हिमाचल मधील लाहौल स्पीटी वॅलीमध्ये अशी एक जागा म्हणजे ताबो मोनेस्ट्री. येथे एक बौद्ध मठ आहे. येथून ५० किमी अंतरावर असलेले गियू गाव. तिबेटात कधी एक बौद्ध भिक्षु होते त्यांचे नाव लामा सांगला तेनजिंग. ते तिबेटहून येथे तपस्या करण्यासाठी आले होते. पण गियू गावात खुप बर्फवृष्टी झाल्याने तेथे कोणीही पोहचू शकत नव्हते. तेव्हा तेनजिंगसाठी ही जागा तपस्या करण्यासाठी योग्य होती. त्यावेळी त्यांचे वय ४५ वर्ष असावे. तेनजिंग हे बसलेल्या अवस्थेतच तपस्येत लीन झाले होते. त्याचवेळी त्यांनी आपले प्राण त्यागले होते. यामुळे त्यांचा ममी हा बसलेल्या अवस्थेत आहे. जगातील एकमेव असा ममी आहे जो बसलेल्या अवस्थेत आहेत. (Story of 550 year ago Mummy)
पेनसेल्वेनिया युनिव्हर्सिटीच्या संशोधक विक्टर मॅर यांच्यानुसार गयुमध्ये स्थापित ममी जवळजवळ ५५० वर्ष जुना आहे. शेकडो वर्षांपूर्वी बुद्ध भिक्षुक हे व्यापाराच्या कारणास्तव भारत आणि तिबेट मध्ये येतजात होते. त्यावेळी एक बौद्ध भिक्षु सांगला तेनजिंग येथे मेडिटेशनच्या मुद्रेत बसले आणि उठलेच नाही. त्यावेळी त्यांचा मृतदेह स्तूपात ठेवण्यात आला होता.जवळजवळ ५५० वर्षांपूर्वीच्या ममीला लोकांनी देवाचा दर्जा दिला आहे. काही वेळेस ममीचे केस आणि नखं वाढल्याच्या बातम्या सुद्धा समोर येत राहतात.
कोणत्याही लेप शिवाय सुरक्षित आहे ममी
वैज्ञानिक तपासात या ममीचे वय ५५० वर्ष असल्याचे सांगितले गेले. ममी होण्यासाठी मृत शरिरावर एक खास प्रकारचे लेप लावले जाते. परंतु या ममीवर कोणत्याही प्रकारचा लेप लावण्यात आलेला नाही. ऐवढा वर्षांपासून हा ममी सुरक्षित कसा याचे रहस्य आजही कोणाला माहिती नाही. स्थानिक लोकांचे असे म्हटले आहे की, या ममीचे नखं-केस आज ही वाढतात. अशातच स्थानिक लोक त्याला देव मानतात आणि त्याची पूजा करतात.
हे देखील वाचा- उधार मागितलेल्या ‘या’ गोष्टींमुळे तुमच्या यशाचे मार्ग बंद होतात का?
भुकंपाच्या वेळी सुद्धा काही झाले नाही
या परिसरात १९७४ मध्ये भुकंप आला होता आणि या भुकंपात हा ममी जमिनीत गाढला गेला होता. २१ वर्षांपर्यंत हा ममी जमिनीतच होता. परंतु १९९५ मध्ये रस्ता तयार करताना आईटीबीपीच्या जवानांना खोदकामाच्या वेळी हा ममी पुन्हा मिळाला. असे ही म्हटले जाते की, खोदकामाच्या वेळी या ममीच्या डोक्यावर कुदळ लागल्याने रक्त सुद्धा आले होते. मात्र वैज्ञानिकांनी ती गोष्ट योग्य नसल्याचे म्हटले होते. ममीच्या डोक्यावर कुदाळीचा निशाण आजही आहे. वर्ष २००९ पर्यंत हा ममी आयटीबीपीच्या कॅम्पसमध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर तो गावात स्थापन करण्यात आला आणि तेथे लोक पुजा करतात. (Story of 550 year ago Mummy)
रिचेन जंगपो यांनी केली होती ताबो मठाची स्थापना
स्पीटी वॅलीमध्ये ताबो मोनेस्ट्रीची स्थापना ९६० ईस्वी मध्ये तिबेटमध्ये राहणार बौद्ध रिचेन जंगपो यांनी केली होती. भारतात सर्वाधिक जुन्या मठांमध्ये त्याची गणना होते. या मठाच्या कॅम्पसमध्ये काही लहान-लहान स्तूप सुद्धा आहेत, त्यापैकीकाही १३ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. बुद्ध धर्म गुरु दलाई लामा येथे प्रत्येक वर्षी जुलै-ऑगस्ट मध्ये कालचक्र प्रवर्तन कार्यक्रमाची सुरुवात करायचे. या मठात धर्मग्रंथ आणि पेटिंग्सचे मोठे कलेक्शन आहे. ताबो मठ हा शिमलापासून ३३७ किलोमीटर दूर आहे. तर रिकांगपिओ पासून याचे अंतर १४९ मीटर आहे. येथून ताबोला जाण्यासाठी एक काजा बस चालवली जाते. येथे जाण्यासाठी रेल्वे मार्ग नाही आणि ना विमानसेवा. प्रत्येक वर्षी येथे हजारोंच्या संख्येने बुद्ध आणि अन्य पर्यटक येतात.