दिल्ली ही देशाची राजधानी असली तरीही यापूर्वी ती नव्हती. कारण असा एक काळ होता जेव्हा राष्ट्रीय राजधानी कलकत्ता (आता कोलकाता) होती. दिल्लीला राजधानी बनवण्याचा पाया तेव्हा पडला जेव्हा १९०५ मध्ये बंगालची विभागणी झाली. त्यानंतर देशात इंग्रजांच्या विरोधात विद्रोहाची सुरुवात झाली. इंग्रजांच्या नजरेत विद्रोह व्यतिरिक्त अशी सुद्धा काही कारणे होती ज्यामुळे दिल्लीला राजधानी बनवायचे होते. त्या काळात भले राजधानी कलकत्ता होती. पण इंग्रजांना दिल्लीसाठी खास आकर्षण होते. इंग्रज नेहमीच दिल्लीवर आपली छाप सोडण्यासाठी धडपड करत होते. याच कारणास्तव त्यांनी येथून वायसराय हाऊस आणि नॅशनल वॉर सारखी इमारती बनवल्या. ज्यांना राष्ट्रपती भवन आणि इंडिटा गेटच्या नावाने आता ओखळले जाते. (Story of Delhi Durbar)
प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी आणि विद्रोह केल्यास अटक करण्याचे आदेश
ब्रिटीश शासकांना असे वाटायचे की, देशात शासन करण्यासाठी कलकत्ता ऐवजी दिल्लीला राजधानी करावे. बंगालमध्ये विभाजन झाल्यानंतर इंग्रजांच्या विरोधात सुरु झालेल्या विद्रोहाने त्यांना हे पाऊल उचलण्याची संधी मिळाली. कलकत्तामधील विद्रोह आणि दिल्लीती शासनाची संभाव्यता पाहून इंग्रज महाराजा जॉर्ज पंचम याने देशाची राजधानी दिल्लीत असावी असे आदेश दिले.

या घोषणेनंतर पहिले किंग जॉर्ज-V आणि क्विन मॅरीसाठी दिल्लीत दरबार सजवण्यात आला. दिल्लीत विशेष सजावट करण्यात आली. दिल्लीला अशा प्रकारे सजवण्यात आले जसे की दिवाळीचा सण आहे. या दिवसाला विशेष बनवण्यासाठी वीजेची खास व्यवस्था करण्यात आली होती. देशभरातील प्रसिद्ध राजे-रजवाडे आणि राजघराणे त्यासाठी उपस्थितीत होते. कलकत्तेचा विरोध दिल्लीत पोहचू नये म्हणून सातत्याने अटक ही केली जात होती. आयोजनात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्या दिवसी सु्ट्टी ही जाहीर केली होती. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी ही होती.(Story of Delhi Durbar)
हे देखील वाचा- ‘या’ देशांमध्ये एक्झिट पोल्सला बंदी, मीडिया ही निकालापूर्वी काढू शकत नाही अनुमान
८० हजार लोकांच्या समोर घोषणा
ब्रिटेनचे राजा किंग जॉर्ज-V हे क्विन मॅरीसह भारतात आले. त्यांनी १२ डिसेंबर १९११ रोजी दिल्लीला देशाची राजधानी बनवण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे संपूर्ण भारत हैराण होता. सकाळी ८० हजार लोकांच्या गर्दी समोर त्यांनी म्हटले की, मला असे सांगताना आनंद होत आहे की, सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार देशात उत्तम शासन करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले जात आहे. ब्रिटेनचे सरकार भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीत स्थानांतरित करत आहोत. या घोषणेनंतर देशाचा इतिहासच बदलला गेला. तर दिल्लीला देशाची राजनाधी घोषित केल्यानंतर ३६ वर्षानंतर त्यांच्या राजाचा अंत झाला. त्यांना भारत सोडून जावे लागले आणि देश १५ ऑगस्ट १९४५ रोजी स्वातंत्र्य झाला.