत ते आपण पाहुयाच, पण त्याशिवाय इतिहासात आणि वेगवेगळ्या देशात काही विचित्र प्रकारचे टॅक्स लावले गेले होते. जे ऐकून तुम्ही ‘कर नाही त्याला डर कशाला’ ही म्हण बदलून ‘ज्याला कर त्यालाच डर’ अशी कराल. महिलांसाठी ब्रेस्ट टॅक्सपासून पुरुषांसाठी बेचलर्स आणि beard टॅक्सपर्यंत जगभरातल्या वचित्र टॅक्स बद्दल जाणून घ्या… (TAX)
तर सुरुवात करूया त्या टॅक्स बद्दल ज्याची भारतात सध्या चर्चा आहे. तो म्हणजे पॉपकॉर्न टॅक्स, आता मूवी थिएटरमध्ये तीनप्रकारचे पॉपकॉर्न असतात चीज, कॅरेमल आणि salted. या पॉपकॉर्नस वर तीन प्रकारे टॅक्स आकारला जाणार आहे. पॉपकॉर्न मीठ आणि मसाले घालू न खाण्यासाठी पॅक केलेले असतील पण त्यावर कोणतंही लेबल नसेल तर अशा पॅक केलेल्या पॉपकॉर्नवर ५% GST लागू होईल. मात्र, पॉपकॉर्नच्या पॅकेटवर लेबल असेल, तर त्यावर GST १२% असेल. कॅरेमल पॉपकॉर्न वर GST हा १८ % आहे. कारण जेव्हा पॉपकॉर्नमध्ये साखर मिसळली जाते तेव्हा त्याच वर्गीकरण मिठाईच्या प्रकारात बदलते त्यामुळे त्यावर १८% जीएसटी लागू होतो. हाच १८% टॅक्स re- sell गाड्यांवर सुद्धा लागू होणार आहे. (Interesting facts)
तो समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया, समजा तुम्ही एक कार १२ लाख रुपये मध्ये खरेदी केली आणि तुम्ही ती कार कार डीलरला ९ लाख रुपयांना विकली. तर तुम्हाला त्यावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. पण ही कार जेव्हा कार डिलर पुढे १० लाख रुपयांना विकेल, तेव्हा त्यावर त्याला त्याच्या प्रॉफिटच्या १८% GST भरावा लागेल. आता ह्या टॅक्सवरुन पब्लिक नाराज आहे आणि त्याचे पडसाद निर्मला सीतारामन यांच्या meme स्वरूपात आपल्याला दिसत आहेत. पण ह्या पेक्षा भयंकर टॅक्स लोकांवर इतिहासात लादले गेले होते. (TAX)
त्यातील सर्वात भयंकर टॅक्स म्हणजे ब्रेस्ट टॅक्स, हा टॅक्स १९व्या शतकात त्रावणकोर राज्यात म्हणजे आताच्या केरळमध्ये महाराज श्रीमोहन थिरुनाल याने लागू केला होता. ज्यामध्ये त्रावणकोर राज्यातील खालच्या जातीच्या समजल्या जाणाऱ्या महिलांना कंबरेपासून वरच्या शरीरावर कपडे घालण्याचा अधिकार नव्हता. त्यांना त्यांच स्तन उघडेच ठेवावे लागायचे. त्यांनी स्तन झाकण्यासाठी जर कपड्यांचा वापर केला तर त्यांना ब्रेस्ट टॅक्स भरावा लागायचा. ज्याला मुलाक्कारम असं म्हणलं जायचं. यातही सर्वात खालच्या पातळीची गोष्ट म्हणजे हा टॅक्स महिलांच्या स्तनाच्या आकारावर आकारला जायचा. (Interesting facts)
पण या टॅक्स विरुद्ध आवाज उठवला नांगेली या महिलेने, या टॅक्सच्या विरोधात ती आपले स्तन कपड्याने झाकू लागली. म्हणून राजाची माणसं तीच्या पतीला ब्रेस्ट टॅक्स भरण्यासाठी त्रास देऊ लागले. हा टॅक्स गोळाकरण्यासाठी अधिकारी नांगेलीच्या घरी गेले आणि तीच्या स्तनांचा आकार मोजू लागले तेव्हा नांगेली ने आपले दोन्ही स्तन कापून केळीच्या पानावर त्या अधिकाऱ्यांना आणून दिले. हे बघून ते अधिकारी घाबरून पळून गेले. काही वेळानंतर नांगेलीचा मृत्यू झाला, पण तिच्या या धाडसी पावलाने समाजातील इतर महिलांना हिम्मत दिली. नांगेली सारख्या स्त्रियांच्या बलिदानामुळे अखेर हा टॅक्स रद्द करण्यात आला. (TAX)
असेच टॅक्स पुरुषांसाठी सुद्धा आकरले जायचे, ते एवढे भयंकर नव्हते पण विचित्र होते. १७०५ रशियाचा सम्राट पिटर द ग्रेट याने पुरूषांच्या दाढीवर टॅक्स लावला होता. त्याचं म्हणणं होतं की, दाढी ठेवणं हे ओल्ड फॅशन आहे, शिवाय दाढीमुळे आपण जुन्या विचारतच गुरफटूं राहू. त्यामुळे त्याने हा टॅक्स पुरुषांवर लादला होता. याच राजाने १७१९ मध्ये बॅचलर टॅक्स सुद्धा लागू केला होता. हा टॅक्स २० ते ५० वयांमधील अविवाहित पुरुषांकडून आकारला जायचा. या टॅक्सचा उद्देश पुरुषांना लग्न करण्यास प्रोत्साहित करणं आणि लोकसंख्या वाढवण होतं. नंतर हा टॅक्स इतर देशांमध्ये सुद्धा लावण्यात आला होता. (Interesting facts)
प्राचीन रोममध्ये तर मूत्र कर घेतला जायचा. म्हणजे माणसाच्या लघवीवर कर. कारण तेव्हा रोमन लोकं मानवी मूत्राला एक महत्त्वाची वस्तू मानायचे आणि त्याचा वापर विविध कामांसाठी करायचे अगदी दात घासण्यासाठी सुद्धा. त्यामुळे काही व्यापारी मूत्र गोळा करत होते, आणि त्यावर हा टॅक्स वसूल करण्याची सुरुवात झाली.अमेरिकेतील मेरीलँडमध्ये टॉयलेटमध्ये फ्लश करण्यावर सुद्धा टॅक्स आकारला जायचा. पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा टॅक्स होता. या टॅक्सनुसार लोकांकडून दर महिन्याला 5 डॉलर्स म्हणजे सुमारे 418 रुपये फ्लशिंग टॅक्स म्हणून घेतले जायचे. (TAX)
============
हे देखील वाचा :
Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये आता बुरखा बंदी !
US Visas : अमेरिकेच्या व्हिसाचे किती प्रकार आहेत ?
=============
तर जपानमध्ये फॅट टॅक्स लावण्यात आला होता. ४० ते ७५ वयातील पुरुष आणि महिलांना आपल्या लठ्ठ पणावर टॅक्स द्यावा लगायचा. ज्याच्या पोट आणि कंबरेचा आकार जास्त असेल त्यांना हा टॅक्स भरावा लागायचा. जगभरात टॅक्स असे विचित्र टॅक्स आकारले जायचे, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, आणि देशातील लोकांच्या सुख सुविधांसाठी टॅक्स आकरणं गरजेच आहे. पण असे विचित्र टॅक्स असतील तर काय? तुम्हालाही जगातील अशा विचित्र टॅक्सबद्दल माहित असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा! आणि कोणत्या गोष्टींवर टॅक्स आकारला गेला पाहिजे ते ही कळवा. (Interesting facts)