Home » टायटानिक फेम गायिक सेलीन डियोन स्टिफ पर्सन सिंड्रोमने ग्रस्त, नक्की काय आहे हा आजार?

टायटानिक फेम गायिक सेलीन डियोन स्टिफ पर्सन सिंड्रोमने ग्रस्त, नक्की काय आहे हा आजार?

by Team Gajawaja
0 comment
stiff person syndrome
Share

प्रसिद्ध गायिका सेलीन डियोन हिच्या आवाजातील टायटानिक सिनेमातील My Heart Goes on… हे गाणं आजही लोकांच्या मनातील भावना व्यक्त करते. मात्र सध्या सेलीन ही एका गंभीर आजाराशी सामना करत आहे. तिला एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची शिकार झाली आहे. या आजाराला ‘स्टिफ पर्सन सिंड्रोम’ च्या नावाने ओळखले जाते. हा आजार लाखो लोकांपैकी एकाला होऊ शकतो. तर डियोन ही ५५ वर्षाची असून ती गेल्या काही दिवसांपासून आपल्या आरोग्यासंदर्भात फार चर्चेत आली आहे.(Stiff Person Syndrome)

या आजाराबद्दल तिने स्वत:च इंस्टाग्राम अकाउंटवर एका इमोशनल व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. यामुळे तिला आपला पुढील शो सुद्धा रद्द करावा लागला. व्हिडिओ दरम्यान, ती खुप भावुक झाली होती आणि या आजाराची माहिती देत तिने असे म्हटले की, ती आतमधून खुप बिथरली गेली आहे.

काय आहे हा आजार?
नॅशनल इंस्टिट्युट ऑफ न्युरोलॉजिकल डिसऑर्डर अॅन्ड स्ट्रोक यांच्या मते, स्टिफ पर्सन सिंड्रोम एक दुर्मिळ प्रगतिशील आजार आहे. ज्यामध्ये धड, हात आणि पायाचे स्नायू ऐवढ्या सेंसिटिव्ह होतात की, ते कोणत्याही प्रकारचा आवाज, स्पर्श किंवा इमोशनल डिसऑर्डर सहन करु शकत नाहीत. या आजारात व्यक्तीचे डोकं आणि पाठीचा कणा यावर परिणाम होतो. ऐवढेच नव्हे तर त्यांना चालण्यास फिरण्यास ही समस्या येते. डियोन हिने असे ही सांगितले की, काही वेळा स्थिती अशी वाईट होते की, तिचे वोकल कॉड्स ही काम करत नाहीत. अशातच तिला गाणं गाऊ असे वाटते पण ती तसे करु शकत नाही.(Stiff Person Syndrome)

stiff person syndrome
stiff person syndrome

हे देखील वाचा- कार्डिएक अरेस्ट आणि हृदयविकाराचा झटका ‘या’ दोघांमधील जाणून घ्या फरक, लक्षणं

काय आहेत लक्षणं?
-स्टिफ पर्सन सिंड्रोमच्या लक्षणाबद्दल बोलायचे झाल्यासर याचे रुग्ण हळूहळू पुढच्या बाजूला झुकतात आणि त्यांना हालचाल करण्यास किंवा चालण्यास समस्या येते.
-असे रुग्ण वारंवार पडतात आणि त्यांना स्वत:ला सांभाळण्याची ताकद ही राहत नाही ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत ही होऊ शकते.
-अशा लोकांना घराबाहेर पडण्यास सुद्धा भीती वाटते, कारण रस्त्यावरील आवाज, कारचा हॉर्न हे त्यांच्या लक्षणांना प्रभावित करतात आणि अशात त्यांना ते सर्वकाही सहन होत नाही. (Stiff Person Syndrome)

या’ आजाराचे कारण
दरम्यान, अद्याप वैज्ञानिकांना या आजाराची कारणं नक्की काय आहेत हे कळलेच नाही. मात्र संशोधनातून असे संकेत मिळाले की, डोक्यातील आणि पाठीच्या हाडामध्ये एक ऑटो इम्युन प्रतिक्रियेच्या कारणास्तव असे होऊ शकते. याची ओळख ब्लट टेस्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.