Home » गोष्ट मुंबई उच्च न्यायालयाची…

गोष्ट मुंबई उच्च न्यायालयाची…

by Correspondent
0 comment
Share

कोर्ट कचेऱ्या आणि वकील हा विषय आला की न चुकता आठवतात काही खास वाक्य, ‘कानून के हात लंबे होते है..’ ‘तारीख पे तारीख..’ ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये..’ कायदा आणि सुव्यवस्था हा देशाचा एक महत्वाचा कणा मानला जातो. ‘मुंबई उच्च न्यायालय’ (Bombay High court) गेली १५८ वर्ष या सुव्यवस्थेसाठी आपलं योगदान देत आलं आहे.

पूर्वी मुंबई हे एक छोटंसं बेट होत, बहुसंख्येने मासेमारी करणारे नाविक इथे स्थायिक होते. ब्रिटनचा पोर्तुगीज राजा अल्फान्सो याची बहीण, पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन, हिच्या विवाहाचे वेळी मुंबई आणि काही आसपासची बेटं तिचा होणारा नवरा चार्ल्स याला हुंड्यात देण्यात आली. पुढे त्याने मुंबईच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम सुरू केले. ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत आपली पावलं रोवली, त्यासोबतच गुजरात, कर्नाटक इतर राज्यातून मुंबई मध्ये व्यापार सुरू झाला. मुंबई हे व्यापारासाठी मुख्य बंदर बनलं. ऑगस्ट १८६२ साली राणी व्हिक्टोरियाच्या राज्यात, भारतातलं दुसरं हायकोर्ट, कराची ते कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या ‘मुंबई उच्च न्यायालयाची’ स्थापना झाली. कालांतराने आता हे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण, दादरा नगरहवेली ही निश्चित केली गेली.

स्वातंत्र्यपूर्वकाळात मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या कायद्या आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाली. पण स्वातंत्र्योत्तर काळात,
“There is no equal or superior than Constitution of India” हे तत्व मुंबई उच्च न्यायालय पाळत आलं आहे. ‘नानाभाई हरिदास’ हे पहिले ‘भारतीय’ जज्ज म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत झाले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटत असलेल्या समाजसुधारक, क्रांतिकरकांपैकी अनेकांनी मुंबई उच्च न्यायालयात काम केलेले किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. महात्मा गांधी , सरदार वल्लभभाई पटेल, जिना , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेकांनी मुंबई उच्चन्यायल्यात वकिली आणि बॅरिस्टर म्हणून काम केले आहे.

नानाभाई हरिदास: मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश

१८९७-१९१६ या काळात लोकमान्य टिळकांवर चालू असलेल्या खटल्या नंतर, मुंबई उच्चन्यायल्यात टिळकांचे देशभक्तीपर उद्गार कोरले गेले आहेत.

लोकमान्य टिळक यांचे उद्गार..

भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर,पाहिले ‘मुख्य न्यायाधीश-एम.सी.चागला’ यांनी न्यायालया बद्दलची विश्वासहर्ता या पदला नेऊन ठेवली की, आजही न्यायालयातील खोली चागला यांच्या नावाने ओळखली जाते.

एम.सी.चागला: स्वतंत्र भारताचे पहिले न्यायाधीश.

इंग्लिश गॉथिक रचना असलेली उच्च न्यायालयाची इमारत ही मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंचं महत्व सांगायला आजही कणखरपणे उभी आहे. अन् आपले न्यायाधीशांच्या बुद्धीचा कस, भारताच्या न्याय आणि सुव्यवस्थेचं उत्तम उदाहरण जगासमोर ठेवत आहेत.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे, सिविल,क्रिमिनल यासोबतच अनेक कमर्शियल केसेसचा न्यायनिवाडा सुद्धा मुंबई कोर्ट सच्चेपणाने करत आले आहे. बदलत्या काळानुसार, कोर्टानेसुद्धा त्यांच्या कामाचं स्वरूप बदललं आहे, ऑनलाईन फाईलिंग प्रक्रिया, इ-पेमेंट, फास्ट ट्रॅक मोबाईल सुविधा या आणि इतर अनेक गोष्टी आत्मसात करून मुंबई हाय कोर्ट प्रगती आणि आधुनिकतेच्या मार्गावर पुढे जात आहे. गुन्हेगारी, चोरी-लबाडी, आतंकवाद या आणि अशा अनेक घातक घटनांमुळे आपला देश, देशातील जनता कधीच कोलमडू नये; सत्याचाच नेहमी विजय होतो आणि असत्याला शिक्षा होते हा विश्वास मुंबई हायकोर्टाने जपायचा नेहमीच प्रयत्न केला आहे. वाढत्या गुन्हेगारी आणि गुंड प्रवृत्तीच्या जगात, चांगुलपणा निर्माण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय कार्यरत आहे..

-कांचन नानल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.