Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना हिंदू आणि बौद्ध धर्माची प्रचंड आवड होती. बाबा नीमकरोली यांचे स्टीव्ह जॉब्स हे भक्त होते. उत्तराखंडमधील नैनिताल पासून काही अंतरावर असलेल्या बाबा नीमकरोली यांच्या आश्रमामध्ये स्टीव्ह जॉब्स काही दिवस राहिले होते, आणि बाबांच्याच आशीर्वादातून त्यांनी Apple चे साम्राज्य उभे केल्याचे सांगितले जाते. स्टिव्ह जॉब्स यांच्यासारखीच अध्यात्माची ओढ त्यांच्या पत्नी लॉरेन यांनाही आहे. लॉरेन या जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये आहेत. या लॉरेन पुढचे काही दिवस भारतात मुक्कामी येणार आहे. तिर्थराज प्रयागराज येथील महाकुंभमध्ये त्या सहभागी होणार आहेत. (Social News)
फक्त सहभागी होणार नाहीत तर त्या कल्पवासासारखे कठीण व्रत करणार आहेत. 62 वर्षाच्या लॉरेन या महाकुंभमध्ये 17 दिवस भिक्षुकीव्रत करणार आहेत. यालाच कल्पवास असे म्हणतात. सर्वात कठिण असलेल्या या कल्पवास व्रतामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते, तसेच आध्यात्मिक पाठबळही मोठे होते, असे मानले जाते. लॉरेन या सर्वात जुन्या असलेल्या निरंजनी आखाड्यात राहून तपस्वी जीवन जगणार आहेत. Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन या 13 जानेवारीला भारतात येत आहेत. भारतातील प्रयागराजमध्ये सुरु होत असलेल्या महाकुंभमध्ये लॉरेन सहभागी होणार आहेत. लॉरेन या गेली काही वर्ष निरंजनी आखाड्याच्या अनुयायी आहेत. याच आखाड्यात लॉरेन एखाद्या सर्वसामान्यांसारख्या भक्तांसारख्या रहाणार आहेत. (Maha Khumbh Mela)
स्टीव्ह जॉब्स यांची गणना जगातील मोजक्या अब्जाधीशांमध्ये होत असे, तशीच त्यांच्या पत्नीचीही होते. मात्र आपल्या भोवती असलेले हे श्रीमंतीचे जाळे दूर सारत लॉरेन पुढचे काही दिवस हे अध्यात्मिक शांतीसाठी व्यतित करणार आहेत. 13 ते 29 जानेवारीपर्यंत लॉरेन या महाकुंभमध्ये रहाणार आहेत. लॉरेन या स्टिव्ह जॉब्स यांच्या पत्नी आहेत, सोबत त्यांचीही स्वतंत्र ओळख आहे. त्या इमर्सन कलेक्टिव्हच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. सोबत Apple च्या मालकांपैकी एक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा समावेश आहे. मात्र महाकुंभमध्ये आल्यावर त्या कल्पवास व्रत करणार आहेत. ते व्रतही 17 दिवसांचे असून हे अत्यंत कठिण आहे. या कल्पवासच्या नियमानुसार लॉरेन यांना एका तंबुमध्ये रहावे लागेल. पहाटे त्यांना संगमस्थानावर थंड पाण्याने स्नान करावे लागणार आहे. त्यानंतर धार्मिक विधींमध्ये त्या सहभागी होणार आहेत. यात होमहवन, यज्ञ यांचा समावेश असेल. (Social News)
शिवाय धार्मिक पुस्तकांचेही अध्ययन त्या करणार आहेत. याशिवाय महाकुंभमध्ये अनेक मान्यवर कथावाचनाचे आयोजन करतात, या कथावाचनातही लॉरेन सहभागी होणार आहेत. यासोबत कल्पवास व्रतवासींना आहाराचेही पथ्य पाळावे लागते. साधे अन्न सेवन करावे लागते. शक्यतो कल्पवास करणारे एकच अन्न सेवन करतात. तसेच लॉरेन यांना करावे लागणार आहे. शिवाय त्यांना झोपण्यासाठी गवताचा बिझाना मिळणार आहे. गेली काही वर्ष निरंजनी आखाड्यामध्ये सेवा करणा-या लॉरेन यांच्या या निर्णयाची सध्या जगभर चर्चा होत आहे. भारतात होत असलेल्या महाकुंभाबाबत युरोप आणि अमेरिकेमध्ये उत्सुकता आहे. तिथूनही अनेक भाविक महाकुंभसाठी प्रयागराजला येणार आहेत. सोबत अनेक पत्रकार आणि सोशल मिडिया चालक या प्रयागराज भूमीवर येत आहेत. या सर्वांसाठी लॉरेन स्टीव्ह यांची बातमी मोठी आहे. (Maha Khumbh Mela)
========
हे देखील वाचा : Char Dham : हिवाळी चार धाम यात्रा सुरु !
Maha Khumbh Mela : बापरे ! महाकुंभमधील बांबू जोडले तर थेट अमेरिकेला पोहचाल….
======
एक अब्जाधीश महिला आध्यात्मिक शांतीसाठी एवढे कठिण व्रत करणार आहे, हे जाणून अनेकांनी कल्पवास म्हणजे, काय याचा शोध सुरु केला आहे. कल्पवास ही हिंदू परंपरेतील एक प्राचीन प्रथा आहे. पौष पौर्णिमा ते माघी पौर्णिमा या महिन्यात कल्पवासी व्रत केले जाते. यासाठी प्रयागराजमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. कल्पवास करणा-यांसाठी स्वतंत्र तंबू बनवण्यात आले आहेत. या तंबूंच्या बाहेर तुळशी वृंदावन उभारण्यात आले आहे. कारण कल्पवास व्रत करतांना कृष्णाची आणि तुळशीच्या पुजेचे महत्त्व आहे. याशिवाय कल्पवास व्रतासाठी महाकुंभमधील सर्वच आखाड्यांतर्फेही स्वतंत्र तंबू उभारण्यात आले आहेत. याशिवाय महाकुंभमध्ये काही कथावाचकही येत आहेत. त्यांचे भव्य तंबू उभारण्यात आले असून महाकुंभाच्या 45 दिवसात त्यांचे कथावाचन होणार आहे. या कथावाचकांचे अनुयायीही कल्पवास व्रत करणार असून त्यांनीही मोठ्या प्रमाणात तंबू उभारले आहेत. (Social News)
सई बने