काशीच्या ज्ञानवापी आणि मथुरेच्या श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाचे प्रकरण अद्याप न्यायालयात आहे. ज्ञानवापी येथील वुजुखानाच्या सर्वेक्षणाबाबत सुनावणी होत असतांना उत्तर प्रदेशातील संभलमध्ये जामा मशिदीचा वाद चांगलाच पेटला आहे. संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून गदारोळ सुरु झाला आहे. ही जामा मशिद म्हणजे, भगवान शंकर आणि भगवान कृष्णाचे असे हरि मंदिर आहे. साक्षात देवांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी या मंदिराची उभारणी केल्याचा दावा हिंदू पक्षातर्फे करण्यात आला आहे. बाबरने हे मंदिर पाडून त्याजागी जामा मशिद बांधली. ही मशिद बांधतांना बाबरनं त्यासाठी पहिली विट पाठवली होती. संभळ शहराला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. याच शहरातून भगवान कलीचा जन्म होणार आहे, त्यामुळे हिंदूंच्या धर्माच्या खुणा पुसून टाकण्यासाठी बाबरनं हे हरिमंदिर झाकून त्याजागी जामा मशिद उभारल्याचा दावा आहे. या मंदिरातील दगड हे मशिदीच्या मार्गासाठी वापण्यात आले आहेत, असाही दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. या मशिदीचे सर्वेक्षण करण्यात यावे यासाठी काही वर्षापासून प्रयत्न करण्यात येत होता. संभळ येथील जुने रहिवासी जामा मशिद ही हरिमंदिर असल्याचा दावा करतात, तसेच या मंदिराचा परिक्रमा मार्गही होता, या मार्गावर आता अतिक्रमण झाल्याचाही दावा आहे. पौराणिक वारसा असलेल्या या मंदिरात चार गुहा असून त्यातून दिल्ली आणि त्यापुढे जाण्याचा मार्ग असल्याचाही दावाही काही स्थानिकांनी केला आहे. या सर्वांमुळे जामा मशिद म्हणजेच हरिमंदिर आहे, यासाठी न्यायालयात याचिका करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयात संबंधिक जामा मशिदीमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
उत्तरप्रदेशमध्ये आणखी एका मशिदीवरुन वातावण तापले आहे. संभळ येथील ही जामा मशिद म्हणजे, भगवान विश्मकर्मानं बांधलेले हरि मंदिरच असल्याचा दावा कैलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी यांनी करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात विष्णू शंकर जैन हे हिंदू बाजूचे वकील आहेत. बाबरने 1529 मध्ये श्री हरिहर मंदिर पाडून संभळची जामा मशीद बांधल्याचे सांगितले जाते. त्यामुळे न्यायालयानं या जागेचे सर्वक्षण करुन 15 दिवसात अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. यासाठी कैलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी यांच्यासह सर्वेक्षणासाठी नेमलेली समिती जामा मशिदमध्ये गेल्यावर त्यांना मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले. जामा मशिदीचे दरवाजे अर्धातास बंद ठेवण्यात आले. हे सर्वेक्षण पथक आत गेल्यावर बाहेर विरोधकांनी दगडफेक आणि आग लावण्याच्या घटना केल्या. मात्र या पथकानं परिक्षण केले असून यावरील अहवाल आता न्यायालयात सादर होणार आहे. हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार दशावतारातील कल्की अवतार येथूनच होणार आहे. त्यामुळे या मंदिराचे महत्त्व मोठे असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील जैन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इथे हिंदू मंदिराच्या अनेक खुणा आणि चिन्हे आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने सर्वेक्षणाचा आदेश दिल्याचेही स्पष्ट केले आहे.
हिंदू पक्षाकडून जी याचिका दाखल झाली आहे, त्यात हे मंदिर भगवान कल्कीला समर्पित असे श्री हरी हर मंदिर आहे. सृष्टीच्या प्रारंभी भगवान विश्वकर्मा यांनी बांधले असल्याचे सांगितले आहे. भगवान विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार आहेत. हे मंदिर मुघल काळात पाडण्यात आले आणि येथे जबरदस्तीने मशीद बांधण्यात आली. याबाबत हिंदू पक्षाने बाबर आणि अकबर यांच्यासह इंग्रजांच्या काळातील तीन ऐतिहासिक तथ्ये न्यायालयात सादर केली आहेत. त्यातील पहिला पुरावा म्हणजे, बाबरच्या जनरल हिंदू बेगने 1527-28 मध्ये मंदिर अर्धवट पाडून त्याचे मशिदीत रूपांतर केले. इस्लामिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि हिंदूंवर वचक ठेवण्यासाठी ही मशिद बांधण्यात आली, या घटनेची नोंदही बाबरनामा लिहिलेला आहे. बाबरनामामध्ये याबाबत वरर्णन आहे. त्यात हिंदू बेग कुचीन हा हुमायूनचा शिष्य होता. त्याने संभल काबीज केले. तेथील हिंदू मंदिराचे मशिदीत रूपांतर केले. हे सर्व बाबरच्या आदेशानुसार केले गेले. या मशिदीतील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. बाबरनामामध्ये या सर्व घटनांचे वर्णन आहे. याशिवाय हिंदू पक्षातर्फे अकबरच्या काळात लिहिलेल्या ऐन-ए-अकबरी या पुस्तकाचा संदर्भही देण्यात आला आहे. संभल शहरात हरिमंदिर नावाचे मंदिर आहे. हे एका ब्राह्मणाचे आहे असून त्यांच्या भगवानचा दहावा अवतार या ठिकाणी प्रकट होईल असे या पुस्तकात लिहिण्यात आले आहे. याशिवाय एका ब्रिटीश अधिका-यानं लिहिलेल्या एका पुस्तकातही हरिमंदिराचा उल्लेख आहे. 1874-76 दरम्यान मेजर-जनरल ए. कनिंगहॅम यांनी संभळमध्ये अनेक पुरातत्व सर्वेक्षण केले होते. त्यावरुन त्यांनी ‘ट्रॅव्हल्स इन द सेंट्रल दोआब अँड गोरखपूर’ नावाचा अहवाल लिहिला. यात त्यांनी मंदिराच्या स्थापत्यकलेचा उल्लेख केला आहे. या सर्व पुराव्यांना हिंदू पक्षकारांतर्फे न्यायालयात मांडण्यात आले आहे.
======
हे देखील वाचा : ते पृथ्वीवर येतात आणि जातातही !
======
हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा भगवान विष्णू त्याचे संरक्षण करण्यासाठी अवतार घेतात. धार्मिक ग्रंथांनुसार, जेव्हा कलियुगाचा अंत होईल, सर्वत्र धर्माची हानी होईल, तेव्हा भगवान विष्णू कल्किच्या रूपात पृथ्वीवर प्रकट होतील. विविध धार्मिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये भगवान कल्कीच्या रूपाचे वर्णन केले आहे. भगवान कल्की तपस्वी ब्राह्मणाच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतील असे पुराणात वर्णन आहे. हे ठिकाण उत्तर प्रदेशातील संभळ गावात असल्याची मान्यता आहे. त्यामुळेच संभळ मधील जामा मशिद ही हरिमंदिर असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. आता या सर्वांवर न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
सई बने…