जेव्हा आपण बाजारातून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून एखादी गोष्ट खरेदी करतो तेव्हा आपण त्याला पैसे देतो. वस्तू खरेदी करणे-विक्रीसाठी पैशांची देवाणघेवाण करण्याचे चलन फार जुने आहे. आजच्या काळात जगभरात जवळजवळ प्रत्येक देशाने आपली करेंसी जारी केली आहे. यामध्ये बहुतांश नाणी किंवा कागदाच्या नोटांचा समावेश आहे. मात्र आजच्या २१ व्या शतकात ही जगातील असे एक ठिकाण आहे जेथे दगडांची करेंसी वापरली जाते. दगडांच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी-विक्री केली जाते. सोशल मीडियात या करेंसीची खुप चर्चा केली जात आहे. येथे कागदाजी नोट किंवा धातुची नाणी चालत नाहीत. पैशांच्या रुपात येथे दगडांचा वापर केला जातो.(Stone Currency)
कुठे चालते दगडाची करेंसी?
जगात जेव्हा पैशांचे चलन सुरु झाले नव्हते तेव्हा लोक बार्टर सिस्टिमच्या माध्यमातून वस्तू खरेदी करायचे. या सिस्टिम मध्ये खरेदी केलेल्या सामानाच्या बदल्यात काहीतरी त्याच किंमतीची वस्तू किंवा अन्य वस्तू द्यावी लागत होती. पण प्रशांत महासागरतील यप द्विपावर आज ही दगडांची करेंसी वापरली जाते. जेथे एकाबाजूला व्यक्ती चंद्रावर पोहचला आहे, तर दुसऱ्या बाजूला यप द्विप आज ही दगडांची मुद्रा चलनात वापरतो. ही हैराण करणारी गोष्ट आहे.
व्यक्तींऐवढी मोठी आहे करेंसी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यप द्विप जवळजवळ १०० स्क्वेअर फूट पसरला गेला आहे. या बेटावर लहान लहान गाव आहेत. येथील लोकसंख्या १२ हजार आहे. येथील परिवारांकडे दगडांच्या रुपातील करेंसी आहे, त्यांच्यावर परिवाराचे नाव सुद्धा लिहिलेले असते. दरम्यान, ही करेंसी आकाराने लहान ते व्यक्तींऐवढ्या मोठ्या दगडांऐवढी आहे. या दगडांच्या मधोमध एक गोल ही तयार केला जातो. दगडाच्या वजनासह त्याचे मूल्य ही वाढते. म्हणजेच जेवढा अधिक जड दगड तेवढीच अधिक त्याची किंमत. येथे अधिक जड दगड असणारा परिवार श्रीमंत मानला जातो.(Stone Currency)
हे देखील वाचा- जगातील विषारी झाडं, खाली उभं राहिल्यास अंगावर येतात फोड
दगडांची करेंसी असण्यामागील हे कारण
या विचित्र करेंसीची सुरुवात कधी आणि कशी झाली याची स्पष्टपणे पुरावे नाहीत. मात्र असे मानले जाते की, दगडाची करेंसी असण्यामागील कारण यप बेटावर कोणत्याही प्रकारचा किंमती कच्चा माल किंवा धातू मिळत नाही हे असावे. या बेटावर सोनं किंवा कोळसा ही मिळत नाही. वर्षानुवर्ष येथे चूना-दगडांच्या करेंसीचाच वापर केला जात आहे.