Home » समुद्रकिनाऱ्यावर आहेत ६० दशलक्ष वर्षे जुने दगड, डिझाइन पाहून व्हाल चकित

समुद्रकिनाऱ्यावर आहेत ६० दशलक्ष वर्षे जुने दगड, डिझाइन पाहून व्हाल चकित

0 comment
Share

हे जग अनेक विचित्र गोष्टींनी भरलेले आहे. तुम्हाला या जगात असे काहीतरी सापडेल, जे अद्वितीय आहे. जगातील काही विचित्र माहिती ऐकून सर्वजण हैराण होतात. त्यापैकी काही गोष्टी किंवा वस्तू अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. (Giant Causeway)

अशातच आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जे याआधी कधीही पाहिलेले आणि ऐकलेले नाही. एका समुद्रकिनाऱ्यावर अनेक वर्षांपासून दगडी पायऱ्या बनल्या जात आहेत. या १०, २०, २०० वर्षांपूर्वी नव्हे, तर ६ कोटी वर्षांपूर्वी बनण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यांची बनावट पाहून प्रत्येकजण दंग आहे. चला जाणून घेऊया ही अनोखी दगडे कोणत्या देशात आहे आणि त्यांची खासियत काय आहे? (Giant Causeway)

पायऱ्यांसारखी ४० हजार दगडं

एका अहवालानुसार, ही पायऱ्यांसारखी दगडं आयर्लंडच्या उत्तर किनार्‍यावर आहे. हे अनोखे ठिकाण उत्तर किनार्‍यापासून ६ किमी अंतरावर अँट्रीम पठारावर आहे. या पठारांच्या कोपऱ्यांवर निराळे दगड आहेत. हे दगड दिसायला शिडीच्या आकाराचे आहेत. हे एखाद्या पिलर सारखे बनलेले आहेत. हे दगड षटकोनी आकाराचे आहेत. त्यांची संख्या सुमारे ४० हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Giant Causeway)

हे देखील वाचा: इच्छा असूनही ‘या’ समुद्रात बुडू शकत नाही कोणतीही व्यक्ती, कसं काय?

५ ते ६ कोटी वर्षे जुने आहेत हे दगड

दिसायला हे दगड डिझाईननुसार बनवलेले दिसतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे षटकोनी आकारांचे दगड कोणीही बनवलेले नाहीत, तर ते पूर्णपणे नैसर्गिक आहेत. हे दगड सुमारे पाच ते सहा कोटी वर्षे जुने असल्याचा दावा अहवालात केला जात आहे. स्थानिक भाषेत त्यांना जायंट कॉजवे म्हणतात. या दगडांना पाहण्यासाठी लोक लांबून येतात. (Giant Causeway)

१५ ते २० इंच रुंद आणि ८२ फूट लांब आहेत दगड

असे सांगितले जात आहे की, हे दगड ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघणाऱ्या लाव्हापासून तयार झाले आहेत. हा लाव्हा समुद्राजवळ वाहून गेल्यावर तो थंड झाला. यानंतर हळूहळू या बेसाल्टचे दगडात रूपांतर झाले. एकमेकांमधील दबावामुळे ते खांबासारखे बनले आणि षटकोनी दगड बनले. त्यांचा आकार १५ ते २० इंच रुंद आणि ८२ फूट लांब आहे. (Giant Causeway)

UNESCO ने १९८६ मध्ये बनवले वर्ल्ड हेरिटेज

१९८६ मध्ये हे ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आले. हे सुंदर ठिकाण पाहण्यासाठी लोक लांबून येतात. पक्ष्यांच्या ५० विविध प्रजाती आणि वनस्पतींच्या २०० विविध प्रजाती देखील या ठिकाणी आढळतात. इथलं वातावरण एकदम प्रसन्न आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.