सध्या सर्वत्र प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्याचीच आहे. देशभरातले साधू आणि भाविक तसेच जगभरातले पर्यटक या जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवात सामील होत आहेत. हिंदू धर्म हा जगातला सर्वात प्राचीन धर्म सांगितला जातो, त्यामुळे जगभरातल्या लोकांना हिंदू धर्माबाबत विशेष आकर्षण आहे. स्टीव्ह जॉब्सला तर सगळेच ओळखतात… Apple कंपनीचा मालक… पण तो भारतात येऊन एका आश्रमात सात महिने राहिला होता, ही गोष्ट अनेकांना माहित नाही. ते आश्रम म्हणजे उत्तराखंडमधलं कैंची धाम ! निम करोली बाबा यांचं हे आश्रम… असं म्हणतात इथून स्टीव्ह जॉब्सला उर्जा मिळाली आणि त्याने इतकी मोठी Apple कंपनी उभी केली. असे अनेक विदेशी बिजनेसमन, सेलेब्रिटीज, मॉडेल्स हिंदू धर्मापासून प्रभावित आहेत. त्यातच स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची पत्नी लॉरेन जॉब्स यंदाच्या महाकुंभमेळ्यात येणार आहे. आज आपण या लोकांना हिंदू धर्म इतका कसा भावला आणि कोणकोणते सेलेब्रिटी हिंदू धर्माकडे वळले हे जाणून घेऊ.
स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांचं २०११ साली निधन झालं. त्यानंतर Apple ची सगळी जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर आली. स्टीव्ह जॉब्स १९७४ साली भारतात आले. त्यांनी निम करोली बाबा यांचं कैंची धाम गाठलं आणि इथेच सात महिने राहून अध्यात्मिक शक्ती आत्मसात केली. त्यांनी मुंडनसुद्धा केलं होत. या भारतभेटीनंतर त्यांचं भाग्य उजळलं, असं सांगितलं जात. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी काही हिंदू विधी सुरूच ठेवले. त्यातच आता स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन जॉब्स यंदाच्या प्रयागमधल्या महाकुंभमेळ्यात येणार आहे. लॉरेन जॉब्स या कुंभ मेळ्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १३ जानेवारी रोजी प्रयागमध्ये येणार आहेत आणि २९ जानेवारीपर्यंत त्या इथेच कल्पवासात राहणार आहेत.निरंजनी अखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात त्यांचा मुक्काम असणार आहे. त्या विविध धार्मिक विधींमध्येही सहभागी होणार आहेत, यासोबत शाही स्नानसुद्धा घेणार आहेत. (Marathi News)
ज्या प्रकारे स्टीव्ह जॉब्स निम करोली आश्रमातून प्रभावित होऊन गेले होते, तसच मेटाचा आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गसुद्धा इथे भारतात आला होता. विशेष म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांच्या सांगण्यावरूनच झुकरबर्ग कैंची धामला आला होता. याशिवाय गुगलचे संस्थापक larry पेज आणि जेफ्री स्कोल यांनीही कैंची धामला भेट दिली होती. Ford या प्रसिद्ध कार कंपनीचे मालक आल्फ्रेड फोर्डसुद्धा हिंदू झाले होते आणि त्यांनी आपलं नाव अंबरीश दास असं करून घेतलं होत.(Steve Jobs)
म्हणजे विचार करा… जगातल्या श्रीमंत माणसांच्या यादीत असलेली ही लोकं कैंची धामला आले होते. याशिवाय हॉलीवूडचे बरेच सेलेब्रिटी हिंदू धर्मापासून प्रभावित झालेले आहेत. यामध्ये सिल्व्हेस्टर stallone, ज्युलीआ रॉबर्ट्स, विल स्मिथ, robert डॉनी ज्युनिअर, ह्यूज jackमन, रसेल brand ही प्रमुख नावं आहेत. सिल्व्हेस्टर stallon यांनी आपल्या वडिलांच्या आणि मुलाच्या निधानानंतर हरिद्वारमध्ये हिंदू पद्धतीने श्राद्ध सुद्धा घातलं होत. तसेच ते anek हिंदू विधी फॉलो करतात. (International News)
ज्युलीआ रॉबर्ट्स ही हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री… धर्मांतर करून ती आता हिंदू झाली असून धर्मातल्या सर्व प्रथा-परंपरा ती पाळते. जूलिया रॉबर्ट्स ‘ईट, प्रे, लव’या मुव्हीसाठी भारतात शूटिंगसाठी आली होती. त्यावेळी जन्माने ख्रिश्चन असलेल्या जूलियाने जेव्हा बजरंगबलीचा फोटो पाहिला, तेव्हा तिने हिंदू धर्म स्विकारायचा निर्णय घेतला, असं ती सांगते. यानंतर विल स्मिथ हे हॉलीवूडमधलं खूप मोठ नाव… हिंदू धर्मातले मंत्र, स्तोत्र, योग, ध्यान या सगळ्यावर त्याचा विश्वास आहे. असं तो म्हणतो. अनेकदा तो मंदिरात पूजा करतानाही दिसून आला आहे. भगवान श्रीकृष्ण आणि भगवदगीता मला बळ देतात, असं त्याने एकदा एका इंटरव्यूमध्ये म्हटलं होत.(Steve Jobs)
================
हे देखील वाचा : Uttar Pradesh : महाकुंभमधील अनोखे संत !
===============
हॉलीवूडचा आणखी एक सेलेब्रिटी ह्यूज jackमन हासुद्धा हिंदू धर्माच पालन करतो. असे कित्येक सेलेब्रिटीज हिंदू धर्माकडे काही न काही कारणामुळे वळले आहेत. 60च्या दशकात ‘द बीटल्स’ हा रॉक band प्रचंड गाजला होता. त्यांच्यातील एक मेंबर म्हणजेच जॉर्ज harrison यानेही हिंदू धर्म स्वीकारला होता. काही हॉलीवूड artistच्या हातावर संस्कृत tattoo सुद्धा दिसतात. इंग्लिश पॉप सिंगर केटी पेरीने आपल्या हातावर ‘अनुगच्छतु प्रवाह’ असा tattoo काढला आहे. याशिवाय आणखी एक प्रसिद्ध पॉप सिंगर जिने अंबानींचं लग्न गाजवलं होत, तिनेही संस्कृत मंत्र गोंदवला होता.
प्रसिद्ध हॉलीवूड actress जेसिका अल्बा हिने हातावर पद्म हा tattoo काढला होता. हॉलीवूडमध्ये एक ‘मरून ५’ म्हणून प्रसिद्ध band आहे, त्याचा लीड सिंगर आहे adam levine यानेही छातीवर तपस असा tattoo काढला आहे. परदेशातले सेलेब्रिटी असो वा बिजनेसman…अनेकांना हिंदू धर्माची भुरळ आहेच… त्यातच स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी महाकुंभ मेळ्यात येणार असल्यामुळे परदेशी नागरिकांमध्ये हिंदू धर्म आता पुन्हा चर्चेत आला आहे. हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या अनेक Celebrities चं हेच म्हणण आहे की, हिंदू धर्मात त्यांना अध्यात्मिक शांतीचा अनुभव झाला आहे. याशिवाय हिंदू धर्मातले Rituals त्यांना भावतात. याच कारणाने त्यांनी हा धर्म आणि या धर्माचं तत्वज्ञान आत्मसात केलं आहे. त्यामुळे आगामी काळात किती नागरिक हिंदू धर्माकडे वळतात, हे महत्त्वाच ठरणार आहे.