Home » Health : एक महिना गहू बंद केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ फरक

Health : एक महिना गहू बंद केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ फरक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

सामान्यपणे आपल्या भारतीय लोकांचे जेवण काय असते तर भाजी, पोळी, वरण, भात. हेच जेवण आपण दररोज जेवत असतो. कधी कधी काही वेगळे पदार्थ नक्कीच करतो पण बहुतकरून हे आपले जेवण असते. यात कधी पोळी ऐवजी पराठा, नान असतो, वरणा ऐवजी एखादी डाळ, आमटी असते असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून आपण आपला स्वयंपाक करत असते. यात एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे पोळी किंवा पराठा. अनेकांचे जेवण तर या पोळीशिवाय अपूर्णच असते. एक पोळी तरी त्यांना प्रत्येक जेवणात लागतेच लागते. (Marathi News)

आपण नेहमीच असे ऐकतो तज्ज्ञ देखील सांगतात की मैद्यापेक्षा पोळी किंवा गहू नक्कीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. त्यामुळे आजकाल गव्हाची पोळी, गव्हाचा ब्रेड, गव्हाचा नान आदी अनेक मैद्याचे पदार्थ गहूने रिप्लेस केले जात आहेत. गहू खाल्लयमुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्यविषयक फायदे होतात. मात्र असे असले तरी गहू खाण्याचे देखील अनेक तोटे आहेत. आपल्या आहारातून गहू वगळणे सोपे नसले तरी काही दिवस गहू खाणे पूर्णपणे बंद केल्यास अनेक फायदे आपल्या शरीराला होतील. किमान एक महिना जर तुम्ही तुमच्या आहारातून गहू पूर्णपणे काढून टाकला तर त्याचे कोणते फायदे होतील जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

रक्तातील साखरेची पातळी
गहू हा ग्लुकोजचा प्रमुख स्रोत आहे. जर आपल्या आहारातून गहू पूर्णपणे काढून टाकला तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊ शकते. याचा सर्वात जास्त फायदा मधुमेही रुग्णांसाठी होणार आहे. यासोबतच ग्लूटेन आणि लठ्ठपणा टाळण्यास देखील लाभदायक ठरू शकते. (Latest Marathi News)

Health

पचन सुधारते
गव्हाच्या पिठाच्या चपाती जास्त प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅससह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भातापेक्षा पोळी पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे अशा समस्यांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गव्हात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांना त्रास होतो किंवा पचन मंद होऊ शकते. यामुळे गहू न खाल्ल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो. (Top Trending News)

ग्लूटेन फ्री
गव्हाच्या पिठामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. जर शरीराला ग्लूटेनमुक्त ठेवायचं असेल तर, महिनाभर गव्हाचे पदार्थ खाणं टाळा. ज्यांना सेलिआक रोगग्रस्त आहेत, त्यांनी महिनाभर गव्हाच्या पदार्थ खाणं टाळून पाहावे. यामुळे नक्कीच आरोग्याला फायदा होईल. (Marathi Latest News)

वजन कमी करण्यास उपयुक्त
गव्हाच्या पिठात भरपूर फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी असते, जे वजन वाढण्यास मदत करते. जर तुम्ही महिनाभर गव्हाचे पीठ खाल्ले नाही तर तुमचे वजन कमी होऊ शकते. गहू-मुक्त आहाराचे पालन केल्याने तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होईल, जे वजन नियंत्रणात मदत करू शकते.

==============

हे देखील वाचा : Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ

===============

सेलिआक रोगाचा धोका कमी 
गहू खाल्ल्याने सेलिआक रोग होण्याचा धोका वाढतो. हा एक विकार आहे जो अनुवांशिकदृष्ट्या पूर्वस्थिती असलेल्या लोकांमध्ये आढळतो, जेथे ग्लूटेन लहान आतड्याला नुकसान पोहोचवते. अशा परिस्थितीत गहू न खाल्ल्याने या आजाराचा धोका कमी होतो. (Top Stories)

महिनाभर गव्हाचे पीठ न खाल्ल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. कारण गव्हामध्ये फायबर असते जे मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला गव्हाच्या पिठाची पोळ्या खायच्या नसतील तर तुम्ही मल्टीग्रेन पीठ वापरू शकता, जे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. जव, बाजरी आणि नाचणीच्या पिठाच्या भाकरी, पोळ्या किंवा भाकरी रोजच्या आहारासाठी आणि आरोग्य निरोगी राखण्यास मदत करू शकता. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.